अनगर येथील ‘लोकनेते पॅलेस’वर पोलिसांचा छापा, 38 जण ताब्यात; एक कोटीचा मुद्देमाल जप्त

अनगर येथील ‘लोकनेते पॅलेस’वर पोलिसांचा छापा, 38 जण ताब्यात; एक कोटीचा मुद्देमाल जप्त

मोहोळ तालुक्यातील अनगर येथील ‘लोकनेते पॅलेस’ येथे सुरू असलेल्या जुगार अड्डय़ावर प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक शुभम कुमार यांच्या विशेष पथकाने मंगळकारी रात्री छापा टाकला. यावेळी पोलिसांनी 38 जणांना ताब्यात घेतले. तसेच 2 लाख 26 हजार रुपयांची रोकड आणि 6 चारचाकी वाहने, 40 मोबाईल असा 1 कोटी 3 लाख 6 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ताब्यात घेतलेल्यांमध्ये सोलापुरातील बडय़ा हस्तींचा समावेश आहे. याप्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माजी आमदार राजन पाटील यांचे साम्राज्य असलेल्या अनगरमध्ये पहिल्यांदाच पोलिसांनी धाडसी कारवाई केली आहे. या कारवाईमुळे सर्वत्र चर्चेला उधाण आलं आहे. अनगर ते माढा या रोडवर अनगरपासून अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या ‘लोकनेते पॅलेस’ या दोन मजली इमारतीत जुगार चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी आणि प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक शुभम कुमार यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकाने मंगळवारी (दि. 21) रात्री छापा मारला.

त्यावेळी इमारतीच्या पहिल्या मजल्यावर रियाज बसू मुजावर (मोहोळ), विनायक नीलकंठ ताकभाते (सोलापूर), फारुख शेख याकूब (ओमनगर, सुरत), नितीन गुंड (अनगर), ओंकार विजय चव्हाण (चिंचनाका, चिपळूण), राजू लक्ष्मण भांगे (मार्डी, ता. उत्तर सोलापूर), महादेव बंडोबा पवार (सोलापूर), मनोज नेताजी सलगर (सोलापूर), स्वप्नील कोटा (सोलापूर), रोनक नवनीत मर्दा (सोलापूर), हर्षल राजेंद्र सारडा (सोलापूर), कृष्णा अर्जुन काळे (सोलापूर), अनिल किसन चव्हाण (सांगोला), धनप्पा भद्रे (सोलापूर), अब्रार करीम फकीर (चिपळूण), लखन जगदीश कोळी (मोहोळ), सोमनाथ दादासाहेब मोरे (मोहोळ), महादेव मुरलीधर दगडे (करोळे, ता. पंढरपूर), राम बलभीम कदम (अनगर), कृष्णा कल्याण राऊत (अकलूज), विलास धर्मराज कडेकर (वडवणी, जि. बीड), सुशील कैलास लंगोटे (माढा)हे तिरोट नाकाचा जुगार खेळताना सापडले.

तर दीपक चंद्रकांत गायककाड (मोहोळ), राजू हसन शेख (पोखरापूर, ता. मोहोळ), अय्याज इब्राहिम सय्यद (मोहोळ), दिनेश सुखदेक चकरे (पेनुर), बालाजी केरबा भोसले (कोंडी), ओंकार नेहरू बरे (मोहोळ), अप्पा सिद्राम पाटील घोडेश्कर (मोहोळ), एकनाथ भगकान चांगिरे, (परळी, जि. बीड), किशाल रघुनाथ क्षीरसागर (मोहोळ), संभाजी सोपान ककितकर (अनगर), फिरोज बाबू शेख (मोहोळ), सीताराम रामचंद्र कुंभार (मोहोळ), सज्जन लक्ष्मण शेळके (कोन्हेरी, मोहोळ), गोकिंद महादेक पाटील, (कोंडी), प्रशांत प्रकाश पाटील (कैराग), सोमनाथ भीमराक जोकारे (कांदलगाक, दक्षिण सोलापूर) यांनाही ताब्यात घेतले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

ग्राहकाला गरम समोसा मागणे पडले महागात, दुकानदाराने फोडले ग्राहकाचे डोके ग्राहकाला गरम समोसा मागणे पडले महागात, दुकानदाराने फोडले ग्राहकाचे डोके
समोसे अनेकांचा आवडता खाद्यप्रकार आहे. स्वस्त आणि सर्वत्र उपलब्ध असणारे समोसे गरमागरम मिळण्यासाठी खवय्यांचे प्राधान्य असते. परंतु आता जर तुम्ही...
Sanjay Raut : शिवसेना, राष्ट्रवादीनंतर मोदी सरकार ‘या’ तीन पक्षांचा गेम करणार, पक्ष फोडण्याचं काम सुरू, संजय राऊत यांचा गौप्यस्फोट
वरूण धवण लेकीसोबत पहिला फोटो पोस्ट करत म्हणाला, ‘मुलीचा बाप होण्याचा आनंद म्हणजे…’
धक्कादायक प्रकार उघड; रवींद्र वायकरांच्या मेहुण्याने वापरला EVM अनलॉक करणारा फोन
पीएम मोदी – मेलोनी यांच्या ‘मलोडी’ व्हिडीओवर कंगना रनौतची पहिली प्रतिक्रिया
सलमान खानला व्हिडीओच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी, लॉरेन्स बिश्नोई…
मासिक पाळीचा ‘तो’ सीन शूट करताना कशी होती अविका गौरची अवस्था? म्हणाली, ‘दिग्दर्शकांनी मला विचारलं…’