घाटकोपर येथे ज्येष्ठ नागरिकाची हत्या
घाटकोपर येथे अज्ञात व्यक्तीने एका ज्येष्ठ नागरिकाच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण करून त्यांची हत्या केल्याची घटना घडली. याप्रकरणी घाटकोपर पोलीस ठाण्यात अनोळखी आरोपीविरोधात गुन्हा नोंदवून त्याचा शोध सुरू केला आहे.
विक्रोळी पश्चिमेला राहणारे सुरेंद्र पाचाडकर (65) हे मधुमेह आणि किडनीच्या आजाराने ग्रस्त होते. त्यामुळे त्यांना चालण्यास डॉक्टरांकडून सांगण्यात आले होते. त्यानुसार नियमितपणे ते संध्याकाळी चालण्यास जात होते. गुरुवारी संध्याकाळी देखील ते चालण्यास घराबाहेर पडले. मात्र ते घाटकोपर पश्चिमेकडील सीजीएस कॉलनी येथे डोक्याला गंभीर दुखापत झालेल्या अवस्थेत सापडले. त्यांना झायानोव्हा इस्पितळात नेले असता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. घाटकोपर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन चौकशी केली असता सुरेंद्र यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण करून एक अनोळखी व्यक्ती पळून गेल्याची माहिती पोलिसांना प्रत्यक्षदर्शी महिलेने दिली. त्यानुसार घाटकोपर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List