Jalgaon Honor Killing : CRPF च्या माजी अधिकाऱ्याकडून गरोदर मुलीचा खून, पहिल्यांदा गरोदर असताना करायला लावला गर्भपात

Jalgaon Honor Killing : CRPF च्या माजी अधिकाऱ्याकडून गरोदर मुलीचा खून, पहिल्यांदा गरोदर असताना करायला लावला गर्भपात

जळगावमध्ये CRPF चे माजी अधिकारी किरण मंगलेने मुलीचा गोळ्या घालून खून केला होता. ती मुलगी तीन महिन्यांची गरोदर होती अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. इतकंच नाही तर मंगले याने आपल्या मुलीला जबरदस्तीने गर्भपात करायला लावला होता.

हिंदुस्तान टाईम्सने याबाबत वृत्त दिले आहे. तृप्ती मंगलेने आई वडिलांच्या इच्छेविरोधात अविनाश वाघ याच्याशी लग्न केले होते. म्हणून तृप्तीचे वडिल किरण मंगले याच्या मनात राग होता. अविनाश वाघ याची बहीण संस्कृती वाघचे लग्न ठरले होते. संस्कृतीची हळद सुरू असताना किरण तिथे आपला मुलगा निखिलसोबत तिथे आला आणि किरणने मुलगी तृप्ती आणि जावई अविनाशवर गोळ्या झाडल्या. त्यात तृप्तीचा जागेवरच मृत्यू झाला. अविनाशवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

धक्कादायक म्हणजे तृप्ती तीन महिन्यांची गरोदर होती. इतकंच नाही तर तृप्ती लग्नानंतर जेव्हा पहिल्यांदा गरोदर होती तेव्हा किरणने तिला जबरदस्तीने गर्भपात करायला लागवा. तृप्तीच्या सासू प्रियंका वाघ म्हणाल्या की तृप्ती आणि अविनाशचे लग्न झाल्यानंतर काही महिन्यात तृप्ती गरोदर राहिली. तेव्हा किरण तृप्तीच्या सासरी आला आणि माफी मागायला लागला. किरण तृप्तीला माहेरपणासाठी घरी नेले. पण तिथे किरणने तृप्तीवर गर्भपात करायला दबाव आणला आणि तिने गर्भपात केला. त्यानंतर तृप्तीने तिथून कसाबसा पळ काढला आणि सासरी निघून आली.

तृप्तीच्या सासू प्रियंका वाघ यांनी सांगितले की जेव्हा प्रियंकाला गोळ्या घातल्या तेव्हा ती तीन महिन्यांची गरोदर होती. तृप्तीच्या मृत्यूनंतर वडिल किरण मंगलेला पोलिसांनी अटक केली. पण तृप्तीच्या आईने तिचा मृतदेहही ताब्यात घेण्यास नकार दिला. तेव्हा तृप्ती माझ्या मुलीसारखीच होती असे म्हणत तिच्या सासू प्रियंका वाघ यांनी तृप्तीवर अंत्यंसस्कार केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

पुणे घालणार पर्यटकांना साद पुणे घालणार पर्यटकांना साद
सांस्कृतिक राजधानी, शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळखलं जाणारं पुणे आता पर्यटनातही बाजी मारणार आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी जिल्ह्याचा शाश्वत पर्यटनविकास आराखडा...
कोल्हापूर जिल्हा बँकेच्या वारणानगर शाखेत सव्वातीन कोटींचा अपहार, एका महिलेसह चौघांना अटक; शाखाधिकारी फरार
तरुणांना नशामुक्त करण्यासाठी पोलीस इन अ‍ॅक्शन, सांगलीतील 59 ‘डार्क स्पॉट ‘वर करडी नजर
पाकड्यांची झोप उडाली; हिंदुस्थान पुढील 24 ते 36 तासांत हल्ला करणार, मध्यरात्री PC घेत मंत्र्यांची माहिती
कोलकातामध्ये अग्नितांडव; हॉटेल ऋतुराजमध्ये लागलेल्या आगीत 14 जणांचा मृत्यू
Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 30 एप्रिल 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस
राजकारण्यांनी आमच्या भावनांशी खेळू नये! संतोष जगदाळेंच्या पत्नीची विनवणी