गोरेगाव पांडुरंगवाडीतील पोलीस बीट चौकीचे नूतनीकरण! रहिवाशांनी मानले शिवसेनेचे आभार
शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळे गोरेगाव पूर्व पांडुरंगवाडीतील बंद पडलेल्या पोलीस बीट चौकीचे नूतनीकरण करण्यात आले आहे. गुरुवारपासून ही चौकी पुन्हा सुरू झाली. त्यामुळे रहिवाशांनी शिवसेनेचे आभार मानले. अनेक वर्षे बंद असलेली ही चौकी पुन्हा सुरू व्हावी अशी विनंती रहिवाशांनी युवासेना कार्यकारिणी सदस्य अंकित प्रभू यांच्याकडे केली होती. त्यांनी शिवसेना नेते, आमदार सुनील प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली विधानसभा संघटक प्रवीण माईनकर, सुधाकर देसाई, अजित भोगले आणि रहिवाशांसह वनराई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक माने यांची भेट घेऊन निवेदन दिले. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यानंतर अंकित प्रभू यांच्या पुढाकाराने या पोलीस चौकीची दुरुस्ती व सुशोभीकरण सीएसआर निधीतून करण्यात आले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List