चंद्रपूर पोलीसांची मोठी कारवाई, आरोपीकडुन 528 ग्रॅम एम.डी ड्रग्स जप्त,1 जण अटकेत

चंद्रपूर पोलीसांची मोठी कारवाई, आरोपीकडुन 528 ग्रॅम एम.डी ड्रग्स जप्त,1 जण अटकेत

चंद्रपूर पोलीसांची एमडी ड्रग्सची सर्वात मोठी कारवाई केली असून आरोपीकडुन 528 ग्रॅम एम.डी जप्त करण्यात आला आहे. एका आरोपी सह 35 लाख 07 हजार 480 रूपयाचे मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

आरोपी चे नाव वसीम इमदाद खान (37) असून तो मुंबईवरून त्याच्या कारने चंद्रपूरात एम.डी ड्रग्ज पावडर विक्री करीता घेवुन येत असताना चंद्रपूर – नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील साखरवाही फाट्याजवळ स्थानिक गुन्हे शाखेने आरोपी वसीम खान ला ताब्यात घेतले. आरोपी वसीम इमदाद खान याच्याकडून एका प्लास्टिकच्या प्रेसलॉक पिशवीत एम.डी (MEPHEDRONE) सदृश्य पांढऱ्या रंगाची ड्रग्ज पावडर 528 ग्रॅम, बाजारभावानुसार 26 लाख 40 हजार रूपयाचे ड्रग्स जप्त करण्यात आले. आरोपी वर गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आले आहे. पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे करीत आहे.

  • एन.डी.पी.एस अधिनियम अन्वये चंद्रपूर जिल्हयात एकुण 157 गुन्हे नोंद करून 192 आरोपीवर कार्यवाही करण्यात आली आहे. आरोपीकडुन एकुण 80 लाख 59 हजार 774 रूपये चा माल जप्त करण्यात आला आहे.
  • एम.डी (MEPHEDRONE) ड्रग्ज पावडर बाळणाऱ्या आरोपीवर 14 गुन्हे नोंद करण्यात आले असुन 722.614 ग्रॅम एम.डी ड्रग्ज पावडर जप्त करून 31 आरोपीवर कार्यवाही करून 43 लाख 78 हजार 060 चा माल जप्त करण्यात आला आहे.
  • ब्राउन शुगर पावडर बाळणारे आरोपीवर 01 गुन्हा नोंद करण्यात आला असून 298 ग्रॅम ब्राउन शुगर पावडर जप्त करून 02 आरोपीवर कार्यवाही करून 30 लाख 19 हजार 550रू चा माल जप्त करण्यात आला.
Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

दहिसरमधील भूखंडावरील काम शिवसेनेने बंद पाडले, बेकायदेशीरपणे राडा-रोडा टाकून प्रदूषण दहिसरमधील भूखंडावरील काम शिवसेनेने बंद पाडले, बेकायदेशीरपणे राडा-रोडा टाकून प्रदूषण
बेकायदेशीरपणे राडा-रोडा टाकून प्रदूषण वाढविणा-या दहिसरमधील भूखंडावर आज शिवसेनेने धडक दिली. बेकायदेशीरपणे येणारे माती व डेब्रिजचे ट्रक परत पाठवत काम...
शिवसेनेची आदिवासी कुटुंबांसोबत दिवाळी
पाच दशके, तीनशेहून अधिक चित्रपट गाजवले
‘मेट्रो-2बी’चा मंडाले-चेंबूर टप्पा लवकरच खुला, प्रवासी सेवेसाठी मिळाले रेल्वे सुरक्षा मंडळाचे प्रमाणपत्र
मतचोरांना हद्दपार करण्यासाठी मराठी आणि अमराठीही एकत्र आले आहेत! उद्धव ठाकरे यांचा भाजपला इशारा
बदली-बढत्यांमध्ये ’गोलमाल’, मुंबई पालिकेचे तब्बल 156 आदेश स्थगित केल्याने खळबळ; एसआयटी चौकशीची शिवसेनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
जैन बोर्डिंग हाऊसच्या जमीन व्यवहारास स्थगिती, पुण्यातील भाजपचा ‘जाग्या’मोहोळ