कीटकनाशक पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या खासदाराचा कार्डियक अरेस्टने मृत्यू

कीटकनाशक पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या खासदाराचा कार्डियक अरेस्टने मृत्यू

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना तमिळनाडूतील मारूमालारची द्रविड मुन्नेत्र कळघम (एमडीएमके) पक्षाचे खासदार ए. गणेशमूर्ती यांचे निधन झाले आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी कीटकनाशक पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारांदरम्यान त्यांचा कार्डियक अरेस्टने मृत्यू झाला. ‘एएनआय’ने याबाबत वृत्त दिले आहे.

तमिळनाडूतील इरोड मतदारसंघाचे विद्यमान खासदार A. Ganeshamurthi यांनी 24 मार्च रोजी कीटकनाशक पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरू होते. मात्र गुरुवारी सकाळी पाचच्या सुमारास कार्डियक अरेस्टमुळे त्यांची प्राणज्योत मालवली.

24 मार्चला सकाळच्या सुमारास ए. गणेशमूर्ती यांची तब्येत बिघडली. त्यानंतर कुटुंबियांनी तातडीने त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी केली असता त्यांनी कीटकनाशक घेतल्याचे निष्पन्न झाले. प्रकृती गंभीर असल्याने त्यांना कोयंबतूर येथील एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. तिथे त्यांना अतिदक्षता विभागामध्ये व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.

ए. गणेशमूर्ती हे तमिळनाडूतील इरोड मतदारसंघाचे विद्यमान खासदार होते. 2019मध्ये मारूमालारची द्रविड मुन्नेत्र कळघमच्या तिकीटावर ते लोकसभेमध्ये निवडून गेले होते. आता ऐन लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांचे निधन झाल्याने पक्षाला मोठा धक्का बसला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;