भरधाव बस दुर्गा मातेच्या मंडपात घुसली, 20 जणांना चिरडले; सहा जणांची प्रकृती गंभीर
भरधाव बसने नवरात्री कार्यक्रमात घुसल्याने 20हून अधिक जण जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. जखमींपैकी सहा जणांची प्रकृती गंभीर आहे. सर्व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बस मंडपात घुसताच लोक जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळू लागले. यामुळे मंडपात चेंगराचेंगरी झाली.
जबलपूरमधील सिहोरा येथे मंगळवारी रात्री उशिरा ही घटना घडली. भरधाव बस दुर्गा मातेच्या मंडपात घुसल्याने अपघाताची घटना घडली. सदर बस कटनीहून जबलपूरला चालली होती. यादरम्यान बसचालक दारुच्या नशेत असल्याने सिहोरा गौरी चौकाजवळ त्याचं बसवरील नियंत्रण सुटलं. यामुळे बस थेट मंडपात घुसली आणि 20 हून अधिक जणांना चिरडले.
जखमींना तात्काळ सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले. गंभीर जखमींना प्राथमिक उपचारानंतर जबलपूरमधील नेताजी सुभाषचंद्र बोस मेडिकल कॉलेजमध्ये रेफर करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List