वीस वर्षीय तरुणीला हेअर कलर करणं पडलं भारी, किडणीवर झाला गंभीर परिणाम
तरुणींनो केसांना वारंवार कलर करणं धोकादायक ठरु शकतं. चीनच्या एका 20 वर्षीय मुलीला केसांना कलर केल्याने तिच्या किडणीवर परिणाम झाला. त्यामुळे केसांना कलर करताना काही गोष्टी ध्यानात ठेवणे गरजेचे आहे.
चीनमधील एक 20 वर्षीय तरुणी आपल्या केसांना दर महिन्याला कलर करायची. ती कायम पार्लरमध्ये जाऊन आपल्या आवडीच्या कलाकारासारखे केस कलर करुन घरी यायची. बराच काळ ती असे करत असल्याने तिला पोटदुखीबरोबरच सांधेदुखीही होऊ लागली. पण त्यानंतर ती डॉक्टरकडे गेली त्यावेळी डॉक्टरांनी पूर्ण तपासणी केली असता तिच्या किडणीला सूज आल्याचे कळले.
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, केस कलर करताना मुळांना रंग लावला जातो, त्यावेळी तो रंग केसांच्या मुळातून शरीरातही पोहोचतो. काही विषारी अंश जसे की, मरकरी, सीसा हे शरीरात जातात. ते केवळ किडणी, फुफ्फुसावर नुकसान पोहोचवत नाही तर त्याने त्यामुळे कर्करोगाचाही धोका वाढू शकतो. केसांना कलर करायचे असल्यास रासायनिक कलर वापरण्यापेक्षा हर्बल ऑर्गिनिक कलर निवडायला हवेत. हेअर कलर वापरण्यापूर्वी त्याच्या पाकीटावर त्यात असलेले घटक वाचावेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List