Vitamin : या व्हिटामिनच्या कमतरतेमुळे येतात घाणेरडे विचार, कोणते जीवनसत्त्व ते जाणून घ्या

Vitamin : या व्हिटामिनच्या कमतरतेमुळे येतात घाणेरडे विचार, कोणते जीवनसत्त्व ते जाणून घ्या

Vitamin B12 Deficiency Symptoms: शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी प्रथिने, जीवनसत्त्वे आणि मिनरल्सची गरज भासते. यामुळे शरीरच तंदुरुस्त होते असे नाही तर तुमचे मन, मूड आणि डोके पण शांत आणि नियंत्रित राहते. यातील एका व्हिटामिन्सची कमतरता जर सतत जाणवत असेल तर मग मन अशांत होते. टक्कूरं काम करत नाही. डोक्यात भनभन सुरु होते. अनेक वेळा आपली नाहक चिडचिड होत असल्याचे. अस्वस्थ वाटत असल्याची जाणीव आपल्याला होते. आपण मित्राकडे जरी गेलो तरी आपले मन कशातच रमत नसल्याचे जाणवते. हे सर्व व्हिटामिन बी12 (Vitamin B12) च्या कमतरतेमुळे घडते.

हे जीवनसत्व शरीरात रक्त पेशी तयार करण्यासाठी, डीएनए तयार करण्यासाठी आणि नर्व्हस सिस्टिम मजबूत करण्यासाठी मदत करते. जर शरीरात बी 12 ची कमतरता असेल तर त्याचा शरिरावरच नाही तर मनावरही मोठा परिणाम होतो. अनेकदा लोकांची चिडचिड वाढते. ते निराश होतात. त्यांच्यात नैराश्य वाढते. त्यांच्यात नकारात्मक विचार वाढतात. सोबतच घाणेरडे विचारही येतात. जर तुम्हाला पण असेच होत असेल, मानसिक थकवा जाणवत असेल तर ही सर्व लक्षणं व्हिटामिन बी12 च्या कमतरतेची असल्याचे समजून जा.

का येतात तसले विचार?

व्हिटामिन बी12 च्या कमतरतेमुळे डोक्यात नकारात्मकच नाही तर घाणेरडे विचारही येतात. (Which vitamin deficiency causes dirty or negative thoughts in the mind) व्हिटामिन बी12 केवळ शरीरालाच ताकद देते असे नाही तर डोकेही शांत ठेवते. मानसिक थकवा नाहीसा करते. मेंदुत असलेले हॅप्पी हर्मोन्स, सेरोटोनिन आणि डोपामिन संतुलित ठेवते. जेव्हा या व्हिटामिनची कमतरता भासते. तेव्हा मेंदुत हे हर्मोन्स तयार होत नाहीत. त्यामुळे व्यक्तीची चिडचिड वाढते. त्याला अस्वस्थ वाटते. त्याचे कुठेच आणि कशातच मन लागत नाही. त्यालाही जाणवते की आपण असे विचित्र का वागत आहोत. तर त्याचे उत्तर हे व्हिटामिन बी12 ची कमतरता हेच आहे.

व्हिटामिन बी12 कमतरतेचा परिणाम काय?

या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे नेहमी थकवा आणि सुस्ती राहते

  • श्वास घेण्यास नेहमी त्रास होतो. चक्कर येतात.
  • धमण्या कमकुवत जाणवतात. मान आणि पाठीमध्ये दुखते
  • हातपायामध्ये मुंग्या जाणवतात
  • कोणत्याही गोष्टीत लक्ष लागत नाही. स्मरणशक्ती कमकुवत होते

व्हिटामिन बी12 साठी काय खावे?

व्हिटामिन बी12 वाढवण्यासाठी काय खावे (What to eat to increase vitamin B12 naturally) ते पाहुयात. जर तुम्ही मासांहारी असाल तर चिकन, अंडे आणि मासे यांचा जेवणात समावेश करु शकता. जर तुम्ही शाकाहारी असाल तर दूध, दही आणि पनीर यांचा वापर करू शकता. फोर्टिफाइड सीरियल्स, सोया मिल्क आणि न्यूट्रिशनल यीस्ट हे खाणे पण फायदेशीर ठरू शकते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Pune News – पुण्यात पुन्हा गँगवार उफाळला, गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून तरुणाची हत्या Pune News – पुण्यात पुन्हा गँगवार उफाळला, गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून तरुणाची हत्या
पुण्यात शनिवारी पुन्हा एकदा गँगवार उफाळून आला. कोंढवा परिसरात गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून एका तरुणाची हत्या करण्यात आली....
मी कुणाला शब्द देत नाही आणि दिल्यास मागे हटत नाही, संपदाताईला न्याय मिळवून दिल्याशिवाय मागे हटणार नाही – मनोज जरांगे पाटील
Mumbai News – गोवंडीमध्ये रोख रकमेच्या वादातून नारळ विक्रेत्याची हत्या, आरोपीला अटक
प्रथिने आणि आर्यन समृद्ध असलेली तूर डाळ या लोकांसाठी ठरू शकते धोकादायक
PoK मध्ये मानवाधिकारांचे उल्लंघन थांबवा, हिंदुस्थानने संयुक्त राष्ट्रांमध्ये पुन्हा पाकिस्तानला फटकारले
Mega Block – रविवारी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक
युक्रेनचा रशियाला मोठा धक्का, मॉस्कोजवळील कोल्टसेव्हॉय पाइपलाइनवर केला हल्ला