Parbhani Rain – परभणीत पुन्हा जोरदार पावसाचा हाहाकार; जिल्हा व सत्र न्यायालयात पाणीच पाणी, जनजीवन विस्कळीत

Parbhani Rain – परभणीत पुन्हा जोरदार पावसाचा हाहाकार; जिल्हा व सत्र न्यायालयात पाणीच पाणी, जनजीवन विस्कळीत

मागील काही दिवसांपासून संततधार कोसळणार्‍या पावसामुळे शेतकर्‍यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यात भर म्हणून आज (06 ऑक्टोबर 2025) पहाटे पुन्हा एकदा जोरदार पावसाने हजेरी लावत जिल्हा आणि शहरात अक्षरशः हाहाकार माजवला. दुपारनंतर काहीकाळ जनजीवन विस्कळीत झाले होते. तर शहरातील स्टेशन रोडवरील जिल्हा व सत्र न्यायालय परिसरात गुडगाभर पाणी साचल्यामुळे आज सोमवारी कामकाजाच्या दिवशी व्यत्यय आल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली होती.

अल्पावधीतच मुसळधार पावसामुळे शहरातील खानापूर फाटा, वसमत रोड, वांगी रोड, गंगाखेड रोड, जिंतूर रोड आणि कॉलन्यांतर्गत सखल भागात पाणी साचून वाहतुकीला मोठा अडथळा झाला. रस्त्यांवर आणि परिसरात नदीसदृश प्रवाह निर्माण झाला, तर अनेक ठिकाणी वाहने पाण्यात अडकली. नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण झाले होते. पावसाचा जोर सकाळी थोडासा कमी झाला असला तरी दुपारपर्यंत जनजीवन विस्कळीतच राहिले. बाजारपेठा ओस पडल्या, शाळा आणि महाविद्यालयांची वाहतूक ठप्प झाली. तसेच काही ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांचे हाल झाले. नाल्यांमध्ये ओसंडून पाणी आल्याने खालच्या भागातील घरांमध्ये पाणी शिरले होते. त्यामुळे रहिवाशांना स्वतःच्या ताकदीवर पाणी बाहेर काढावे लागले. परतीच्या या पावसामुळे शेतकर्‍यांची होती नव्हती ती पिकेही हातची गेली आहेत. आधीच नैसर्गिक आपत्तीने त्रस्त असलेला बळीराजा आता हतबल अवस्थेत आहे. प्रशासनाकडून अतिवृष्टीग्रस्त भागातील नुकसानाचा आढावा घेण्याचे काम सुरू असून, लवकरच पंचनामे करण्यात येतील, अशी माहिती मिळाली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

दिवाळीत पावसाची आतषबाजी! रायगड, नवी मुंबई, ठाण्यात वीज आणि ढगांच्या गडगडाटासह तुफान पाऊस दिवाळीत पावसाची आतषबाजी! रायगड, नवी मुंबई, ठाण्यात वीज आणि ढगांच्या गडगडाटासह तुफान पाऊस
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रीय झाल्याने मुंबई, ठाण्यासह राज्यभरात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात...
पंतप्रधान मोदींनी रशियाकडून तेल न खरेदी करण्याचे आश्वासन दिलं होतं का? ट्रम्प यांच्या दाव्यावर काँग्रेसचा सवाल
Photo – दिवाळीनिमित्त शेअर बाजाराचे विशेष मूहूर्त ट्रेडिंग सत्र
जपानमध्ये पहिल्यांदाच महिला पंतप्रधानांची निवड, जाणून घ्या कोण आहे सनाए ताकाईची?
स्वरांची आतषबाजी आणि नृत्याचा झंकार, गोदावरी किनाऱ्यावरील सांस्कृतिक सूरमंचावर ‘दिवाळी पहाट’चा अद्भुत संगम
Photo – लक्ष्मीपूजनानिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरामध्ये रंगीबेरंगी फुलांची आकर्षक सजावट
ऋषभ पंत परतला, कर्णधारपदी निवड; BCCI ने केली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध संघाची घोषणा