वरळी हिट अ‍ॅण्ड रन प्रकरण; न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला, मिहीर शहाला हायकोर्टाचा दणका

वरळी हिट अ‍ॅण्ड रन प्रकरण; न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला, मिहीर शहाला हायकोर्टाचा दणका

वरळी हिट अॅण्ड रन प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या मिहीर शहा याला मुंबई उच्च न्यायालयाने आज चांगलाच दणका दिला. गुह्याचे गंभीर स्वरूप, घटनेनंतर ओळख लपवण्यासाठी आरोपी शहाचे वर्तन तसेच पुराव्यांशी आरोपीकडून छेडछाड होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे स्पष्ट करत न्यायमूर्ती नीला गोखले यांनी आरोपी मिहीर शहाचा जामीन अर्ज फेटाळून लावला.

वरळी येथे 7 जुलै 2024 रोजी एका बीएमडब्ल्यू कारने नाखवा दाम्पत्याला जोरदार धडक दिली या अपघातात कावेरी नाखवा या महिलेचा मृत्यू झाला. बेदरकारपणे कार चालवून निष्पाप महिलेचा बळी घेतल्याप्रकरणी मिंधे गटाचा पदाधिकारी राजेश शहा याचा मुलगा मिहीर शहा याला पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी जामीन मिळावा यासाठी मिहीर शहा याने हायकोर्टात अर्ज दाखल केला होता.या अर्जावर न्यायमूर्ती निला गोखले यांच्या समोर सुनावणी घेण्यात आली. राज्य सरकारच्या वतीने मनकुवर देशमुख यांनी युक्तिवाद करताना आरोपी मिहीर शहाच्या अर्जाला जोरदार विरोध केला तर अपघातात मृत्यू झालेल्या कावेरी यांचे पती प्रदीप नाखवा यांनी सुद्धा मध्यस्थी याचिका दाखल करत आरोपीच्या जामीन अर्जाला जोरदार आक्षेप घेतला. न्यायालयाने नमूद केले की, या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असला तरी, खटला सुरू होणे बाकी आहे व या प्रकरणातील प्रमुख साक्षीदार असलेले स्कूटर चालक प्रदीप नाखवा यांची न्यायालयात साक्ष होणे अद्याप बाकी आहे. आरोपी साक्षीदारांवर दबाव आणण्याची शक्यता नाकारता येत नाही असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने मिहीर शहाचा जामीन अर्ज फेटाळून लावला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

अखेर पुणे महापालिकेचे उपायुक्त संदीप कदम यांची उचलबांगडी अखेर पुणे महापालिकेचे उपायुक्त संदीप कदम यांची उचलबांगडी
महापालिकेच्या घनकचरा विभागातील भोंगळ कारभार अखेर उपायुक्त संदीप कदम यांच्या पदावर गदा आणून गेला आहे. अनेक दिवसांपासून असलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर...
शहापूरमधील आदिवासींना मदतीचा हात, जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
डोंबिवलीतील बेशिस्त चालकांच्या दंडाचा फैसला, 12 डिसेंबरला लोक अदालत
वसईतील नव्या पुलाने एमआयडीसीतील रहिवाशांची नाकाबंदी, शिवसेनेने उठवला आवाज
अमित ठाकरेंवरील गुन्हा कदापि मान्य नाही, तो मागे घ्या! वनमंत्री गणेश नाईक यांचे स्पष्ट प्रतिपादन
घाटकोपर येथे ज्येष्ठ नागरिकाची हत्या
नवी मुंबईतील शिवसेना महिला पदाधिकारी जाहीर