अशा मेळाव्यामधून भुंकल्याशिवाय रामदास कदमांसारख्या श्वानांना कुणी किंमत देत नाही, भास्कर जाधव यांची जोरदार टीका
शिवसेनेचे गटनेते, आमदार भास्कर जाधव यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना मिंधे गटातील नेते रामदास कदम यांच्यावर जोरदार टीका केली. ”मिंधे गट स्थापन होऊन तीन वर्ष झाली. तीन वर्षात रामदास कदम यांना कधीच कुणी त्यांचे विचार मांडायला, भाषण द्यायला बोलावलं नाही. त्यामुळे अशा मेळाव्यामधून भुंकल्याशिवाय रामदास कदमांसारख्या श्वानांना कुणी किंमत देत नाही”, अशी जोरदार टीका भास्कर जाधव यांनी रामदास कदम यांच्यावर केली.
”नगरसेवकामधून पुढे येत दोन वेळा तू आमदार झालास. त्यामुळे तू मुंबईसाठी काय केलंस ते सांगायला हवं. एकिकडे आम्ही शिवसेनाप्रमुखांचे शिवसैनिक म्हणायचं आणि त्याच शिवसेनाप्रमुखांवर अश्लाघ्य टीका करायच्या अशा पद्धतीचे हे रामदास कदमांसारखे बारदास कदम, छम छम बारवाले, महिलांनी पैसे कमवायचे आणि यांनी उडवायचे ज्याला xxxxx म्हणतात. अशा xxxxx करणाऱ्या माणसांकडून असेच उद्गार अपेक्षित असतात. त्यांच्याकडून चांगलं प्रबोधन, चांगले विचार व्यक्त होत नाही. ज्या शिवसेनेने 32 वर्ष यांना लोकप्रतिनिधी केलं त्याची कृतज्ञता यांच्याकडून व्यक्त होणार नाही कारण ही कृतघ्न माणसं आहेत. रामदास कदम हे शिंदे सेनेचे नेते आहेत. हा पक्ष स्थापन होऊन तीन वर्ष झाली. मात्र या तीन वर्षात कधी कुणी यांना विचार मांडायला बोलावलं आहे का? महाराष्ट्रात कुणीतरी कुठेतरी यांना भाषण द्यायला नेता म्हणून बोलवलं आहे का? त्यामुळे अशा मेळाव्यामधून भुंकल्याशिवाय रामदास कदमांसारख्या श्वानांना कुणी किंमत देत नाही”, असे भास्कर जाधव म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List