काँग्रेस आमदार पी.एन. पाटील यांचं निधन; बाथरूममध्ये पाय घसरून पडल्याने डोक्याला झालेली गंभीर दुखापत

काँग्रेस आमदार पी.एन. पाटील यांचं निधन; बाथरूममध्ये पाय घसरून पडल्याने डोक्याला झालेली गंभीर दुखापत

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि करवीर विधानसभा मतदारसंघांचे आमदार पांडुरंग निवृत्ती पाटील यांचे निधन झाले आहे. मृत्युसमयी ते 71 वर्षांचे होते. आमदार सतेज पाटील यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे.

P. N. Patil हे रविवारी बाथरूममध्ये पाय घसरून पडले होते. यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. मेंदुमध्ये रक्तस्त्राव झाल्याने गेल्या चार दिवसांपासून त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरू होते. मात्र गुरुवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. आमदार सतेज पाटील यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत ही माहिती दिली आणि शोक व्यक्त केला.

“काँग्रेसचे निष्ठावंत, कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष, करवीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार पी. एन. पाटील यांच्या निधनाची वार्ता अत्यंत दुःखद आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. आम्ही त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत. त्यांच्यासारख्या निष्ठावंत नेत्याच्या निधनामुळे काँग्रेसचे मोठे नुकसान झाले आहे. ईश्वर त्यांना सद्गती देवो व कुटुंबियांना दुःखातून सावरण्याचे बळ देवो”, अशी पोस्ट सतेज पाटील यांनी केली आहे.

दरम्यान, पी.एन. पाटील यांच्या पार्थिवावर गुरुवारी सकाळी 11 वाजता सडोली खालसा या त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार केले जाणरा आहेत. तत्पूर्वी सकाळी 10 वाजता त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी कोल्हापूर काँग्रेस जिल्हा कमिटीच्या कार्यालयात ठेवण्यात येणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;