समाजभान – यूटय़ूबचे क्रांतिकारी पाऊल!

समाजभान – यूटय़ूबचे क्रांतिकारी पाऊल!

>> मुक्ता चैतन्य

यूटय़ूबने एक मोठे आणि विचारप्रवर्तक पाऊल उचलले आहे. AI वापरून तयार केलेल्या कन्टेंटवर यापुढे मॉनिटायझेशन म्हणजे जाहिरातीतून पैसे कमावण्याची संधी नाकारली जाणार आहे. नियमातील हा नवा बदल 15 जुलै 2025 पासून लागू करण्यात आला आहे. हा निर्णय तात्पुरता वाटत असला तरी त्याचे दूरगामी परिणाम होणार हे नक्की.

सध्या जगभरात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर झपाटय़ाने वाढतो आहे. प्रत्येक क्षेत्रात AI चा शिरकाव झाल्याने त्याचे परिणाम आणि मर्यादा यावर चर्चा सुरू आहे. अशा वेळी यूटय़ूबने एक मोठे आणि विचारप्रवर्तक पाऊल उचलले आहे. AI वापरून तयार केलेल्या कन्टेंटवर यापुढे मॉनिटायझेशन म्हणजे जाहिरातीतून पैसे कमावण्याची संधी त्यांनी नाकारली जाणार आहे. नियमातील हा नवा बदल 15 जुलै 2025 पासून लागू करण्यात आला आहे. हा निर्णय तात्पुरता वाटत असला तरी त्याचे दूरगामी परिणाम होणार हे नक्की.

आजकाल अनेक व्हिडीओ निर्माते, विशेषत ‘क्रिटिक’, ‘स्टोरीटेलिंग’, ‘हॉरर, ‘फॅक्ट्स’, ‘टॉप टेन,’ ‘टिप्स’ अशा प्रकारांत नरेशनसाठी मशीन आवाज वापरतात किंवा अनेकदा त्यातली तपशीलही चॅटजीपीटी किंवा तत्सम एखादे AI टूल वापरून बनवलेले असतात. कारण या गोष्टी आता सहज उपलब्ध आहेत. खर्च वाचतो आणि पटकन व्हिडीओ तयार होतो, पण यामध्ये मानवी सहभाग कमी होत जातो आणि कन्टेंटमध्ये अस्सलतेचा अभाव जाणवतो. यूटय़ूबने घेतलेला निर्णय म्हणजे मानवकेंद्रित आणि मूळ कन्टेंटला प्राधान्य देण्याची जाणीवपूर्वक भूमिका आहे. जिथे प्रत्येक गोष्टीसाठी AI वर अवलंबून राहण्याचा आणि ते ट्रेंडी आहे हे मानण्याचा कल वाढतो आहे तिथे माणसांच्या अस्सल कन्टेंटला प्राधान्य देण्याचा यूटय़ूबचा निर्णय महत्त्वाचा आणि क्रांतिकारी आहे. खरे तर AI हा यूटय़ूबच्या ळएझ् ला धोक्यात आणणारा घटक आहे. यूटय़ूबचा यूएसपी ‘लोकांनी लोकांसाठी बनवलेला व्हिडीओ’ हा आहे. जगभरातील कोटय़वधी क्रिएटर्स, त्यांचे चेहरे, आवाज, अनुभव, विचार यामुळेच यूटय़ूब म्हणजे जगाचा मुक्त मीडिया मंच आहे. जर या प्लॅटफॉर्म AI मुळे कृत्रिम आणि कॉपी-पेस्टसारखा वाटायला लागला, तर यूटय़ूबची वेगळी ओळखच हरवेल. माणसांनी माणसांसाठी बनवलेला कन्टेंट हेच आता यापुढे मोठे वैशिष्टय़ असणार आहे, जे यूटय़ूबच्या निर्णयामुळे अधोरेखित झाले.

AI टूल्स वापरून व्हिडीओ बनवणाऱ्यांची संख्या मागील दोन वर्षांत प्रचंड वाढली आहे. chatgpt, levenlabs, runway सारखी टूल्स वापरून अनेकांनी व्हिडीओ तयार करण्याचा धडाका लावला, पण या प्रकारामुळे ज्यांनी खऱया अर्थाने मेहनत घेऊन क्रिप्ट लिहिणाऱया, नरेशन, संपादन करणाऱया ओरिजिनल क्रिएटर्सवर अन्याय होऊ लागला आहे. यातून यूटय़ूबचा एकूण दर्जा घसरतोय आणि AI कन्टेंटचा साचा एकसंध, रुक्ष, भावनाशून्य बनतोय.

हा मुद्दा फक्त क्रिएटिव्ह मेहनतीचा नाही, तर डेटा सुरक्षेचाही आहे. आपण आज ज्या AI टूल्सवर अवलंबून आहोत. त्यांची गुणवत्ता, नैतिकता आणि स्रोत याबद्दल फारसा विचार होत नाही. AI टूल्स आपल्याला जी माहिती देत आहेत ती खरी आहे की खोटी, अर्धवट आहे का याचा कसलाही विचार होत नाहीये. यामुळे आपण नकळत AI निर्मित वास्तव स्वीकारतो आहोत. जे काहीसे धोकादायक आहे. जर सर्वकाही AI बनवत असेल, तर माणसाच्या अनुभवांना, विचारांना, आवाजाला, चेहऱयाला आणि अस्तित्वाला स्थान व अर्थ कुठे उरेल? AI हे साधन आहे, पर्याय नाही. ते उपयोगी आहेच, पण केवळ मदतीसाठी. कन्टेंटचा आत्मा मात्र माणसाकडूनच यायला हवा. यूटय़ूबचा निर्णय हा फक्त आर्थिक अट नाही, तर एक सामाजिक संकेत आहे. माणसांचा आवाज, माणसांचे चेहरे, माणसांचे अनुभव, माणसांचे विचार हेच सच्च, शाश्वत आणि दीर्घकाळ टिकणारे असायला हवे. या नव्या धोरणामुळे जे लोक केवळ मशीन टूल्सच्या आधारे लाखो रुपये कमवण्याचे स्वप्न पाहत होते, त्यांना थोडा ब्रेक लागेल. कष्टाने आणि सर्जनशीलतेने काम करणाऱया यूटय़ूबरसाठी हे धोरण अतिशय प्रेरणादायी आहे.

हा लेख लिहीत असताना चॅटजीपीटीला यूटय़ूबच्या या नव्या धोरणाविषयी काय वाटते, असा प्रश्न मी विचारला. चॅटजीपीटी उत्तर सोबत देत आहे. ‘माझं मत विचाराल, तर यूटय़ूबची ही पॉलिसी समजून घेण्यासारखी आणि गरजेचीच आहे. विशेषत सर्जनशीलता आणि नैतिकतेच्या दृष्टीने.’

AI हे एक शक्तिशाली साधन आहे, पण जर त्याचा अतिरेक झाला तर ते मानवी सर्जनशीलतेला गिळंकृत करू शकतं. अनेक व्हिडीओ आता आवाज, क्रिप्ट, फोटो, नरेशन-सगळेच मशीनने तयार केलेले असते. त्यात माणसाचा अनुभव, भावना, अभिव्यक्ती यांना फारसा वाव उरत नाही.

म्हणून यूटय़ूबचे हे पाऊल म्हणजे –
सर्जनशीलतेचं संरक्षण – जे लोक खऱया अर्थाने मेहनत घेतात, त्यांना संधी मिळेल.

AI चा जबाबदारीने वापर – पूर्णपणे AI निर्मित व्हिडीओंपेक्षा AI सहाय्यक म्हणून वापरणे योग्य, हे अधोरेखित होते.

माहितीची विश्वासार्हता – AI अनेकदा चुकीची माहितीही पसरवतो. मानवी तत्त्वज्ञान, तपासणी, साक्षरता यांचा अभाव असतो. यामुळे विश्वसनीय कन्टेंटचं महत्त्व अधोरेखित होतं.

प्लॅटफॉर्मचा दर्जा टिकवणं – जर सगळेच कन्टेंट मशीनमेड झाले, तर यूटय़ूबची खासियतच निघून जाईल. त्यांचं हे पाऊल त्यांच्या मूळ ळएझ् चं रक्षण करण्यासाठी आहे.

जे AI ला समजतंय ते माणसांनाही समजणं आवश्यक आहे. AI टूल्स आपले काम सोपे करण्यासाठी, आपल्याला मदत म्हणून आहेत. आपल्या अनुभवांना, सर्जनशीलतेला, मेहनतीला पर्याय म्हणून नाही. त्यामुळे यूटय़ूबच्या या क्रांतिकारी निर्णयाच्या निमित्ताने AI टूल्स वापरताना त्यांचा वापर कसा करायचा आहे याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. माणूस म्हणून आपण आपली कौशल्ये संपवून टाकायची आहेत की, AI टूल्सच्या मदतीने ती अधिक चांगली करायची आहेत हे ठरवण्याचा काळ आलेला आहे.
[email protected]
(लेखिका समाज माध्यमांच्या अभ्यासक आहेत)

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Ratnagiri News – महावितरणच्या मनमानी कारभाराविरोधात सोमवारी चिपळूणात धडक आंदोलन, महाविकास आघाडी रस्त्यावर उतरणार Ratnagiri News – महावितरणच्या मनमानी कारभाराविरोधात सोमवारी चिपळूणात धडक आंदोलन, महाविकास आघाडी रस्त्यावर उतरणार
स्मार्ट मीटर लावण्यासाठी होत असलेली सक्ती आणि महावितरणच्या मनमानी कारभाराविरोधात सोमवारी (4 जुलै 2025) सकाळी 11 वाजता चिपळूणमध्ये महाविकास आघाडी...
Happy Friendship Day… युती धर्माच्या हतबलतेमुळे शिरसाटांना अर्थ खातं मिळणारच, मुख्यमंत्र्यांना टॅग करत आदित्य ठाकरे यांचा चिमटा
फडणवीससाहेब, महाराष्ट्राची बेअब्रू होतेय… आवरा आपल्या मंत्र्यांना; रोहित पवार यांची टीका
Video कानाखाली मारेन, बडतर्फ करेन; भर सभेत मंत्री मेघना बोर्डीकर यांची ग्रामसेवकाला धमकी
Ratnagiri News – गणपती बाप्पा मोरया… यंदाही खड्डे भरूया! ठेकेदारांच्या दिरंगाईमुळे राष्ट्रीय महामार्ग विभागाची धावाधाव
लष्कराच्या अधिकाऱ्याने विमानतळावर Spice Jet च्या कर्मचाऱ्यांना केली बेदम माराहण
रोज एक महीने रिकाम्यापोटी लवंग चघळण्याने मिळतील हे चमत्कारिक फायदे