वजन कमी करण्यासाठी तुमची फक्त पाच मिनिटं गरजेची आहेत, वाचा

वजन कमी करण्यासाठी तुमची फक्त पाच मिनिटं गरजेची आहेत, वाचा

अलीकडे आपल्या घरी जाण्या-येण्याच्या वेळाच बदलल्या आणि तिथेचे आपल्या सवयीही बदलल्या. म्हणूनच शतपावली म्हणजे काय असा अनेकांना प्रश्न पडतो. शतपावली म्हणजे जेवणानंतर काही काळ चालणे. त्यालाच शतपावली असे म्हणतात. म्हणजे रात्रीच्या जेवणानंतर किमान शतपावली म्हणजे शंभर पावले चालणे हे खूपच गरजेचे आहे.

आहारात पालक सूप पिण्याचे होतील अगणित फायदे, वाचा

वजन वाढण्याचे प्रमाण अलीकडे खूप वाढलेले आहे. म्हणूनच वजन कमी करण्यासाठी अनेकविध उपाय केले जातात. वेळेच्या अभावामुळे आपण आरोग्याकडे बरेच दुर्लक्ष करु लागलो आहे. जेवण घाईघाईने उरकुन आपण सध्या झोपत आहोत. पण ही पद्धत अतिशय चुकीची आहे. जेवल्यानंतर लगेच झोपल्याने आरोग्याच्या तक्रारी वाढतात. आपल्याकडे आजही जेवणानंतर लगेच झोपू नये असं सांगितलं जातं. पूर्वीची जुनी-जाणती माणसं कायम म्हणायची, की शतपावली करा. काय असेल बरं या सर्वांमागचं कारण… जेवणानंतर शतपावली करण्याची प्रथा आता बंद पडल्यातच जमा आहे.

जायफळ आपल्या सौंदर्यासाठी कसे महत्त्वाचे आहे, जाणून घ्या

रात्रीच्या जेवणानंतर चालण्यामुळे रात्रीचे जेवण आणि झोप यामध्ये अंतर राहते. तसेच मुख्य म्हणजे आपली पचनशक्ती सुधारते. रात्रीच्या जेवणानंतर फिरायला जाण्यामुळे आपली पाचन प्रणाली निरोगी राहते. पोटाशी संबंधित इतर कोणत्याही समस्येपासून आराम मिळतो.

Health Tips- सर्दी-खोकल्यामुळे त्रस्त असाल तर, करुन बघा हे घरगुती रामबाण उपाय

रात्रीच्या जेवणानंतर चालणे देखील रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करते कारण ते तुमच्या प्रणालीतील विष बाहेर टाकते. हे आपल्या अंतर्गत अवयवांसाठी चांगले कार्य करते. एक मजबूत प्रतिकारशक्ती फ्लू, सर्दी आणि इतर अनेक गंभीर आजारांपासून वाचवू शकते.

तुम्हाला तुमचे चयापचय वाढवायचे असेल तर तुम्ही जेवणानंतर लगेच झोपण्याऐवजी फिरायला जा. रात्रीच्या जेवणानंतर चालून तुम्ही वजन कमी करू शकता. शिवाय जर तुम्हाला तणाव जाणवत असेल तर चालणे खूप फायदेशीर आहे. रात्रीच्या जेवणानंतर किमान काही वेळ चालणे हे खूप गरजेचे आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मुंबईहून जगन्नाथपुरीला जाणाऱ्या कारचा समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, म्यानमारच्या दोन नागरिकांचा जागीच मृत्यू मुंबईहून जगन्नाथपुरीला जाणाऱ्या कारचा समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, म्यानमारच्या दोन नागरिकांचा जागीच मृत्यू
मुंबईहून जगन्नाथपुरीला जाणाऱ्या कारचा समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला असून यात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. मयत म्यानमार या देशातील...
अफगाणिस्तानमध्ये जर जय व अमित शहा असते तर सट्टेबाजीसाठी ते देखील पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळले असते, संजय राऊत यांची जोरदार टीका
मतदार यादीतीला घोटाळा हा मराठी माणसाची पिछेहाट करण्यासाठी – संजय राऊत
जमीन खरवडून गेली, आता पाण्यावरची शेती! धाराशिवच्या पालकमंत्र्याचा ‘प्रताप’
मेहुल चोक्सीच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा, बेल्जियम कोर्टाची मान्यता
Photo – क्षण आनंदाचा… सण नात्यांचा!
पंजाबमध्ये ‘बर्निंग ट्रेन’चा थरार; लुथियानाहून दिल्लीला जाणाऱ्या गरीब रथ एक्सप्रेसला आग, एक महिला जखमी