आहारामध्ये कडधान्य समाविष्ट करताना या टिप्सचा वापर करा, वाचा सविस्तर

आहारामध्ये कडधान्य समाविष्ट करताना या टिप्सचा वापर करा, वाचा सविस्तर

आपल्या साध्या सोप्या सवयी या आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानल्या जातात. साध्यासोप्या सवयींमुळे आपले आरोग्य उत्तम राहते. आता हेच बघा ना, सकाळी उठल्यावर भिजलेले कडधान्य खाण्याचेही अनेक फायदे आहेत.
 भिजवलेल्या चण्यांमध्ये प्रथिने, फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे मुबलक प्रमाणात आढळतात, ज्यामुळे शरीर ऊर्जावान आणि निरोगी राहते. भिजवलेले हरभरा खाल्ल्याने शरीराला संपूर्ण पोषण मिळते म्हणूनच त्याला सुपरफूड असंही म्हटलं जातं.
https://www.saamana.com/make-spicy-tangy-green-chilli-pickle-in-10-minutes-for-mouthwash/
रिकाम्या पोटी भिजवलेले चणे खाल्यामुळे, पचनक्रिया मजबूत होते. तसेच बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून मुक्ती मिळते आणि पोटही स्वच्छ होते.

 

चण्यामध्ये प्रथिने, जस्त आणि इतर खनिजे असतात, जे केस आणि त्वचेचे आरोग्य राखतात. हे त्वचेला नैसर्गिक चमक देण्यास आणि केसांना मजबूत करण्यास मदत करते.

आहारात पालक सूप पिण्याचे होतील अगणित फायदे, वाचा

भिजवलेल्या चण्यामध्ये कार्बोहायड्रेट्स आणि प्रथिनांचा चांगला स्रोत आहे, जो दिवसभर शरीराला ऊर्जावान ठेवतो. हे विशेषतः व्यायाम करणाऱ्या किंवा शारीरिक श्रम करणाऱ्यांसाठी फायदेशीर आहे.

 

चण्यामध्ये कमी ग्लायसेमिक इंडेक्स असतो. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत होते. म्हणूनच भिजवलेले चणे मधुमेही रुग्णांसाठी हा एक चांगला आहार मानला जातो.

चण्यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस असते, जे हाडे मजबूत करण्यास मदत करतात. भिजवलेले चणे नियमित खाल्ल्याने हाडांची कमजोरी दूर होते.

थायरॉईड नियंत्रित करण्यासाठी हे पदार्थ खायलाच हवेत, वाचा

भिजवलेल्या चण्यात अँटीऑक्सिडंट्स आणि आवश्यक पोषक घटक असतात, जे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. यामुळे आजार दूर राहतात आणि शरीर अधिक निरोगी राहते.

रात्रभर हरभरा पाण्यात भिजत ठेवा आणि सकाळी रिकाम्या पोटी मूठभर हरभरा खा.

तुम्हाला कोणताही आजार किंवा इतर कोणतीही समस्या असेल तर चणे खाण्यापूर्वी एकदा डॉक्टरांचा सल्ला घ्या.
आपल्याकडे अन्न हे पूर्णब्रम्ह म्हणून ओळखले जाते. म्हणूनच आहाराच्या बाबतीत आपल्या सवयी या पूर्वापार चालत आलेल्या आहेत. पूर्वीच्या काळी घरातील जुनी जाणती माणसं सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेले हरभरे म्हणजेच चणे खाण्यास सांगायचे. ही एक साधी पण खूप फायदेशीर सवय होती.
Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मुंबईहून जगन्नाथपुरीला जाणाऱ्या कारचा समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, म्यानमारच्या दोन नागरिकांचा जागीच मृत्यू मुंबईहून जगन्नाथपुरीला जाणाऱ्या कारचा समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, म्यानमारच्या दोन नागरिकांचा जागीच मृत्यू
मुंबईहून जगन्नाथपुरीला जाणाऱ्या कारचा समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला असून यात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. मयत म्यानमार या देशातील...
अफगाणिस्तानमध्ये जर जय व अमित शहा असते तर सट्टेबाजीसाठी ते देखील पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळले असते, संजय राऊत यांची जोरदार टीका
मतदार यादीतीला घोटाळा हा मराठी माणसाची पिछेहाट करण्यासाठी – संजय राऊत
जमीन खरवडून गेली, आता पाण्यावरची शेती! धाराशिवच्या पालकमंत्र्याचा ‘प्रताप’
मेहुल चोक्सीच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा, बेल्जियम कोर्टाची मान्यता
Photo – क्षण आनंदाचा… सण नात्यांचा!
पंजाबमध्ये ‘बर्निंग ट्रेन’चा थरार; लुथियानाहून दिल्लीला जाणाऱ्या गरीब रथ एक्सप्रेसला आग, एक महिला जखमी