Pahalgam Terror Attack – पर्यटकांवरील भ्याड हल्ल्याचा निषेध, केंद्राचे पोकळ दावे उघड, राहुल गांधींची टीका

Pahalgam Terror Attack – पर्यटकांवरील भ्याड हल्ल्याचा निषेध, केंद्राचे पोकळ दावे उघड, राहुल गांधींची टीका

जम्मू कश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात एका पर्यटकाचा मृत्यू झाला तर 12 पर्यटक जखमी झाले आहेत. या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. काँग्रेस खासदार व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ट्विटरवरून या हल्ल्याचा निषेध केला आहे व या घटनेवरून केंद्र सरकारला फटकारले आहे.

”जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात एका पर्यटकाचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले आहेत. ही बातमी अत्यंत निंदनीय आणि धक्कादायक आहे. आहे. शोकाकुल कुटुंबांप्रती मी संवेदना व्यक्त करतो आणि जे जखमी झालेयत ते लवकरात लवकर बरे होतील अशी आशा करतो”, असे त्यांनी ट्विट केले आहे.

या ट्विटसोबत त्यांनी केंद्र सरकारलाही फटकारले आहे. ”संपूर्ण देश दहशतवादाविरुद्ध एकजूट आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये परिस्थिती सामान्य असल्याचे पोकळ दावे करण्याऐवजी, केंद्र सरकारने आता जबाबदारी घेत भविष्यात अशा क्रूर घटना घडू नये म्हणून आणि निष्पाप नागरिकांना आपले प्राण गमवावे लागू नये म्हणून ठोस पाऊले उचलायला हवीत’, असेही त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

पतंजली संबंधित अन्नाचे फॅक्ट आणि नियम पाळाल, तर आरोग्य सुदृढ होईल… पतंजली संबंधित अन्नाचे फॅक्ट आणि नियम पाळाल, तर आरोग्य सुदृढ होईल…
आपण खात असलेले अन्न आणि आरोग्य यांचा एकमेकांशी घनिष्ट संबंध आहे. तुम्हाला निरोगी राहायचे असेल केवळ पोषक तत्वांनी समृद्ध अन्न...
समुद्राची पातळी इतक्या वेगाने का वाढत आहे? नासाच्या शास्त्रज्ञांनी सांगितले कारण
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून चालकासह तिघांचा मृत्यू
मुंबईत मॉक ड्रीलदरम्यान काय होणार, ब्लॅकआऊट कुठे आणि कधी? जाणून घ्या A टू Z माहिती
राज्यात ठिकठिकाणी अवकाळी पाऊस, पुढील 3 तास धोक्याचे, हवामान विभागाचा अंदाज काय?
स्थानिक स्वराज्य संस्थांतील लोकशाहीची पायमल्ली होऊ देणार नाही, न्यायालयाचा हा निर्णय आश्वासक – सुप्रिया सुळे
मुंबई, ठाण्यासह राज्यात पावसाची हजेरी, वादळी वाऱ्यासह कोसळल्या हलक्या सरी