पश्चिम बंगालच्या नंदीग्राममध्ये BJP-TMC कार्यकर्ते भिडले; एकाचा मृत्यू, 7 गंभीर जखमी

पश्चिम बंगालच्या नंदीग्राममध्ये BJP-TMC कार्यकर्ते भिडले; एकाचा मृत्यू, 7 गंभीर जखमी

लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठी 25 मे रोजी मतदान होणार आहे. तत्पूर्वी पश्चिम बंगालच्या पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील नंदीग्राम येथे भारतीय जनता पक्ष आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये हिंसक संघर्ष भडकला आहे. बुधवारी रात्री झालेल्या या हिंसक संघर्षात भाजपच्या एका महिला कार्यकर्त्याचा मृत्यू झाला असून 7 कार्यकर्ते जखमी झाले आहेत. टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी रात्रीची वेळ साधत भ्याड आमच्या कार्यकर्त्यांच्या घरांवर भ्याड हल्ला केला असा आरोप भाजपने केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री नंदीग्राममधील सोनचुरा गावामध्ये ही घटना घडली. टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी रात्रीच्या सुमारास धारदार हत्यारांनी हल्ला केल्याचा आरोप भाजपच्या स्थानिक नेत्यांनी केली आहे. या हल्ल्यात भाजपच्या महिला कार्यकर्त्याचा मृत्यू झाला. रथिबाला आडी असे या महिला कार्यकर्त्याचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस आणि सुरक्षा जवानांचा फौजफाटा येथे तैनात करण्यात आला आहे.

दरम्यान, सहाव्या टप्प्यात 25 मे रोजी पूर्व मेदिनापूरसह एकूण 8 मतदारसंघात मतदान होणार आहे. यात तामलुक, कांथी, घाटल, झाडग्राम, मेदिनीपूर, पुरुलिया, बंकुरा आणि बिशनुपूरचा समावेश आहे. सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडेल.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘त्यामुळे’ ओबीसींचं नुकसान…; हरिभाऊ राठोड यांचं आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य ‘त्यामुळे’ ओबीसींचं नुकसान…; हरिभाऊ राठोड यांचं आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य
सगळे सोयरे यांचा जर जीआर काढला. तर ओबीसींचा प्रचंड नुकसान होणार आहे. शैक्षणिक, रोजगार आणि राजकीय मोठं नुकसान होईल. राज्यात...
पतीच्या निधनावर पहिल्यांदाच मंदिरा बेदी व्यक्त; म्हणाली ‘पहिलं वर्ष खूप कठीण..’
‘अन् अचानक एकेदिवशी..’; अभिजीत खांडकेकरची भावूक पोस्ट
अमृताची आई-बाबांसोबत लंडन ट्रीप; म्हणाली, माझा सुपरहिरो आणि त्याची सुपर पॉवर…
काही महिन्यात नवी दिल्लीत वेगळा खेळ होऊ शकतो; आदित्य ठाकरेंनी भाजपवर डागली तोफ
EVM हा देशातील ब्लॅक बॉक्स; विश्वासार्हतेबाबत राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
युट्यूबमधून मिळणारी माझी सर्व कमाई दान करणार; ऋषभ पंतचा मोठा निर्णय, नेटकऱ्यांनी केलं कौतुक