शाहरुख खान इन्स्टाग्रामवर फाॅलो करतो फक्त या 5 महिलांना! कोण आहेत त्या? वाचा सविस्तर

शाहरुख खान इन्स्टाग्रामवर फाॅलो करतो फक्त या 5 महिलांना! कोण आहेत त्या? वाचा सविस्तर

सेलिब्रिटी आणि त्यांचे इन्स्टाग्राम अकाऊंटस् हे फॅन्ससाठी कायम चर्चेचा विषय असतात. खासकरून आपला आवडता सेलिब्रिटी कुणाला फाॅलो करतो हे फॅन्स लक्ष ठेवतात. आपला बाॅलीवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खान इन्स्टाग्रामवर केवळ ६ जणांना फाॅलो करतो. बाकी त्याला फाॅलो करणाऱ्यांची संख्या ही 4 कोटींपेक्षा जास्त आहे. शाहरुखने कायमच त्याच्या आत्तापर्यंतच्या आयुष्यात कुटूंबाला प्राधान्य दिलेले आहे.

शाहरुखने इंडस्ट्रीमध्ये अनुष्का शर्मा, दीपिका पादुकोण या दोघींना ब्रेक दिला. परंतु तो या दोघींनाही इन्स्टाग्रावर फाॅलो करत नाही. केवळ इतकेच नाही तर, शाहरुखच्या फाॅलो लिस्टमध्ये त्याचा जिगरी दोस्त करण जोहर आणि इतर खान मंडळी देखील नाहीत. तसेच इतर कुठल्याही अभिनेत्रीला शाहरुखने फाॅलो केलेलेही दिसत नाही. शाहरुखची आवडती दिग्दर्शिका फराह खानला सुद्धा शाहरुखच्या फाॅलो लिस्टमध्ये स्थान नाही. शाहरुखच्या फाॅलो लिस्टमधील या महिलाही त्याच्या तितक्याच जवळच्या आणि खास मानल्या जातात. या महिला कोण आहेत त्या काय करतात हे पाहुया.

 

 

 

आलिया छिबा– या नावाला शाहरुखने फाॅलो केले आहे. आलिया ही शाहरुखच्या मेव्हण्याची मुलगी असून, तिचे खरे नाव आलिया छिब्बर असे आहे. आलिया ही शाहरुखच्या मुलीच्या म्हणजेच सुहाना खानसोबत अनेकांनी पाहिली आहे. आलिया ही दिसायला सुंदर असल्यामुळे, सुहाना खानपेक्षा हिचे फाॅलोअर्स जास्त आहेत.

 

पूजा ददलानी– ही शाहरुख खानची मॅनेजर असून, शाहरुखसोबत ही 2012 पासून काम करत आहे. सध्याच्या घडीला इंडस्ट्रीमधील सर्वात महाग मॅनेजर म्हणून पूजाची ख्याती आहे. पूजा ही शाहरुखसोबत अनेकदा आपल्याला दिसते.

 


गौरी खान- शाहरुखची धर्मपत्नी गौरी ही सर्वांनाच माहित आहे.

सुहाना खान- ही शाहरुखची लेक असून, शाहरुखने हिलाही फाॅलो केले आहे.

 

काजल आनंद– उर्फ बाॅलीवुडमधील पुटलू हिलाही शाहरुखने फाॅलो केले आहे. काजल आनंद ही बाॅलीवुडमधील सर्वांची लाडकी मैत्रिण म्हणून ओळखली जाते. पेशाने वकिल असलेली काजल ही अनेक सेलिब्रिटींच्या खासगी पार्ट्यांमध्ये पाहायला मिळते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List