वेगाने वितळताहेत हिमालयातील हिमनद्या

वेगाने वितळताहेत हिमालयातील हिमनद्या

जागतिक तापमानवाढीचा परिणाम पर्यावरणावर होत आहे.  इस्रोने सोमवारी वाढत्या हिमनद्या (ग्लेशिअर) आणि हिम सरोवरांच्या (ग्लेशिअस लेक) बाबतीत धोक्याची घंटा वाजवली. इस्रोने हिमालयातील हिमनद्या वेगाने वितळत असल्याच्या उपग्रह प्रतिमा जारी केल्या. तसेच हिम सरोवरांचा आकारही दुपटीने वाढत असल्याचा दावा केला. हे पर्यावरण संकट टाळण्यासाठी त्याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे इस्रोने स्पष्ट केले.  इस्रोने 1984 ते 2023 या कालावधीतील हिंदुस्थानच्या हिमालयीन प्रदेशातील नदीखोऱयाच्या पाणलोट क्षेत्रांचे उपग्रह पह्टो घेतले आहेत. या तीन ते चार दशकांच्या उपग्रह डेटा संग्रहातून हिमनद्यांच्या वातावरणात होणाऱया बदलांबद्दल धक्कादायक माहिती मिळाली आहे. या पह्टोंमध्ये हिम सरोवरांमध्ये लक्षणीय बदल दिसून येतोय. अहवालानुसार, 671 हिम सरोवरांचा दुप्पट विस्तार झालाय. 10 हेक्टरपेक्षा मोठय़ा असलेल्या 2 हजार 431 सरोवरांपैकी 676 हिमनदी आणि हिम सरोवरांचा विस्तार झाला आहे.

गेपांग घाट हिमनदी तलावाचा विस्तार

इस्रोच्या उपग्रह प्रतिमांवरून, हिमाचल प्रदेशातील 4,068 मीटर उंचीवर असलेल्या गेपांग घाट हिमनदी तलावाचा 178 टक्के विस्तार दिसून येतोय. 1989 ते 2022 दरम्यान 36.49 हेक्टरवरून 101.30 हेक्टरपर्यंत तलावाचा विस्तार झालाय.  म्हणजेच दरवर्षी सुमारे 1.96 हेक्टरची वाढ झाली आहे.

601 हिम सरोवरांमध्ये दुप्पट वाढ

676 सरोवरांपैकी 601 सरोवरांमध्ये दुपटीने वाढ झाली आहे. तर 10 तलावांमध्ये दीड ते दोन पटीने वाढ आहे. 65 तलावांमध्ये 1.5 पटीने वाढ झाली. 676 हिम सरोवरांपैकी 130 हिंदुस्थानात आहेत, ज्यात 65 सिंधू, सात गंगा आणि 58 ब्रह्मपुत्रा नदीच्या खोऱयात आहेत. 314 हिम सरोवर 4 ते 5 हजार मीटर उंचीवर आहेत, तर 296 सरोवर 5 हजार मीटरपेक्षा जास्त आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : 2014 मध्येच महाविकास आघाडी बनवण्याचा प्लॅन, शरद पवारांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : 2014 मध्येच महाविकास आघाडी बनवण्याचा प्लॅन, शरद पवारांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट
शरद पवारांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत अनेक गौप्यस्फोट केलेत. पहिलं म्हणजे 2019 ला स्थापन झालेली महाविकासआघाडी 2014 मध्येच बनवण्याचं ध्येय...
पुढारी कसे न लाजता मत मागतात, तसंच काहीसं…; अभिनेते मिलिंद गवळी यांची पोस्ट चर्चेत
Lok Sabha Election 2024 : मुंबईतलं भाषिक गणित काय सांगतं? नेमकं राजकीय समीकरण काय?
Health : रोज सकाळी ब्रेड खात असाल तर सावधान, शरीराचं भयंकर नुकसान
जालना जिल्ह्यात अवैध वाळू उत्खननाविरुद्ध महसूल विभागाची कारवाई, कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल जप्त
सगेसोयर्‍याची अंमलबजावणी न केल्यास समाजाला निवडणुकीत उतरविणार- मनोज जरांगे पाटील
कान्सच्या कार्पेटवर दिसणार मराठी अभिनेत्रीचा स्वॅग, वाचा बातमी