कोल्हापूर ते संगमेश्वर व्हाया पंढरपूर-कराड-मुंबई, अल्पवयीन मुलीच्या सुटकेचा थरार; रिक्षाचालकाच्या प्रसंगावधनामुळे अनर्थ टळला

कोल्हापूर ते संगमेश्वर व्हाया पंढरपूर-कराड-मुंबई, अल्पवयीन मुलीच्या सुटकेचा थरार; रिक्षाचालकाच्या प्रसंगावधनामुळे अनर्थ टळला

संगमेश्वर तालुक्यातील कोंडिवरे येथील रिक्षा चालकाच्या प्रसंगसावधानतेमुळे व माखजन पोलिसांच्या तत्परतेमुळे एका अल्पवयीन मुलीची सुटका झाली आहे. कोल्हापूर, पंढरपूर, कराड आणि संगमेश्वर अशा वेगवेगळ्या ठिकाणी तरुणीला डांबून ठेवण्यात आलं. अखेर तिने संधी साधत घरातून पळ काढला. रिक्षा चालक इरफान खान यांनी वेळीच मुलीला पोलिसांच्या हवाली केल्याने तिला सुखरूप कुटुंबियांच्या स्वाधिन करण्यात आलं आहे. तसेच आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंडीवरे येथील रिक्षाचालक इरफान खान हा आपल्या ताब्यातील रिक्षा घेऊन आरवलीकडे चालला होता. याच दरम्यान कर्नाटक मधील एक मुलगी आरवली बाजूकडे रस्त्याने धावत चालली होती. इरफान खान यांनी आपली रिक्षा थांबवून तिची विचारपूस केली असता आपल्याला पळवून आणलेले आहे, असे सांगून ती रडू लागली. ही बाब रिक्षा चालक इरफान खान यानी लागलीच माखजन पोलीस दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विवेक साळवी यांना कळविली. पोलिसांनी तत्परता दाखवून या अल्पवायीन मुलीला ताब्यात घेतले व कर्नाटकातील पोलिसांशी संपर्क साधला.
पोलिसांनी तिच्याकडे चौकशी केली असता या 17 वर्षीय मुलीने आपले नाव सांगून आपण आदर्श नगर निपाणी, जि. बेळगाव कर्नाटक येथील असल्याची माहिती दिली. तसेच सध्या इयत्ता अकरावी कॉमर्स मध्ये कागल ता. कोल्हापूरमधील कॉलेजमध्ये शिकत असल्याचे सांगितले. दिनांक 20 सप्टेंबर 2025 रोजी कॉलेजला आले असता कागल बस स्टँडवर माझा वर्गमित्र विघ्नेश संजय गुरव (कागल) याने मला हत्याराचा धाक दाखवला आणि एसटी बसने पंढरपूर येथे घेऊन गेला. माझा मोबाईल फोडून सीम तोडून टाकले.  त्याने मला शस्त्राचा धाक दाखवून पंढरपूर येथे त्यानंतर मुंबई दादर येथे तेथून परत पंढरपूर, कराड आणि चार दिवसांपूर्वी संगमेश्वर तालुक्यातील बुरंबाड बौद्धवाडी या ठिकाणी त्याची आई अश्विनी संजय गुरव सोबत घेऊन आला.
यादरम्यान विघ्नेश गुरव याने बळजबरी केलेली असून त्याने ठार मारण्याची धमकी दिली होती तसेच बुरंबाड येथील घरामध्ये कोंडून ठेवले होते. 1 ऑक्टोबर 2025 रोजी विघ्नेश आणि त्याची आई कोल्हापूर येथे निघून गेली होती. त्यामुळे आज विघ्नेश याची आजी नंदा प्रभाकर पवार (रा. बुरंबाड बौद्धवाडी)  दुपारी झोपलेली असताना संधीचा फायदा घेत ही तरुणी घराचा मागील दरवाजा उघडून बाहेर पळून गेली. ही तरुणी आरवलीकडे जात असताना रिक्षा चालक इरफान खान यांनी पाहिले व पोलिसांच्या ताब्यात दिले.
माखजन पोलिसांनी इचलकरंजी येथील तिचा मामा विशाल विनोद रावळ यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आम्ही सदर मुलगी बेपत्ता झाल्या बाबत निपाणी शहर पोलीस ठाणे कर्नाटक येथे तक्रार दिलेली असल्याच सांगितलं. संगमेश्वर पोलिसांनी निपाणी पोलिसांशी संपर्क साधल्यावर निपाणी पोलिसांनी संगमेश्वर येथे येऊन मुलीला ताब्यात घेतले असून अपहरण करणारा तरुण विघ्नेश संजय गुरव याच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

वेल्डिंग करताना टँकरचा स्फोट; खानावळ चालकाचा दुर्दैवी मृत्यू वेल्डिंग करताना टँकरचा स्फोट; खानावळ चालकाचा दुर्दैवी मृत्यू
कामगार चौकात ऑइल टैंकरला वेल्डिंग करत असताना टँकरच्या टाकीचा अचानक स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की, या टाकीचा...
दंगल फेम अभिनेत्री जायरा वसीमने केला निकाह; सोशल मीडियावर फोटो केले शेअर
मुंबईहून जगन्नाथपुरीला जाणाऱ्या कारचा समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, म्यानमारच्या दोन नागरिकांचा जागीच मृत्यू
अफगाणिस्तानमध्ये जर जय व अमित शहा असते तर सट्टेबाजीसाठी ते देखील पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळले असते, संजय राऊत यांची जोरदार टीका
मतदार यादीतीला घोटाळा हा मराठी माणसाची पिछेहाट करण्यासाठी – संजय राऊत
जमीन खरवडून गेली, आता पाण्यावरची शेती! धाराशिवच्या पालकमंत्र्याचा ‘प्रताप’
मेहुल चोक्सीच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा, बेल्जियम कोर्टाची मान्यता