Dombivli Blast : MIDC मध्ये केमिकल कंपनीत भीषण स्फोट, 35 ते 40 जण जखमी; TDRF ची टीम रवाना

Dombivli Blast : MIDC मध्ये केमिकल कंपनीत भीषण स्फोट, 35 ते 40 जण जखमी; TDRF ची टीम रवाना

डोंबिवली एमआयडीसीत फेज-2 मधील अंबर केमिकल कंपनीत भीषण स्फोट झाला आहे. कंपनीत बॉयलरचा स्फोट झाल्याने डोंबिवली पुन्हा हादरली आहे. या स्फोटात अनेक कामगार जखमी झाल्याची माहिती आहे. सर्व जखमी कामगारांना एम्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. डोंबिवलीत बचाव कार्यासाठी टीडीआरएफची 13 जवानांची टीम रवाना झाली आहे.

भीषण स्फोटानंतर कंपनीत मोठी आग लागली आहे. या आगीचे लोण आजूबाजूच्या दोन कंपन्यांमध्येही पसरले आहे. आगीच्या ज्वाळा अनेक किलोमीटर दुरूनही दिसत आहेत. तसेच धुराचे लोटही उठले आहेत. सध्या डोंबिवलीत काळा धूर पसरला आहे. या घटनेनंतर आजूबाजूच्या इमारतींमधील रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

एका पाठोपाठ स्फोट सुरू होते. या स्फोटाची कंपने अनेक किलोमीटपर्यंत जाणवली. डोंबिवली, डोंबिवली पश्चिम, कल्याण पूर्व भाग या स्फोटाने हादरला. स्फोटामुळे आगीने रौद्ररूप धारण केले आहे. तर स्फोटामुळे आजूबाजूच्या बहुतेक इमारतींच्या काचा फुटल्या आहेत. अग्नीशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या स्फोटात अनेक कामगार गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. जखमी झालेल्या 35 ते 40 कामागारांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बचावकार्य सुरू आहे. तसेच आग नियंत्रणात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

आजच्या स्फोटाच्या घटनेनंतर डोंबिवली एमआयडीत मे 2016 मध्ये प्रोबेस कंपनीत झालेल्या भीषण स्फोटाच्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या आहेत. या स्फोटात 12 जणांचा मृत्यू झाला होता. तर अनेकजण जखमी झाले होते.

 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

ग्राहकाला गरम समोसा मागणे पडले महागात, दुकानदाराने फोडले ग्राहकाचे डोके ग्राहकाला गरम समोसा मागणे पडले महागात, दुकानदाराने फोडले ग्राहकाचे डोके
समोसे अनेकांचा आवडता खाद्यप्रकार आहे. स्वस्त आणि सर्वत्र उपलब्ध असणारे समोसे गरमागरम मिळण्यासाठी खवय्यांचे प्राधान्य असते. परंतु आता जर तुम्ही...
Sanjay Raut : शिवसेना, राष्ट्रवादीनंतर मोदी सरकार ‘या’ तीन पक्षांचा गेम करणार, पक्ष फोडण्याचं काम सुरू, संजय राऊत यांचा गौप्यस्फोट
वरूण धवण लेकीसोबत पहिला फोटो पोस्ट करत म्हणाला, ‘मुलीचा बाप होण्याचा आनंद म्हणजे…’
धक्कादायक प्रकार उघड; रवींद्र वायकरांच्या मेहुण्याने वापरला EVM अनलॉक करणारा फोन
पीएम मोदी – मेलोनी यांच्या ‘मलोडी’ व्हिडीओवर कंगना रनौतची पहिली प्रतिक्रिया
सलमान खानला व्हिडीओच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी, लॉरेन्स बिश्नोई…
मासिक पाळीचा ‘तो’ सीन शूट करताना कशी होती अविका गौरची अवस्था? म्हणाली, ‘दिग्दर्शकांनी मला विचारलं…’