सहाव्या टप्प्यातील प्रचार थांबला, देशातील 57 मतदारसंघांत शनिवारी मतदान

सहाव्या टप्प्यातील प्रचार थांबला, देशातील 57 मतदारसंघांत शनिवारी मतदान

लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यातील प्रचार गुरुवारी थांबला. या टप्प्यात दिल्ली, उत्तरप्रदेश, बिहार, हरियाणा, जम्मू-कश्मीर, झारखंड आदी सात राज्यांतील 57 मतदारसंघांत शनिवार, 25 मे रोजी मतदान घेण्यात येणार आहे. मतदान शांततेत पार पाडण्यासाठी सर्वत्र चोख बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे.

लोकसभेच्या ५४८ जागांसाठी सात टप्प्यात मतदान घेण्यात येत आहे. आतापर्यंत मतदानाचे पाच टप्पे पार पडले असून २५ मे रोजी सहाव्या टप्प्याचे मतदान घेण्यात येणार आहे. सहाव्या टप्प्यात सात राज्यातील ५७ मतदारसंघांचा समावेश आहे. आज या मतदारसंघातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या. शुक्रवारी मतदान कर्मचार्‍यांना मतदानाचे साहित्य वाटप करण्यात येणार असून सायंकाळपर्यंत हे कर्मचारी आपापल्या केंद्रांवर पोहोचतील. आतापर्यंत झालेल्या पाचही टप्प्यात उन्हाच्या जबर तडाख्यामुळे मतदानाचा टक्का घसरला. या टप्प्यालाही उन्हाच्या झळा बसण्याची शक्यता आहे.

मुंबईप्रमाणेच संथ मतदान होणार का?

पाचव्या टप्प्यात मुंबईत झालेल्या मतदानाचा वेग अतिशय संथ होता. अनेक भागात मतदानासाठी आलेले नागरिक कंटाळून निघून गेले. मतदानासाठी येणार्‍या नागरिकांसाठी कोणत्याही सुविधा देण्यात आल्या नव्हत्या. भर उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही करण्यात आली नव्हती. मतदानाचा टक्का वाढू नये म्हणून हे कारस्थान रचण्यात आले. यामुळे निवडणूक आयोगाच्या बेजबाबदार कारभारावर देशभरातून टीकेची झोड उठली. त्यापासून शहाणपण घेऊन आयोगाने या टप्प्यात मतदानाचा वेग वाढवण्यासाठी काही उपाय केलेत का, हे शनिवारीच समोर येणार आहे.

उत्तरप्रदेशातील सुलतानपुर, श्रावस्ती, प्रतापगड, फुलपूर, प्रयागराज, डुमरियागंज, बस्ती, आंबेडकरनगर, संत कबीरनगर, जौनपूर, भदोही, लालगंज, मछलीशहर आणि आजमगड येथे, तर बिहारमधील पश्चिम चंपारण, पूर्व चंपारण, वाल्मिकीनगर, शिवहर, सिवान, वैशाली, महाराजगंज, गोपालगंज येथे मतदान घेण्यात येणार आहे. हरियाणातील हिस्सार, कर्नाल, अंबाला, सोनीपत, कुरुक्षेत्र, सिरसा, रोहतक, गुडगाव, भिवानी-महेंद्रगड आणि फरिदाबाद या दहा मतदारसंघात मतदान होणार असून जम्मू-कश्मीरच्या अनंतनाग-राजौरी येथेही मतदान घेण्यात येणार आहे. झारखंडमधील रांची, गिरिडीह, धनबाद आणि जमशेदपूर येथेही सहाव्या टप्प्यात मतदान होणार आहे. ओडिशातील क्योझार, संबलपूर, कटक, ढेंकानाल, पुरी, भुवनेश्वर तर पश्चिम बंगालमधील घाटल, तामलुक, कांथी, पुरुलिया, झाडग्राम, मेदिनीपूर, बंकुरा, बिशनुपूर येथे मतदान होणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

ग्राहकाला गरम समोसा मागणे पडले महागात, दुकानदाराने फोडले ग्राहकाचे डोके ग्राहकाला गरम समोसा मागणे पडले महागात, दुकानदाराने फोडले ग्राहकाचे डोके
समोसे अनेकांचा आवडता खाद्यप्रकार आहे. स्वस्त आणि सर्वत्र उपलब्ध असणारे समोसे गरमागरम मिळण्यासाठी खवय्यांचे प्राधान्य असते. परंतु आता जर तुम्ही...
Sanjay Raut : शिवसेना, राष्ट्रवादीनंतर मोदी सरकार ‘या’ तीन पक्षांचा गेम करणार, पक्ष फोडण्याचं काम सुरू, संजय राऊत यांचा गौप्यस्फोट
वरूण धवण लेकीसोबत पहिला फोटो पोस्ट करत म्हणाला, ‘मुलीचा बाप होण्याचा आनंद म्हणजे…’
धक्कादायक प्रकार उघड; रवींद्र वायकरांच्या मेहुण्याने वापरला EVM अनलॉक करणारा फोन
पीएम मोदी – मेलोनी यांच्या ‘मलोडी’ व्हिडीओवर कंगना रनौतची पहिली प्रतिक्रिया
सलमान खानला व्हिडीओच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी, लॉरेन्स बिश्नोई…
मासिक पाळीचा ‘तो’ सीन शूट करताना कशी होती अविका गौरची अवस्था? म्हणाली, ‘दिग्दर्शकांनी मला विचारलं…’