PoK मध्ये मानवाधिकारांचे उल्लंघन थांबवा, हिंदुस्थानने संयुक्त राष्ट्रांमध्ये पुन्हा पाकिस्तानला फटकारले
हिंदुस्थानने पाकिस्तानचा ढोंगीपणा उघड करून पुन्हा एक कडक संदेश दिला आहे. पाकव्याप्त कश्मीरमध्ये (PoK) पाकिस्तानने मानवाधिकारांचे उल्लंघन थांबवावे, अशी मागणी केली आहे. पाकिस्तानी लष्कर बेकायदेशीरपणे व्यापलेल्या काश्मीरच्या भागात लोकांचे आंदोलन दडपत आहे, असा आरोप हिंदुस्थानने केला आहे.
हिंदुस्थानच्या संयुक्त राष्ट्र मिशनच्या सचिव भाविका मंगलानंदन यांनी शुक्रवारी म्हणाल्या की, “गेल्या काही आठवड्यात पाकिस्तानी सैन्याने आणि त्यांच्या सहयोगींनी कश्मीरच्या त्यांच्या ताब्यातील भागात आपल्या मूलभूत हक्कांसाठी आणि स्वातंत्र्यासाठी निदर्शने करणाऱ्या अनेक निष्पाप नागरिकांना ठार मारले आहे.”
त्या म्हणाल्या की, “आम्ही पाकिस्तानला आवाहन करतो की, त्यांनी बेकायदेशीरपणे व्यापलेल्या भागात होणारे गंभीर आणि सततचे मानवी हक्कांचे उल्लंघन थांबवावे, जिथे लोक उघडपणे पाकिस्तानच्या लष्करी कब्जा, दडपशाही, क्रूरता आणि संसाधनांच्या बेकायदेशीर वापराविरुद्ध बंड करत आहेत.”
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List