Pandharpur News – श्री विठ्ठल आणि रूक्मिणी मातेस पारंपरिक पोशाखासह अलंकार परिधान

Pandharpur News – श्री विठ्ठल आणि रूक्मिणी मातेस पारंपरिक पोशाखासह अलंकार परिधान

परंपरेप्रमाणे खंडेमहानवमी दसऱ्यानिमित्त श्री विठ्ठल व माता रुक्मिणीला पारंपारिक पोषाखासह अलंकार परिधान करण्यात आले. रूक्मिणी मातेस श्री विजयालक्ष्मी पोशाख परिधान करण्यात आला. श्री विठ्ठलास सोन्याची पगडी, नामनिळाचा, कौस्तुभ मणी, दंड पेठ्या जोड, कंगन जोड, हिऱ्याचा मोत्याचा तुरा, शिरपेच लहान, मोत्याची एक पदरी आणि दोन पदरी कंठी, बाजीराव कंठा, पुतळ्यांची माळ, मोहरांची माळ, तुळशीची एक पदरी माळ, बोरमाळ तीन पदरी, हिऱ्यांचे पैंजण, नवरत्नांचा हार, सोन्याचे घोंगडे, चांदीची कंठी, सोन्याचे पितांबर, सोन्याचे तोडे जोड, लॉकेट इ. अलंकार परिधान करण्यात आल्याचे मंदिर समितीचे प्रभारी व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत यांनी सांगितले.

तसेच रुक्मिणी मातेस जडावाचा मुकुट, तन्मणी मोठा, खड्यांच्या पाटल्या जोड, मोठी नथ, कर्णफुले जोड, सूर्य, चंद्र, जडावाचे तारवाड जोड, चिंचपेटी हिरवी, हातसर जोड, खड्यांची वेणी, जडावाचा हार, तन्मणी लहान, मोत्याचा कंठा लहान, पाचूची गरसोळी, बाजीराव गरसोळी, खड्याची बिंदी, जाडावाचे बाजूबंद जोड, रूळ जोड, पैंजण जोड, सोन्याचा करंडा, मस्त्य जोड, तारामंडळ, तोडे जोड, सोनाचे बाजूबंद जोड, दशावतारी हार, मद्रासी कंठा, शिन्देहार तीन पदरी, मास पट्टा, सोने साडी, छत्रछामार इत्यादी अलंकार परिधान करण्यात आलेले आहेत.

राधिका मातेस नक्षी टोप, मोत्याचा कंठा मोठा, हायकोल, चिंचपेटी तांबडी, ठुशी आणि सत्यभामा देवीला सिद्धेस्वर टोप, लक्ष्मीहार मोहरांची माल, जवमनी पदक इत्यादी अलंकार व परंपरेप्रमाणे पोशाख परिधान करण्यात आलेले आहेत. तसेच मंदिर समितीच्या अख्त्यातरीत असलेल्या पंढरपूर शहर व परिसरातील लखुबाई, अंबाबाई, पद्मावती, यल्लमादेवी, यमाई-तुकाई माता आदी परिवार देवतांना देखील पारंपारिक पोषाख करण्यात आल्याचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

बाजारपेठेत बॅरिकेट लावून अडवणूक करू नका, शिवसेनेचे करवीर पोलिसांना निवेदन बाजारपेठेत बॅरिकेट लावून अडवणूक करू नका, शिवसेनेचे करवीर पोलिसांना निवेदन
ऐन दिवाळीत बाजारपेठा गर्दीने फुलून गेल्या असताना, मध्यभागी बॅरिकेट लावून वाहनांची अडवणूक होत असल्याने त्याचा व्यापारावर परिणाम दिसून येत आहे....
स्वस्तात प्लॉटच्या आमिषाने 15 लाखांची फसवणूक; बांधकाम व्यावसायिकावर गुन्हा दाखल
Ahilyanagar news – भाजपचे ज्येष्ठ आमदार शिवाजी कर्डीले यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
5 कोटी रोख, दीड किलो सोनं, लक्झरी कार अन्… पोलीस उपमहानिरीक्षकांच्या घरात सापडलं घबाड; लाचखोरी प्रकरणात अटक
चंद्रपुरात शेतकरी संघटनेच्या वतीने शासन निर्णयाच्या प्रतीची होळी; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
बेस्ट कर्मचाऱ्यांना तातडीने बोनस द्या, अन्यथा चक्का जाम; बेस्ट कामगार सेनेचा प्रशासनाला जोरदार इशारा
पत्नीने हनीट्रॅप लावून पतीचा काटा काढला; प्रियकराच्या मदतीने रचला हत्येचा कट, नागोठणे पोलिसांनी 72 तासांत केला उलगडा