अंतराळातील खवय्ये! कोलंबी क्रॅकर्स, आंबटगोड चिकन, स्विट ब्रेड.. शुभांशू शुक्ला आणि टीमची भन्नाट मेजवानी

अंतराळातील खवय्ये! कोलंबी क्रॅकर्स, आंबटगोड चिकन, स्विट ब्रेड.. शुभांशू शुक्ला आणि टीमची भन्नाट मेजवानी

मोहीम कुठलीही असो, अस्सल जातीच्या खवैय्याला खाण्याशिवाय चैन पडत नाही. हेच तंतोतंत लागू पडते, अंतराळवीर शुंभाशू शुक्ला आणि त्यांच्या टीमलाही. अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांच्या ऑक्सिओम-4 मिशनने 25 जूनला ड्रगन स्पेसक्राफ्टमधून अंतराळात उड्डाण केले. हा प्रवास तब्बल 14 दिवसांचा होता. हा प्रवास आता पूर्णत्वास यायला अवघे काही तास उरले आहेत. 14 जुलैला शुभांशू शुक्ला आणि त्य़ांचे इतर सहकारी परतीचा प्रवास सुरू करणार आहेत. दरम्यान इतक्या मोठ्या मोहिमेवरून परतण्याच्या काही दिवस आधी, त्यांनी आणि इतर क्रू सदस्यांनी एका मेजवानी आस्वाद घेतला. यांसदर्भातील काही फोटो आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. यामध्ये कोलंबी क्रॅकर्स, आंबटगोड चिकन, प्रक्रिया केलेले मास, स्विट ब्रेड यासारख्या विविध पदार्थांचा आस्वाद घेतला.

शुभांशू शुक्ला आणि त्यांचे इतर सहकाऱ्यांनी एकत्र मेजवानीचा आनंद लुटला. यावेळी सगळ्यांच्याच चेहऱ्यावर आनंद दिसत होता.अंतराळात जाण्यापूर्वीच शुभांशू शुक्ला आणि त्यांच्य़ा टीमने खाण्याचे काही हलके फुलके पदार्थ नेले होते.

1984 मध्ये राकेश शर्मा नंतर, हिंदुस्थानी हवाई दलाचे पायलट आणि अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला अंतराळात उड्डाण करणारे दुसरे हिंदुस्थानी आहेत. (11 जून) पासून ते स्पेसएक्स रॉकेट आणि अ‍ॅक्सिओम-4 मोहिमेसाठी क्रू ड्रॅगनने आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (आयएसएस) प्रस्थान केले होते. त्यांच्यासह फ्लोरिडातील केनेडी स्पेस सेंटर तीन अंतराळवीरांनी उड्डाण केले होते.

मोहिमेबद्दल शुभांशू शुक्ला यांच्या कुटुंबातील एका सदस्याने दिलेल्या माहितीनुसार, शुक्ला या मोहिमेसाठी अंतराळामध्ये आमरस, मूग डाळ हलवा, गाजर हलवा घेऊन गेले होते. नासाने गुरूवारी शुक्ला आणि इतर तीन क्रू सदस्यांचा परतीचा प्रवास 14 जुलैपासून सुरू होणार असल्याची घोषणा केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;