पळशी गावात आक्रमक मराठा आंदोलकांनी रावसाहेब दानवे यांना पिटाळून लावले

पळशी गावात आक्रमक मराठा आंदोलकांनी रावसाहेब दानवे यांना पिटाळून लावले

आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे, आमच्या आया-बहिणींवर लाठ्या चालविणार्‍यांचा धिक्कार असो, आरक्षण नाकारणार्‍या सरकारला जागा दाखवा, अशी घोषणाबाजी करीत आक्रमक झालेल्या मराठा आंदोलकांनी जालना लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार रावसाहेब दानवे यांना अक्षरश: पिटाळून लावले. पळशी गावात आज शनिवारी हा प्रकार घडला. गावात प्रचारनिमित्त दानवे यांची सभा घेण्याचा भाजप पदाधिकार्‍यांचा डाव देखील मराठा आंदोलकांनी उधळून लावला.

संपूर्ण महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांना मराठा आरक्षणाचा मुद्दा अडचणीचा ठरत आहे. सगेसोयर्‍यांची मागणी मान्य न झाल्यामुळे मराठा आंदोलकांच्या रोषाला उमेदवारांना सामोरे जावे लागत आहे. काही दिवसांपूर्वीच नांदेड जिल्ह्यात अशोकराव चव्हाण यांची मराठा आंदोलकांनी गाडी अडवली होती. ही घटना ताजी असतानाच शनिवारी छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील जालना लोकसभा मतदारसंघात येणार्‍या पळशी शहर गावात भाजपचे उमेदवार रावसाहेब दानवे यांची प्रचारसभा मराठा आंदोलकांनी उधळून लावली. दानवे हे गावात येणार असल्याची कुणकुण येथील मराठा आंदोलकांना एक दिवस अगोदरच लागली होती. आंदोलकांनी रात्रीच सोशल मीडियावर दानवे गावात आले तर त्यांनी मराठा आंदोलकांच्या प्रश्नांची उत्तरे देऊनच गावात प्रवेश करावा, असा मॅसेज व्हायरल केला होता. त्याची धास्ती गावातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घेतली. शनिवारी सकाळी अकरा वाजता रावसाहेब दानवे व त्यांच्यासोबत फुलंब्रीचे आमदार हरिभाऊ बागडे व अन्य कार्यकर्ते गावात आले. गावात फेरफटका मारत मतदारांशी चर्चा करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. मात्र फारसा प्रतिसाद मिळाला नाही. दानवे व बागडे बसस्थानकावर येताच मराठा आंदोलकांनी त्यांच्यासमोरच जोरदार घोषणाबाजी सुरू केली. आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, आमच्या आया-बहिणींवर लाठ्या चालविणार्‍यांचा धिक्कार असो, आरक्षण नाकारणार्‍या सरकारला जागा दाखवा अशा घोषणा दिल्या. मराठा आंदोलक आणि भाजप कार्यकर्ते समोरासमोर आल्याने एकच गोंधळ उडाला. त्यामुळे मराठा आंदोलकांनी उमेदवार रावसाहेब दानवे आणि हरिभाऊ बागडे यांना गावातून पिटाळून लावण्यात आले.

दोन्ही गटांत बाचाबाची, पोलिसांचा वेळीच हस्तक्षेप

पळशी बसस्थानकावर मराठा आंदोलकांनी घोषणा सुरू केल्यानंतर भाजपचे गावातील कार्यकर्त्यांनी त्यांच्या अंगावर धावून येत शिवीगाळ केली. मराठा आंदोलक व भाजप कार्यकर्त्यांत यावेळी जोरदार बाचाबाची झाली. वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप करत मराठा आंदोलक व भाजप कार्यकर्त्यांना एकमेकांपासून दूर केले. शेवटी दानवे व बागडे यांनी बसस्थानकावर छोट्या शटरमध्ये औपचारिकता म्हणून सभा घेत पळशी गावातून पाय काढता घेतला.

मराठाबांधवांचा दानवेंचा सवाल

शेतमालाला एमएसपी का नाही, शेतकरी आत्महत्यांची एसआयटी चौकशी का नाही, बियाणे व खतांचे भाव वाढवले असताना शेतमालाला भाव का नाही, सर्वच बाबतीत वाढत्या महागाईला जबाबदार कोण, गावात जाण्यासाठी असलेला जुना पूल तुटल्याने नवीन उभारण्यासाठी निधी का दिला नाही, असे विविध प्रश्न मराठा आंदोलकांकडून रावसाहेब दानवेंना विचारण्याचा मराठा आंदोलकांचा प्रयत्न होता.

चर्चा न करताच ते निघून गेले

मराठा आरक्षणासह शेतकर्‍यांशी संबंधित प्रश्नांवर उमेदवार रावसाहेब दानवे यांच्यासोबत आम्हाला चर्चा करायची होती. मात्र ते आमच्याशी चर्चा न करताच निघून गेले. त्यांच्यासमोर आम्ही केवळ घोषणाबाजी केली. मात्र त्यांचे कार्यकर्ते थेट आमच्या अंगावर धावून आले. मारहाण करण्याचा त्यांचा बेत होता. मात्र पोलिसांमुळे तो सफल झाला नाही – बाबासाहेब गायकवाड, मराठा समन्वयक, पळशी शहर.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Monsoon : यंदा मरीन ड्राईव्हवर पावसाची मजा घ्यायला जाण्याचा प्लान करताय तर सावधान… Monsoon : यंदा मरीन ड्राईव्हवर पावसाची मजा घ्यायला जाण्याचा प्लान करताय तर सावधान…
यावेळी मान्सूनची जरा जास्तच वाट पाहीली जात आहे. दरवर्षी आपल्याला यंदाचा उन्हाळा जरा जास्तच कडक होता असं जरी वाटत असलं,...
मुंबई लोकलमध्ये डान्स, व्यावसायिक डान्सरचे ते नृत्य पाहून नेटकरी भडकले
चालत्या गाडीवर उभा राहून स्टंट, काही लाइक्स आणि व्ह्यूजसाठी जीवाशी खेळ
‘बिग बॉस मराठी 5’ का सोडला? महेश मांजरेकरांनी सांगितलं कारण
अर्जुन कपूरसोबत ब्रेकअपच्या चर्चा, मलायकासोबत दिसणारा मिस्ट्री मॅन कोण? फोटो तुफान व्हायरल
शुभमन गिलसोबत ज्या अभिनेत्रीच्या लग्नाची चर्चा; तिचं राहुल द्रविडशी खास कनेक्शन
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’मध्ये रंजक ट्विस्ट; अक्षराकडून अधिपतीला रोमँटिक गिफ्ट