संगमनेर नगराध्यक्षपद निवडणूक, मिंधे गटाच्या उमेदवार दुबार मतदार
नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे गटाच्या उमेदवार सुवर्णा विठ्ठल रहाणे ऊर्फ सुवर्णा संदीप खताळ यांच्या उमेदवारीवर गंभीर शंका उपस्थित झाली आहे. नगराध्यक्षपदाच्या अपक्ष उमेदवार सुषमा संजय तवरेज यांनी खताळ यांच्यावर दुबार मतदार नोंदणीचा थेट आरोप करत, त्यांचा अर्ज अवैध ठरवण्याची मागणी निवडणूक निर्णय अधिकारी अरुण उंडे यांच्याकडे केली आहे. या धक्कादायक आरोपामुळे संपूर्ण संगमनेर नगरपालिका निवडणुकीत मोठी खळबळ उडाली आहे.
तक्रारदार सुषमा तवरेज यांनी दिलेल्या निवेदनानुसार सुवर्णा खताळ यांचे नाव एकाचवेळी दोन वेगवेगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदार यादीत असल्याचे स्पष्ट पुरावे सादर करण्यात आले आहेत. त्यामध्ये संगमनेर नगरपालिका मतदार यादीत, तर दुसरी नोंद घुलेवाडी ग्रामपंचायत मतदार यादीत अशी असून, त्यांनी कायद्याचे स्पष्ट उल्लंघन केले असल्याचा आरोप तवरेज यांनी केला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List