राहुरीत घराच्या अंगणात खेळणाऱ्या 4 वर्षीय मुलीवर बिबट्याची झडप, उपचारांपूर्वीच मृत्यू

राहुरीत घराच्या अंगणात खेळणाऱ्या 4 वर्षीय मुलीवर बिबट्याची झडप, उपचारांपूर्वीच मृत्यू

राहुरी तालुक्यातील वरवंडी येथे घराच्या अंगणासमोर खेळणाऱ्या वेदिका श्रीकांत ढगे या 4 वर्षीय मुलीवर गिन्नी गवतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने झडप घातली. बिबट्याच्या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या वेदिकाला तात्काळ नगर येथे उपचारांसाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारांपूर्वीच तिचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, राहुल तालुक्यातील वरवंडी येथील माजी सरपंच श्रीकांत रावसाहेब ढगे यांची 4 वर्षीय मुलगी वेदिका सकाळी पावणे आठच्या सुमारास अंगणामध्ये खेळत होती. याचवेळी गिन्न गवतामध्ये दबा धरून बसलेल्या बिबट्याने तिच्यावर अचानक हल्ला केला. घरातील लोकांनी आरडाओरडा केल्याने बिबट्या पळून गेला. मात्र बिबट्याच्या हल्ल्यात वेदिका गंभीर जखमी झाली होती. तिला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले, परंतु उपचारांपूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे व त्यांचे सहकारी व वनविभागाचे वनक्षेत्रपाल युवराज पाचारणे, वनरक्षक सतीश जाधव, गाडेकर आदी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

राहुरी तालुक्यातील कृषिविद्यापीठ, मुळानगर, बाभुळगाव,बारागाव नांदुरसह राहता, श्रीरामपूर तालुक्यात मानवी वस्त्यांवर बिबट्यांची वर्दळ वाढली आहे. अशातच बिबट्याच्या हलल्यात मुलीचा मृत्यू झाल्याने वरवंडी परिसरात शोककळा पसरली आहे. दिवसाढवळ्या बिबट्या हल्ला करत असल्याने भागात भीतीचे वातावरण पसरले असून नरभक्षक बिबट्यास पकडण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मंत्रिमंडळ विस्तारात मोठे फेरबदल होणार, काही मंत्र्यांचं प्रमोशन तर काहींचं खातं बदलणार, सूत्रांची माहिती मंत्रिमंडळ विस्तारात मोठे फेरबदल होणार, काही मंत्र्यांचं प्रमोशन तर काहींचं खातं बदलणार, सूत्रांची माहिती
लोकसभा निवडणुकीचे निकाल समोर आल्यानंतर आता महायुतीचं रखडलेलं मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या मंत्रिमंडळात कुणाकुणाला संधी...
जितेंद्र आव्हाडांकडून दिलीप वळसे पाटलांचं कौतुक; म्हणाले, त्यांच्यामुळेच देवेंद्र फडणवीस…
मी एक फुलवेडी…; ‘आई कुठे काय करते’मधील अरूंधतीचे हे खास फोटो पाहिलेत का?
राजकुमार रावच्या ‘स्त्री 2’ चित्रपटात सिनेरसिकांसाठी सरप्राईज; ‘ही’ दाक्षिणात्य अभिनेत्री झळकणार
आई आणि बहिणीसोबत खास लूकमध्ये दिसली आलिया भट्ट, पिवळ्या ड्रेसमध्ये अभिनेत्री…
तुझं सामान घेऊन जा अन्यथा..; म्हणणाऱ्या निखिलला कोर्टाचा दणका, दलजीतला तात्पुरता दिलासा
विराट कोहली याला वामिका आणि अकायने दिले मोठे गिफ्ट, अनुष्का शर्मा म्हणाली, आम्ही..