सांगली, सोलापुरात अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई

सांगली, सोलापुरात अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई

महापालिकेकडून शहरातील अनधिकृत होर्डिंग्ज हटवण्यास सुरुवात करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांच्या आदेशाने अतिक्रमण विभागाकडून कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

आज कोल्हापूर रोडवरील 20 बाय 40 मापाच्या होर्डिंगचा सांगाडा उपायुक्त वैभव साबळे यांच्या सूचनेनुसार सहायक आयुक्त सहदेव कावडे आणि अतिक्रमण पथकप्रमुख दिलीप घोरपडे यांच्या पथकाने हटविला.

मुंबईतील होर्डिंग दुर्घटनेनंतर महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांनी सांगली मनपा क्षेत्रातील अनधिकृत होर्डिंग्जचा सर्व्हे करण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. यानुसार उपायुक्त वैभव साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली मनपा क्षेत्रातील अनधिकृत होर्डिंग्जचा सर्व्हे करण्यात आला. यामध्ये मनपाक्षेत्रात एकूण 31 होर्डिंग्ज अनधिकृत असल्याचे समोर आले. त्यानंतर आयुक्त शुभम गुप्ता यांच्या आदेशाने आजपासून अनधिकृत होर्डिंग्ज हटवण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये आज प्रभाग समिती 1 अंतर्गत येणाऱया कोल्हापूर रोडवरील 20 बाय 40 मापाच्या होर्डिंगचा सांगाडा सहायक आयुक्त सहदेव कावडे आणि अतिक्रमण पथकप्रमुख दिलीप घोरपडे यांच्या पथकाने क्रेनच्या साहाय्याने काढण्यात आला. दरम्यान, यापुढेही अनधिकृत होर्डिंग्ज हटविण्याची कारवाई सुरूच राहणार असून, संबंधित होर्डिंगमालकांकडून दंडही वसूल करण्यात येणार आहे, असा इशारा उपायुक्त वैभव साबळे यांनी दिला.

सोलापूर, दि. 22 (प्रतिनिधी) – सोलापूर शहरातील विविध ठिकाणी महापालिकेच्या परवानगीशिवाय लावण्यात आलेली होर्डिंग्ज हटविण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. पहिल्या दिवशी पोलीस बंदोबस्तात छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि सम्राट चौक येथील विनापरवाना लावण्यात आलेले होर्डिंग स्ट्रक्चर गॅस कटरच्या साहाय्याने काढण्यात आले.

मुंबईतील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर सोलापूर महापालिकेने शहरातील विनापरवाना लावण्यात आलेली होर्डिंग्ज हटविण्याची मोहीम हाती घेतली आहे. उपायुक्त आशीष लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात येत आहे.

विनापरवाना होर्डिंगबाबत इमारतमालकांना महापालिकेने नोटिसा बजावत होर्डिंग्ज काढण्यासाठी मुदतही दिली होती. त्यानंतर आज सकाळपासूनच ही विनापरवाना होर्डिंग्ज हटवण्यास महापालिका भूमी मालमत्ता आणि अतिक्रमण प्रतिबंधक विभागाच्या संयुक्त पथकाने सुरुवात केली.

अतिक्रमण विभागाचे पथक पोलीस बंदोबस्तासह सकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात दाखल झाले. जेसीबी आणि डंपरच्या सहाय्याने त्यांनी बसस्थानकासमोरील श्री विठ्ठल मंदिराच्या वर असलेल्या मोठय़ा होर्डिंगचे स्ट्रक्चर गॅस कटरच्या मदतीने काढले. साधाणतŠ दोन ते तीन तास येथील होर्डिंग हटविण्याचे काम सुरू होते. त्यानंतर सम्राट चौक येथे या पथकाने आपला मोर्चा वळवला. जैन मंदिरासमोरील विनापरवाना होर्डिंग काढण्यात आले. यावेळी लोकांची गर्दी झाली होती. यावेळी महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाचे प्रमुख जगन्नाथ बनसोडे, कनिष्ठ अभियंता विक्रम पाटील यांच्यासह दोन्ही विभागांचे कर्मचारी उपस्थित होते.

आठ दिवस चालणार मोहीम

z दररोज सुमारे दोन होर्डिंग्ज स्ट्रक्चर याप्रमाणे साधारणतः आठ दिवस ही मोहीम राबविण्यात येणार आहे. शहरातील शिवाजी महाराज चौक, एसटी बसस्थानक, सम्राट चौक येथे ही मोहीम राबविण्यात आली. त्यानंतर आता शहरातील सरस्वती चौक, मेकॅनिक चौक, टिळक चौक, तुळजापूर वेस, जोडबसवण्णा चौक, बाळीवेस येथील होर्डिंग्ज काढण्यात येणार आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मंत्रिमंडळ विस्तारात मोठे फेरबदल होणार, काही मंत्र्यांचं प्रमोशन तर काहींचं खातं बदलणार, सूत्रांची माहिती मंत्रिमंडळ विस्तारात मोठे फेरबदल होणार, काही मंत्र्यांचं प्रमोशन तर काहींचं खातं बदलणार, सूत्रांची माहिती
लोकसभा निवडणुकीचे निकाल समोर आल्यानंतर आता महायुतीचं रखडलेलं मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या मंत्रिमंडळात कुणाकुणाला संधी...
जितेंद्र आव्हाडांकडून दिलीप वळसे पाटलांचं कौतुक; म्हणाले, त्यांच्यामुळेच देवेंद्र फडणवीस…
मी एक फुलवेडी…; ‘आई कुठे काय करते’मधील अरूंधतीचे हे खास फोटो पाहिलेत का?
राजकुमार रावच्या ‘स्त्री 2’ चित्रपटात सिनेरसिकांसाठी सरप्राईज; ‘ही’ दाक्षिणात्य अभिनेत्री झळकणार
आई आणि बहिणीसोबत खास लूकमध्ये दिसली आलिया भट्ट, पिवळ्या ड्रेसमध्ये अभिनेत्री…
तुझं सामान घेऊन जा अन्यथा..; म्हणणाऱ्या निखिलला कोर्टाचा दणका, दलजीतला तात्पुरता दिलासा
विराट कोहली याला वामिका आणि अकायने दिले मोठे गिफ्ट, अनुष्का शर्मा म्हणाली, आम्ही..