Ahilyanagar news – दुचाकीसह नदीत वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह 58 तासानंतर सापडला
दुचाकीसह नदीपात्रात वाहून गेलेल्या तरुण मृतदेह तब्बल 58 तासानंतर चिखली येथील मोठ्या पुलावर आढळून आला. गावातील काही तरूण नदीवर आंघोळीसाठी गेले असता त्यांना नदीच्या कडेला दगडाजवळ एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती समजताच चिखली, केरेवाडी परिसरातील ग्रामस्थ आणि केरे यांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली असता सदरचा मृतदेह संदीप केरे (वय – 34) याचाच असल्याचे समोर आले..
संदीप केरे हा तरुण रविवारी रात्री साडेआठ ते नऊच्या सुमारास केस कापून आपल्या घरी परतत असताना दुचाकीसह नदीपात्रात वाहून गेला होता. सलग दोन दिवस नातेवाईक, ग्रामस्थ आणि महसूल विभागाचे कर्मचारी त्याचा शोध घेत होते. मंगळवारी रात्री नऊ वाजेपर्यंत शोध घेऊनही तो कुठेही आढळून आले नाही. शोध लागत नसल्याने व रात्र झाल्याने शोध मोहीम थांबवण्यात आली होती.
दरम्यान, चिखली गावातील काही युवक नदीवर आंघोळीसाठी गेले असता बुधवारी नदीच्या कडेला संदीपचा मृतदेह आढळून आला. संदीपच्या पश्चात आई- शैला वडील भाऊसाहेब पत्नी उषा आणि मुलगी 10 तर एक 11 वर्षाचा मुलगा असा परिवार आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List