अतिवृष्टीचा मुंबईकरांना फटका आणि चटका, एक किलोच्या पैशात पाव किलो भाजी

अतिवृष्टीचा मुंबईकरांना फटका आणि चटका, एक किलोच्या पैशात पाव किलो भाजी

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याच्या फळभाजी पिकांचेही मोठे नुकसान झाल्याने घाऊक बाजारात आवक घटली आहे. त्यामुळे भाज्यांच्या किमतीत तब्बल दुप्पट वाढ झाली असून एक किलोच्या पैशात फक्त पाव किलोच भाजी मिळत आहे. परिणामी आधीच महागाईत होरपळणाऱ्या सर्वसामान्य मुंबईकरांना अतिवृष्टीचा चांगलाच फटका आणि चटका बसत आहे.

नाशिक, पालघरसह मराठवाडा, विदर्भात गेल्या काही दिवसांपासून पूरस्थिती निर्माण झाल्याने शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेले पीक वाहून गेले आहे. पावसाचा सर्वाधिक फटका पालेभाजी आणि फळभाज्यांना बसला आहे. यातील काही पिके कुजून गेली आहेत तर काही फळभाज्यांचा दर्जा घसरल्याने खाण्यायोग्य राहिलेली नाहीत. त्यामुळे व्यापाऱ्यांकडून मातीमोल दराने भाज्या खरेदी केल्या जात आहेत. तर मुसळधार पावसातही तग धरून राहिलेल्या पिकाच्या उत्पादनातून लागवड खर्चही निघत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. दरम्यान, महाराष्ट्राच्या विविध भागांतून येणाऱ्या भाजीपाल्याचे प्रमाण घटल्याने आता शेजारील राज्यांमधून येणाऱ्या भाज्यांवर गरज भागवली जात असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

घाऊक बाजारातील किमती
(प्रतिकिलो रुपयांमध्ये)
भाजी आधी आता
मटार 70 ते 80 120
गवार 70 120
कोथिंबीर जुडी 5 ते 10 25
वांगी 30 60
भेंडी 30 60
पालक 25 ते 30 50
दुधी 60 100
टोमॅटो 20 ते 30 40

गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे भाज्यांचे नुकसान झाल्याने एपीएमसी वाशी मार्केटमध्ये येणाऱ्या मालाचे प्रमाण 20 ते 25 टक्क्यांनी घटले आहे. मालाच्या कमतरतेमुळे भाज्यांचे दर दुपटीने वाढले आहेत.  शंकर फडतरे, व्यापारी, वाशी मार्केट

 बाजारात भाज्यांची आवक मोठी असताना गृहिणींकडून अर्धा ते एक किलो भाजांची खरेदी केली जायची. मात्र आता हेच ग्राहक पाव किलो भाजी खरेदी करीत असल्याचे प्रभादेवी मंडईतील विक्रेते साजन कुमार यांनी सांगितले.

किरकोळ बाजारातील किमती
(प्रतिकिलो रुपयांमध्ये)
भाजी आधी आता
मटार 100 240
गवार 80 120
काकडी 60 80
भेंडी 80 140
दुधी 60 100
पालक जुडी 20 60
मिरची 80 120
लसूण 120 200
कोबी 40 80
फ्लॉवर 60 100

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

क्षण आनंदाचा… सण नात्यांचा! क्षण आनंदाचा… सण नात्यांचा!
‘मनसे’च्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे दिवाळीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर ‘दीपोत्सव’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सोहळ्याच्या प्रवेशद्वारावर उभारलेली आकर्षक कमान आणि...
मुंबई पुणे महामार्गावर प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी, जुना मार्ग वापरण्याचा अनेकांचा सल्ला
महायुती सरकारमध्ये छगन भुजबळ मंत्री आहेत , 2 सप्टेंबरचा जीआर रद्द करण्याची जबाबदारी त्यांची – विजय वडेट्टीवार
यात्रेवरून परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, पिकअप गाडीचा भीषण अपघात; सात जण ठार
वेल्डिंग करताना टँकरचा स्फोट; खानावळ चालकाचा दुर्दैवी मृत्यू
दंगल फेम अभिनेत्री जायरा वसीमने केला निकाह; सोशल मीडियावर फोटो केले शेअर
मुंबईहून जगन्नाथपुरीला जाणाऱ्या कारचा समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, म्यानमारच्या दोन नागरिकांचा जागीच मृत्यू