पाकिस्तानला भूगोलावरून पुसून टाकू! हिंदुस्थानचे लष्करप्रमुख द्विवेदी यांचा इशारा

पाकिस्तानला भूगोलावरून पुसून टाकू! हिंदुस्थानचे लष्करप्रमुख द्विवेदी यांचा इशारा

जर जगाच्या नकाशावर आपले स्थान टिकवून ठेवायचे असेल तर शेजारी देशाने आपल्या भूमीवर दहशतवादाला पाठिंबा देणे थांबवावे. आता पूर्वीसारखा संयम दाखवणार नाही तर जगाच्या नकाशावरूनच पाकिस्तानचे नाव पुसून टाकू, असा इशारा हिंदुस्थानचे लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी आज दिला.

हिंदुस्थानचे लष्करप्रमुख द्विवेदी यांनी शुक्रवारी राजस्थानच्या श्रीगंगानगर जिह्यातील घडसाना 22 एमडी गावातील सीमावर्ती भागाला भेट देऊन दहशतवादविरोधी तयारीचा आढावा घेतला. यावेळी लष्कर आणि बीएसएफ अधिकाऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी पाकिस्तानला जशास तसे उत्तर देण्यासाठी सज्ज रहा, देवाची इच्छा असेल तर लवकरच ही संधी मिळेल. पाकिस्तानने दहशतवाद पसरवणे थांबवले नाही तर लवकरच ‘ऑपरेशन सिंदूर’चा दुसरा टप्पा सुरू केला जाऊ शकतो, असे लष्करप्रमुख म्हणाले.

हिंदुस्थान एक देश म्हणून, यावेळी पूर्णपणे तयार आहे. यावेळी, आम्ही ऑपरेशन सिंदूर 1.0 दरम्यान दाखवलेला संयम दाखवणार नाही. यावेळी आपण एक पाऊल पुढे टाकू आणि अशा पद्धतीने कृती करू ज्यामुळे पाकिस्तानला विचार करायला भाग पडेल की त्याला जगाच्या नकाशावर राहायचे आहे की नाही, असे लष्करप्रमुख द्विवेदी म्हणाले.

ऑपरेशन सिंदूरमध्ये दहशतवाद्यांचे नऊ अड्डे नष्ट

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थानने राबविलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ मोहिमेत हिंदुस्थानी लष्कराने पाकिस्तानचे नऊ दहशतवादी अड्डे नष्ट केले. या कारवाईत जवळजवळ 100 पाकिस्तानी लष्कराचे जवान आणि दहशतवादी मारले गेले. ऑपरेशन सिंदूरच्या यशाचे श्रेय लष्करी कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांना जाते, असे लष्करप्रमुख द्विवेदी म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Pune News – धनत्रयोदशी निमित्त श्री विठ्ठलास व रूक्मिणी मातेस अलंकार परिधान Pune News – धनत्रयोदशी निमित्त श्री विठ्ठलास व रूक्मिणी मातेस अलंकार परिधान
वसुबारस पासून दीपावली महोत्सवास सुरुवात झाली आहे. दरवर्षी परंपरेप्रमाणे धनत्रयोदशी निमित्त श्री विठ्ठल व माता रुक्मिणीला पारंपारिक अलंकार परिधान करत...
Mega Block – मध्य आणि हार्बर रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक, मुख्य मार्गावरील रेल्वे सेवा प्रभावित होणार
सत्ताधार्‍यांमध्येच जुंपली; धनंजय मुंडेंनी जीवनात कोणाशी निष्ठा ठेवली? सत्ताधारी आमदार प्रकाश सोळंकेंचा सवाल
बांगलादेशातील ढाका आंतरराष्ट्रीय विमानतळावर भीषण आग, सर्व विमानांची उड्डाणे रद्द
संसदेजवळील ब्रह्मपुत्रा अपार्टमेंटला भीषण आग, इमारतीत अनेक खासदारांचे निवासस्थान
केंद्र सरकारच्या निर्णयावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी चिडल्या, पंतप्रधान मोदींनी पत्र लिहून व्यक्त केल्या भावना
राम मंदिर स्थानकात जन्माला आलेल्या बाळाच्या हृदयात छिद्र, जगण्यासाठी संघर्ष सुरू