नगरमधील भीषण घटना ! SDRF पथकाची बोट उलटली; तीन जवानांचा मृत्यू तर, 2 बेपत्ता

नगरमधील भीषण घटना ! SDRF पथकाची बोट उलटली; तीन जवानांचा मृत्यू तर, 2 बेपत्ता

उजनी धरणाच्या बॅक वॉटरमध्ये सहा जण बुडाल्याची घटना ताजी असतानाच आता नगर जिल्ह्यामधून एक मोठी बातमी समोर आली आहे. प्रवरा नदीमध्ये बुडालेल्या तरुणांना शोधण्यासाठी गेलेल्या धुळे येथील SDRF पथकाची बोट उलटली असून त्यामध्ये तीन जवानांचा मृत्यू झाला आहे व आणखी दोन जण बेपत्ता असून त्यांचा शोध सुरु आहे.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर आमदार बाळासाहेब थोरात हे घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी या ठिकाणची माहिती घेऊन अनेकांची विचारपूस केली आहे तसेच मदत कार्य सुरू केले आहे. या घटनेमुळे नगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. नगर जिल्ह्यामधील अकोले तालुक्यातील प्रवरा नदीत दोघे तरुण बुडाले होते. त्यांना शोधण्यासाठी एसडीआरएफचे पथक आणि एक स्थानिक असे एकूण सहाजण बोटीतून नदीमध्ये उतरलेले होते.  शोधकार्य सुरु असतानाच एसडीआरएफ पथकाची बोट उलटून दुर्दवी घटना घडली. यामध्ये तिघांचा मृत्यू झाला असून उर्वरित तिघांचा शोध घेणे सुरु आहे.

काय घडली होती घटना ?

अकोले तालुक्यातील मनोहरपूर फाटा परिसरात प्रवरा नदीवरील केटीवेअर बंधाऱ्यात बुधवारी सागर पोपट जेडगुले, अर्जुन बबन जेडगुले हे दोघे बुडाले होते. सागर पोपट जेडगुले व अर्जुन बबन जेडगुले या दोघांसह 10 ते 11 जण बुधवारी मनोहरपूर फाटा परिसरात मूरघास काढण्यासाठी गेले होते. दुपारी 1.30 ते 2 दरम्यान मूरघास काढून झाल्यावर उन्हाच्या तीव्रतेने दिलासा घेण्यासाठी हे सर्व जण पोहण्यासाठी प्रवरा नदीपात्रातील मनोहरपूर फाटा येथील केटीवेअर बंधाऱ्याजवळ गेले होते. यावेळी पोहताना अर्जुन जेडगुले हा पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाला. तो पाण्यात बुडू लागल्याने त्यास वाचवण्यासाठी सागर जेडगुले पुढे गेला. त्यास वाचविण्याच्या प्रयत्नात सागरही पाण्यात बुडाला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘त्यामुळे’ ओबीसींचं नुकसान…; हरिभाऊ राठोड यांचं आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य ‘त्यामुळे’ ओबीसींचं नुकसान…; हरिभाऊ राठोड यांचं आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य
सगळे सोयरे यांचा जर जीआर काढला. तर ओबीसींचा प्रचंड नुकसान होणार आहे. शैक्षणिक, रोजगार आणि राजकीय मोठं नुकसान होईल. राज्यात...
पतीच्या निधनावर पहिल्यांदाच मंदिरा बेदी व्यक्त; म्हणाली ‘पहिलं वर्ष खूप कठीण..’
‘अन् अचानक एकेदिवशी..’; अभिजीत खांडकेकरची भावूक पोस्ट
अमृताची आई-बाबांसोबत लंडन ट्रीप; म्हणाली, माझा सुपरहिरो आणि त्याची सुपर पॉवर…
काही महिन्यात नवी दिल्लीत वेगळा खेळ होऊ शकतो; आदित्य ठाकरेंनी भाजपवर डागली तोफ
EVM हा देशातील ब्लॅक बॉक्स; विश्वासार्हतेबाबत राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
युट्यूबमधून मिळणारी माझी सर्व कमाई दान करणार; ऋषभ पंतचा मोठा निर्णय, नेटकऱ्यांनी केलं कौतुक