ताडोबात बुद्ध पौर्णिमेला ‘निसर्ग अनुभव, 250 निसर्गप्रेमींचा 90 मचणांवर मुक्काम

ताडोबात बुद्ध पौर्णिमेला ‘निसर्ग अनुभव, 250 निसर्गप्रेमींचा 90 मचणांवर मुक्काम

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या ‘बफर झोन’मध्ये आज गुरुवारी बुद्ध पौर्णिमेला चंद्राच्या लख्ख प्रकाशात 90 मचाणांवरून प्राणी गणना केली जाणार आहे. ‘निसर्ग अनुभव’ या गोंडस नावाने दरवर्षी हा उपक्रम राबवला जातो. एका मचाणवर दोन निसर्गप्रेमींना साडेचार हजार रुपये शुल्क आकारून रात्रभर मुक्कामाची संधी दिली जाते. निसर्ग अनुभवासाठी निसर्गप्रेमींकडून या सर्व मचाणांची नोंदणी पूर्ण झालेली आहे.

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्यावतीने दरवर्षी बुद्ध पौर्णिमेला चंद्राच्या लख्ख प्रकाशात प्राणीगणना केली जाते. यावर्षी प्रथमच ‘कोअर झोन’ वगळता ‘बफर’ क्षेत्रातील चंद्रपूर, मूल, मोहर्ली, खडसंगी, पळसगाव व शिवणी या सहा परिक्षेत्रातील मचाणांवर प्राणीगणना अर्थात निसर्ग अनुभव हा उपक्रम राबवण्यात येत आहे. यासाठी ताडोबा बफर क्षेत्रातील 90 मचाणांवर प्रत्येकी दोन निसर्गप्रेमींना संधी देण्यात आली आहे. आठवडाभरापूर्वीच ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्यावतीने ‘माय ताडोबा’ या संकेतस्थळावर निसर्ग अनुभव उपक्रमासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली. 90 मचाणांवर प्रत्येकी दोन, अशा 250 निसर्गप्रेमींनी यासाठी नोंदणी केली. यासाठी साडेचार हजार रुपये शुल्क आकारण्यात आले. तसेच प्रत्येक मचाणवर दोन निसर्गप्रेमींसोबत एक मार्गदर्शक (गाईड) असेल. बुद्ध पौर्णिमेला म्हणजे आज गुरुवारी सायंकाळी चार वाजता प्रत्येक प्रवेशद्वारावर या निसर्गप्रेमींना बोलावण्यात आले आहे. तिथून या निसर्गप्रेमींना वाहनाद्वारे (जिप्सी) मचाणापर्यंत नेले जाईल. निसर्गप्रेमींना जेवण, पाणी, चादर आणि आवश्यक वस्तू सोबत आणावे लागणार आहे.

एकदा मचाणावर चढल्यानंतर त्यांना दुसऱ्या दिवशी सकाळीच खाली उतरता येईल. त्यामुळे निसर्गप्रेमींना सर्व तयारीनिशी बोलावण्यात आले आहे. पान, खर्रा, विडी, तंबाखू, तसेच पिण्याच्या पाण्याच्या प्लास्टिक बाटल्या सोबत आणण्यास मनाई आहे. या सर्वांकडून नोंदणी करतानाच त्यांचे ओळखपत्र व आवश्यक कागदपत्रे घेण्यात आलेली आहेत. प्रगणना संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी या सर्वांना संबंधित प्रवेशद्वारावर सोडण्यात येणार आहे.दरवर्षीप्रमाणे यंदाही निसर्ग अनुभव घेण्यासाठी निसर्गप्रेमींमध्ये उत्साह दिसून येतो आहे. या सर्वांना ताडोबा प्रकल्पाच्यावतीने आवश्यक त्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. या सर्व सूचनांचे पालन करावे, असे निर्देश आहेत. बुद्ध पौर्णिमेच्या या निसर्ग अनुभव उपक्रमासाठी ताडोबा बफर क्षेत्रातील सर्व मचाण दुरुस्ती करून सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘त्यामुळे’ ओबीसींचं नुकसान…; हरिभाऊ राठोड यांचं आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य ‘त्यामुळे’ ओबीसींचं नुकसान…; हरिभाऊ राठोड यांचं आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य
सगळे सोयरे यांचा जर जीआर काढला. तर ओबीसींचा प्रचंड नुकसान होणार आहे. शैक्षणिक, रोजगार आणि राजकीय मोठं नुकसान होईल. राज्यात...
पतीच्या निधनावर पहिल्यांदाच मंदिरा बेदी व्यक्त; म्हणाली ‘पहिलं वर्ष खूप कठीण..’
‘अन् अचानक एकेदिवशी..’; अभिजीत खांडकेकरची भावूक पोस्ट
अमृताची आई-बाबांसोबत लंडन ट्रीप; म्हणाली, माझा सुपरहिरो आणि त्याची सुपर पॉवर…
काही महिन्यात नवी दिल्लीत वेगळा खेळ होऊ शकतो; आदित्य ठाकरेंनी भाजपवर डागली तोफ
EVM हा देशातील ब्लॅक बॉक्स; विश्वासार्हतेबाबत राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
युट्यूबमधून मिळणारी माझी सर्व कमाई दान करणार; ऋषभ पंतचा मोठा निर्णय, नेटकऱ्यांनी केलं कौतुक