आयकर विभागाचा अजब कारभार; मृत व्यक्तीला धाडली आयटी नोटीस, हायकोर्टाने केली रद्द
मृत व्यक्तीच्या नावे नोटीस धाडण्याचा अजब प्रकार आयकर विभागाने केला. यावर तीव्र नाराजी व्यक्त करत उच्च न्यायालयाने ही नोटीस रद्द केली.
नीना शाह यांनी ही याचिका केली होती. त्यांचे पती जतीन शाह यांचे 23 फेब्रुवारी 2019 रोजी निधन झाले. याची माहिती नीना यांनी आयकर विभागाला कळवली. त्याची नोंद करून घेत आयकर विभागाने 2013-14 या आर्थिक वर्षाची 24 एप्रिल 2021 रोजी आयकर संदर्भात जारी केलेली नोटीस रद्द केली. त्यानंतर 2018-19 या आर्थिक वर्षाची नव्याने 2024 मध्ये आयकर विभागाने नोटीस पाठवली. ही नोटीसदेखील जतीन शाह यांच्या नावे होती. ही नोटीस रद्द करण्याची मागणी नीना यांनी केली. न्या. बी.पी. कुलाबावाला व न्या. अमित जामसंडेकर यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. मृत व्यक्तीच्या नावे आयकर नोटीस पाठवता येत नाही. तरीही नोटीस पाठवली गेली असली तर ती रद्दबातल ठरते, असे नमूद करत खंडपीठाने आयकर विभागाला चपराक दिली.
वारसाला नोटीस पाठवण्याची मुभा
आयकर संबंधित काही स्पष्टीकरण हवे असल्यास आयकर विभाग मृताच्या वारसाला नोटीस पाठवू शकते, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List