हिंगोलीत आज महाविकास आघाडीचे तुफान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची हदगावात जाहीर सभा

हिंगोलीत आज महाविकास आघाडीचे तुफान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची हदगावात जाहीर सभा

हिंगोली लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांच्या निवडणूक प्रचारार्थ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची बुधवार, 24 एप्रिल रोजी जाहीर सभा होणार आहे. या सभेला महाविकास आघाडीचे नेते उपस्थित राहणार आहेत.

हिंगोली लोकसभा मतदारसंघातील प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांच्या झंझावाती प्रचाराने मतदारसंघ ढवळून निघाला आहे. बुधवार, 24 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता हदगाव येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, संपर्कप्रमुख बबनराव थोरात, शिवसेना उपनेते लक्ष्मण वडले, माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा, आमदार माधवराव पाटील जवळगावकर, विधानपरिषदेच्या आमदार डॉ.प्रज्ञा सातव, माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर, शिवाजीराव मोघे, माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर, प्रदीप नाईक, डॉ. संतोष टारफे, विजयराव खडसे, प्रकाश पाटील देवसरकर, माजी खासदार सुभाष वानखेडे, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे, काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य सचिन नाईक, माहूर किनवट विधानसभा प्रमुख ज्योतिबा खराटे, सहसंपर्कप्रमुख सुनिल काळे, विनायक भिसे, शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश देशमुख, अजय उर्फ गोपू पाटील, जिल्हा संघटक बाळासाहेब मगर, लोकसभा सहसंपर्कप्रमुख डॉ. रमेश शिंदे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिलीप देसाई, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष? दिलीप चव्हाण,गणेश शिंदे, युवा सेनेचे महेश खेडकर,कन्हैया बाहेती, शिवा शिंदे, महिला जिल्हा संघटक जनाबाई डुडुळे, जिल्हा संघटक कीर्ती लदनिया, डॉ. रेणुका पतंगे, रूपालीताई राजेश पाटील गोरेगावकर, समाजवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष खलील बेलदार, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सतीश जाधव, आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष गोपाल ढोणे, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हाध्यक्ष आर. आर. कोरडे? यांच्यासह महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षातील पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या सभेला हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : 2014 मध्येच महाविकास आघाडी बनवण्याचा प्लॅन, शरद पवारांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : 2014 मध्येच महाविकास आघाडी बनवण्याचा प्लॅन, शरद पवारांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट
शरद पवारांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत अनेक गौप्यस्फोट केलेत. पहिलं म्हणजे 2019 ला स्थापन झालेली महाविकासआघाडी 2014 मध्येच बनवण्याचं ध्येय...
पुढारी कसे न लाजता मत मागतात, तसंच काहीसं…; अभिनेते मिलिंद गवळी यांची पोस्ट चर्चेत
Lok Sabha Election 2024 : मुंबईतलं भाषिक गणित काय सांगतं? नेमकं राजकीय समीकरण काय?
Health : रोज सकाळी ब्रेड खात असाल तर सावधान, शरीराचं भयंकर नुकसान
जालना जिल्ह्यात अवैध वाळू उत्खननाविरुद्ध महसूल विभागाची कारवाई, कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल जप्त
सगेसोयर्‍याची अंमलबजावणी न केल्यास समाजाला निवडणुकीत उतरविणार- मनोज जरांगे पाटील
कान्सच्या कार्पेटवर दिसणार मराठी अभिनेत्रीचा स्वॅग, वाचा बातमी