Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : दारुचं नाही तर ‘ड्रग्स’चीही नशा? पुणे पोलिसांना शंका

दारु पिवून भरधाव वेगानं दोघांना चिरडणाऱ्या अल्पवयीन वेदांत अग्रवालची रवानगी बाल सुधारगृहात झालीय. आता एक एक धक्कादायक माहिती समोर आलीय. अपाघाताच्या दिवशी वेदांतनं दारुसह ड्रग्सचंही सेवन केल्याची शंका पोलिसांना आहे, त्या दिशेनंही तपास सुरु झालाय. अडीच कोटींची पॉर्शे कार चालवण्याआधी वेदांत अग्रवाल हा ऑडी कार चालवायचा. 12 वी पास झाल्यामुळं वेदांतनं पबमध्ये 10-12 मित्रांसाठी पार्टीचं नियोजन केलं होतं. कोझी पब मधल्या दारुचं बिल 48 हजार झालं.

आता वेदांतसोबत पार्टी करणाऱ्या मित्रांचीही पुणे पोलिसांकडून चौकशी सुरु झालीय. पोर्शे कारमध्ये तांत्रिक बिघाड असतानाही वडील विशाल अग्रवालने अल्पवयीन मुलाच्या हाती कार दिली. मुलानं कार मागितली तर चालवायला दे, तू बाजूला बस अशी सूचना विशाल अग्रवालनं कार चालकाला दिली होती, अशी माहितीही समोर आलीय .अपघातावेळी वेदांतचा ड्रायव्हर कारमध्येच होता, त्यामुळं त्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतलं असून चौकशी सुरु आहे. तर अपघाताच्या 5 दिवसांनी पत्रकार परिषद घेवून सुप्रिया सुळेंनी, पोलिसांवर दबावाचा आरोप केलाय. कोणाचा दबाव होता, कोणी फोन केले, हे गृहमंत्री फडणवीसांनी सांगावं, असं सुप्रिया सुळे म्हणाल्यात.

कलम 304 वरुन सुरु असलेला वाद अजूनही कायम आहे..काँग्रेसचे पुण्याचे आमदार रवींद्र धंगेकरांनी दोन्ही FIR ट्विट करुन, पहिल्या FIRमध्ये कलम 304 नाही तर कलम 304 अ हे लावण्यात आलं. गृहमंत्र्यांनी दिशाभूल केल्याचा आरोप केला. त्यावर पुण्याचे भाजपचे नेते मुरलीधर मोहोळांनी, कलम 304 लावण्यात आल्याचं दाखवत रिमांड रिपोर्ट ट्विट केला. मात्र विरोधकांनी पुन्हा FIRवरुन दिशाभूल केल्याचा आरोप केलाय.

19 तारखेला म्हणजे रविवारी पहाटे अडीच वाजता वेदांतनं दारुच्या नशेत अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्टाला उडवलं त्यानंतर 19 तारखेलाच सकाळी 8 वाजून 26 मिनिटांनी गुन्ह्याची नोंद करण्यात आली. ज्यात कलम 304 अ आहे, कलम 304 नाही आणि डंक अँड ड्राईव्हचं कलम 185 नाही. आता मोहोळांनी बाल न्याय कोर्टात सादर केलेला जो रिमांड रिपोर्ट ट्विट केला. त्यात कलम 304 आणि कलम 185 आहे…मात्र, ही सुद्धा दिशाभूल असल्याचा आरोप धंगेकरांचा आहे. पहिल्या FIRचा क्रमांक आहे, 0306…हाच FIR क्रमांक रिमांड रिपोर्टमध्ये आहे. पण कलम 304 कलम आणि कलम 185 रिमांड रिपोर्टमध्ये दाखवण्यात आली, ती कलमं त्या FIR रिपोर्टमध्येच नाही.

भाजपच्या नितेश राणेंनी सुप्रिया सुळे आतापर्यंत गप्प का? बिल्डर विशाल अग्रवालशी पवार कुटुंबीयांशी संबंध आहेत..त्यामुळं वाचवण्याचा प्रयत्न होतोय का ? असा आरोप नितेश राणेंनी सुप्रिया सुळेंवर केलाय. याआधी अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरेंवर पोलिसांवर दबाव टाकल्याचा आरोप झाला. पण टिंगरेंनी आरोप फेटाळलेत..आता सुप्रिया सुळेंनीही कोणाचा फोन होता असा सवाल करुन फडणवीसांकडे खुलासा करण्याची मागणी केली. तर नितेश राणेंनी सुप्रिया सुळेंवरच पवार कुटुंबाशी विशाल अग्रवालशी काय संबंध आहेत, असा सवाल करुन आरोप केलेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मंत्रिमंडळ विस्तारात मोठे फेरबदल होणार, काही मंत्र्यांचं प्रमोशन तर काहींचं खातं बदलणार, सूत्रांची माहिती मंत्रिमंडळ विस्तारात मोठे फेरबदल होणार, काही मंत्र्यांचं प्रमोशन तर काहींचं खातं बदलणार, सूत्रांची माहिती
लोकसभा निवडणुकीचे निकाल समोर आल्यानंतर आता महायुतीचं रखडलेलं मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या मंत्रिमंडळात कुणाकुणाला संधी...
जितेंद्र आव्हाडांकडून दिलीप वळसे पाटलांचं कौतुक; म्हणाले, त्यांच्यामुळेच देवेंद्र फडणवीस…
मी एक फुलवेडी…; ‘आई कुठे काय करते’मधील अरूंधतीचे हे खास फोटो पाहिलेत का?
राजकुमार रावच्या ‘स्त्री 2’ चित्रपटात सिनेरसिकांसाठी सरप्राईज; ‘ही’ दाक्षिणात्य अभिनेत्री झळकणार
आई आणि बहिणीसोबत खास लूकमध्ये दिसली आलिया भट्ट, पिवळ्या ड्रेसमध्ये अभिनेत्री…
तुझं सामान घेऊन जा अन्यथा..; म्हणणाऱ्या निखिलला कोर्टाचा दणका, दलजीतला तात्पुरता दिलासा
विराट कोहली याला वामिका आणि अकायने दिले मोठे गिफ्ट, अनुष्का शर्मा म्हणाली, आम्ही..