Summer Care- उन्हाळ्यात पित्ताच्या त्रासावर फक्त एक चमचा हा पदार्थ खा! गर्मीच्या दिवसातला थंड उतारा.. वाचा सविस्तर

Summer Care- उन्हाळ्यात पित्ताच्या त्रासावर फक्त एक चमचा हा पदार्थ खा! गर्मीच्या दिवसातला थंड उतारा.. वाचा सविस्तर

उन्हाळा आणि पित्त हे एकमेकांच्या हातात हात घालून येतात. उन्हाळ्यात बहुतांशी लोकांना पित्ताचा त्रास हा मोठ्या प्रमाणात होतो. म्हणूनच उन्हाळा सुरु व्हायला लागल्यावर, घरातील जाणती माणसं कायम गुलकंद खाण्याचा सल्ला देतात. गुलकंद हा गर्मीच्या दिवसातला थंड उतारा मानला जातो. गुलकंद हा खासकरून उन्हाळ्यात किमान एक चमचा खाणे खूप गरजेचे आहे.

गुलकंद हा कोणत्याही गुलाबापासून बनत नसून, केवळ देशी गुलाबापासूनच गुलकंद तयार करण्यात येतो. गुलकंद तयार करण्यासाठी गुलाबाच्या पाकळ्या आणि साखर या दोन गोष्टी प्रामुख्याने वापरल्या जातात. उन्हाळ्यातील अनेक त्रासांवर गुलकंद हा रामबाण इलाज आहे.

गुलकंद खाण्याचे आरोग्यासाठी काय फायदे होतात.

उन्हाळ्यात पित्ताचा त्रास उफाळून येताे अशावेळी किमान एक चमचा गुलकंद खाणे हे खूप फायदेशीर ठरते. पोटातील जळजळ अपचन यासारख्या त्रासांवर गुलकंद खाण्याचा सल्ला दिला जातो.

रक्तशुद्धीसाठी गुलकंद हा एक खात्रीशीर उपाय मानला जातो. गुलकंदाच्या सेवनामुळे रक्तशुद्धी होते त्याजोडीला त्वचेला उजाळा देखील मिळतो.

चेहऱ्यावरील मुरुम, पिंपल्स तसेच काळे डाग गुलकंदाच्या सेवनाने कमी होतात. त्याचबरोबर ब्लॅकहेडस्ची समस्याही खूप मोठ्या प्रमाणात कमी होते.

 

शाळेत जाणाऱ्या मुलांना नियमितपणे गुलकंद दिल्यास, त्यांची स्मरणशक्ती वाढण्यास खूप मदत होते. म्हणूनच अनेक पालक मुलांसाठी खास गुलकंद घरी बनवणे पसंत करतात.

 

लघवीला जळजळ होण्याचे प्रमाण उन्हाळ्यात वाढते. याचबरोबर तोंडात फोड येण्याचेही प्रमाण खूप वाढते. अशावेळी गुलकंद खाण्यामुळे हे त्रास कमी होऊ शकतात.

 

गुलकंद आतड्यांच्या आरोग्यासाठी आवर्जून खायला हवा. ज्यांना बद्धकोष्टतेचा त्रास वारंवार होतो त्यांना डाॅक्टर किमान चमचाभर गुलकंद खाण्यास सांगतात.

 

गुलकंदामध्ये मॅग्नेशियमचे प्रमाण जास्त असते. मॅग्नेशियम हे रक्तदाब आणि साखरेची पातळी उत्तम राखण्यासाठी मदत करतात त्यामुळे हृद्य निरोगी राहण्यास खूप मदत होते. म्हणूनच निरोगी हृद्यासाठी गुलकंद खाणे हे खूप गरजेचे आहे.

(कोणताही उपाय करताना तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;