आपलेच पैसे काढायला आणि मोजायलाही द्यावे लागणार पैसे! एटीएम महागणार, बॅलन्स चेक करण्यासाठीही खिसा कापला जाणार

आपलेच पैसे काढायला आणि मोजायलाही द्यावे लागणार पैसे! एटीएम महागणार, बॅलन्स चेक करण्यासाठीही खिसा कापला जाणार

आपलेच पैसे काढायला आणि मोजायलाही आता पैसे द्यावे लागणार आहेत. देशात डिजिटल व्यवहार वाढले असले तरी अशा व्यवहारांच्या माध्यमातून सरकार थेट तुमच्या खिशात हात घालत असल्याचे समोर आले आहे. येत्या 1 मेपासून नियमात बदल होणार असून दुसऱ्या बँकेच्या एटीएम मशीनमधून पैसे काढणे, मोजणे आणि बॅलेन्स चेक करणे आता महागणार आहे. देखभाल खर्च वाढल्याने एटीएम कंपन्यांकडून होणारी मागणी लक्षात घेता नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने एटीएम शुल्क वाढवण्याची मागणी केली होती. त्याला आरबीआयने मंजुरी दिली.

सध्या दुसऱ्या बँकेतील एटीएममधून पैसे काढण्यासाठी मोठ्या शहरात 5 आणि लहान शहरात 3 व्यवहार मोफत दिले जात आहेत. मात्र त्याहून अधिक व्यवहार झाल्यास शुल्क आकारण्यात येत आहे. आता या शुल्कात वाढ करण्यात येणार असल्याने एटीएमद्वारे होणाऱ्या व्यवहारांवर मर्यादा ठेवावी लागेल.

एटीएम चार्ज वाढवल्याने एटीएम नेटवर्क ऑपरेटर आणि व्हाईट लेबल एटीएम कंपन्यांकडून इंटरचेंज शुल्क वाढवण्याची मागणी होत आहे. सध्या एटीएमची देखभाल आणि ऑपरेशन खर्च पूर्वीच्या तुलनेत वाढलेले आहेत. त्यातच नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून ही मागणी आरबीआयसमोर ठेवण्यात आली. त्यास मंजुरी मिळाली.

ठरवून दिलेल्या मर्यादेनंतर दुसऱ्या बँकेच्या एटीएममधून पैसे काढल्यास 17 रुपयांऐवजी 19 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. तर खात्यात किती पैसे आहेत हे तपासण्यासाठीचे शुल्क 7 रुपयांवरून 9 रुपयांपर्यंत वाढवण्यात आले आहे.

ग्राहकांना आता नॉन होम बँक एटीएममधून पैसे काढण्यासाठी किंवा पुन्हा बॅलेन्स चेक करण्यासाठी अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार आहे. त्यामुळे आता ग्राहक आपल्याच बँकांची एटीएम सेवा वापरतील. त्यामुळे इतर बँकांच्या एटीएम सेवेला फटका बसेल.

10 वर्षांवरील मुले उघडू शकतात बँक खाते

10 वर्षांवरील अल्पवयीन मुलांना स्वतंत्ररित्या बँक खाते उघडण्याची आणि ते खाते ऑपरेट करण्याची परवानगी भारतीय रिझर्व्ह बँकेने दिली आहे. अल्पवयीन मुलांना बँक खाते उघडण्याचे आणि ते स्वतः ऑपरेट करण्याबाबत जोखीम निर्माण होऊ नये यासाठी खात्यात किती पैसे ठेवता येतील याबाबत आणि इतर अटींबाबत नियम ठरवण्यात येतील. याची माहिती खातेधारक मुलांच्या पालकांना देण्यात येईल, असे आरबीआयने स्पष्ट केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कपूर खानदानातील अभिनेत्यासोबत इंटीमेट सीन देण्यासाठी अभिनेत्रीने…; 49 वर्षांपूर्वीचा तो सिनेमा कपूर खानदानातील अभिनेत्यासोबत इंटीमेट सीन देण्यासाठी अभिनेत्रीने…; 49 वर्षांपूर्वीचा तो सिनेमा
बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्री अरुणा ईरानी यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक सहाय्यक भूमिका साकारल्या आहेत. नुकत्याच 'द कपिल शर्मा शो'मध्ये आल्यानंतर त्यांनी...
सासरच्यांनी केला छळ, पतीचा हॉस्पिटलचे बिल भरण्यास नकार…; वयाच्या 45व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मुलीचा मृत्यू
दहशतवादाविरोधातल्या लढाईत आमचा हिंदुस्थानला पूर्ण पाठिंबा, अमेरिकन संसदेच्या अध्यक्षांची घोषणा
Mockdrill साठी सिव्हिल डिफेन्सचे दहा हजार स्वयंसेवक महाराष्ट्रात दाखल
VIDEO छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर मॉकड्रीलचा सराव
Pahalgam Attack – अशी शिक्षा करा की, कोणीही हिंदुस्थानकडे डोळे वर करून पाहण्याची हिंमत करणार नाही – राहुल गांधी
मधुमेही रुग्णांसाठी ही फळे आहेत सर्वात उत्तम, वाचा सविस्तर