Pimpri-Chinchwad Municipal Corporation - News Express Marathi

पवना नदी प्रदूषणाच्या विळख्यात, तातडीने उपाय योजना करा : माजी विरोधी पक्षनेते नाना काटे
पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना नदीवरील थेरगाव येथील केजुदेवी बंधारा परिसरात नदीच्या पाण्यावर सोमवारी (दि.21) मोठ्या प्रमाणात पांढरा फेस आल्याचे दिसले. काही कंपन्या व उद्योगाचे रासायनिक सांडपाणीही प्रक्रिया न करता नदीपात्रात मिसळत आ

हे. शहरासाठी वरदायनी असणाऱ्या पवनामाई नदीची दुरवस्था झाली असून प्रदूषणाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी उपाय योजना करण्याची मागणी माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी महापालिकेकडे प्रसिध्दीपत्रकाद्वारे केली आहे.

याबाबत काटे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांपासून पवना नदीत वारंवार फेसाळत आहे. महापालिका पर्यावरण विभाग दिखाव्यासाठी नाममात्र कारवाई करते. पालिकेने शहरातील नागरिकांना दूषित पाणीपुरवठा करण्याचे पाप माथी घेऊ नये. जुलै महिन्यात पवना नदी पात्रता असाच फेस आला होता. त्यावेळी काही लॉंड्री व्यावसायिकावर गुन्हा दाखल केला होता. नदी प्रदूषणात व्यवसाय करणाऱ्या बरोबर पावसाच्या वाहते पाणी, जलपर्णी, माती, कचरा, राडारोडा घाण मिसळते आणि पाणी दुषित होते. नदीत वाहने धुणे, वेगवेगळी रसायन पाण्यात सोडणे, केमिकलने माखलेले कपडे, वस्तू पाण्यांत टाकणे, ड्रेनेजचे पाणी थेट नदीपात्रात सोडणे असे अनेक प्रकार वारंवार होताना दिसत आहेत.

शहरातून वाहणाऱ्या पवना, इंद्रायणी व मुळा नदीच्या प्रदूषणाचा विषय दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. महापालिकेने पुढाकार घेत तिन्ही नद्यांना मोकळा श्वास घेण्यासाठी अपेक्षित उपाय योजना तातडीने कराव्यात.
- नाना काटे, माजी विरोधी पक्षनेते.

माझ्या कार्यकर्त्यांना वाली नाही असे समजू नका; एकतर्फी निर्णय घेऊ नका : उपमुख्यमंत्री अजित पवार
पिंपरी :  बोऱ्हाडेवाडी, मोशी येथे सर्व्हे २३० (१३४७) मध्ये महापालिकेच्या वतीने घनकचरा व्यवस्थापन कायद्यानुसार कचरा स्थानांतर केंद्र उभा करण्याचा प्रस्ताव आहे. अगोदरच मोशीमध्ये कचरा डेपो आहे. तसेच रिव्हर रेसिडेन्सी येथील रद्द करण्यात आलेला सांडपाणी प्रकल्प त्याच्याच खाली २०० मीटर वर सुरू असून त्याचे काम वेगाने सुरू आहे. त्यातच आता प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रत्येकी दोन कचरा स्थानांतर केंद्र करण्यात येणार आहेत. जुना प्रभाग क्रमांक २, ६, ८ व ९ यापैकी बोऱ्हाडेवाडी येथेच एक

कचरा स्थानांतर केंद्र उद्यानाची जागा आरक्षित असताना त्याच जागेवर हे केंद्र उभा करण्यात येत असल्याने नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष अतिश बारणे व महिला आघाडीच्या अध्यक्षा प्रा.कविता आल्हाट यांच्या नेतृत्वाखाली शिषटमंडळाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन आपल्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

नागरिकांच्या प्रतिक्रिया ऐकल्यानंतर अजित पवार यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंग यांना दूरध्वनी वरून संपर्क साधत माझ्या कार्यकर्त्यांना वाली नाही असे समजू नका असा सज्जड दम देत कोणते ही काम विचार विनिमायानी करा असे आदेश दिले आहेत.

मुंबई येथील देवगिरी बंगल्यावर शिष्टमंडळ भेटल्यानंतर सोसायटी धारकांच्या प्रतिनिधी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, उपाध्यक्ष अतिश बारणे, महिला आघाडीच्या शहराध्यक्ष कविता आल्हाट, नगरसेवक वसंत बोराटे, चिखली मोशी फेडरेशनचे अध्यक्ष विकास साने, विशाल आहिरे, अश्विनी सस्ते, जीवन सस्ते काशिनाथ धरी, उमेश उगीले, विनोद शिर्के यांनी आयुक्त शेखर सिंग यांची भेट घेतली.

तसेच २४ मीटर रस्त्यावरील मोकळे मैदान आरक्षण १/१३७ येथे हॉर्स रायडिंग साठी विकसित करण्यात येणार आहे. त्याला ही परिसरातील रिव्हर रेसिडेन्सी, स्वराज्य, क्रिस्टल, ऐश्नावर्यम हमारा, शुभयोग, प्रिस्तींन ग्रीन, सिल्व्हर ९ सोसायटीतील नागरिकांनी विरोध दर्शविला आहे. जुना प्रभाग क्रमांक दोन येथे मैदान नसल्याने परिसरातील खेळाडू या मैदानावर सराव करीत आहेत. तसेच या ठिकाणी ओपन जिम असल्याने परिसरातील नागरीक व महिला व्यायामासाठी वापर करत होते. परंतु महापालिका प्रशासनाने याठिकाणी हॉर्स रायडिंग साठी जागा आरक्षित केल्यामुळे परिसरातील मुलांनी खेळण्यासाठी खासगी व्यवसायिकाकडे पैसे मोजून खेळायचे का असा सवाल ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समोर उपस्थित केला. त्यासंदर्भात ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुलांनी सराव व खेळ कोठे खेळायचे असा सवाल आयुक सिंग यांना केला आहे.

आपण काही निर्णय एकतर्फी घेत आहात. यापुढे असे चालणार नाही. नागरिकांच्या दृष्टीने व त्यांचा विचार करूनच निर्णय घेणे अपेक्षित आहे. यापुढे कोणतेही निर्णय मला विचारल्याशिवाय घ्यायचे नाहीत, मी महापालिकेमध्ये मीटिंग घेणार आहे. त्यावेळी नागरिकांच्या, शहरवासीयांच्या हिताचे निर्णय घेतले गेले पाहिजेत. फक्त कोणी तरी सांगत आहे म्हणून जर आपण काही निर्णय घेत असाल तर ते थांबवा. माझ्या कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी प्रश्न मांडले तर त्यावर ही विचार करा, तुम्हाला माझी काम करण्याची पद्धत माहीत आहे, कोणते ही निर्णय यापुढे एकतर्फी झाले नाही पाहिजेत असा सज्जड दम अजित पवार यांनी आयुक्त शेखर सिंग यांना दिला.

अजित पवार गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांत  उत्साह...

महापालिकेत भाजपाची एकहाती सत्ता आहे. त्यामुळे बहुतांशी भाजपाच्या आमदार, नगरसेवक व पदाधिकाऱ्यांची चलती आहे. परंतु राज्यातील राजकारणात शिंदे, फडणवीस आणि अजित पवार हे गट एकत्रित आल्यामुळे महापालिकेतील ही राजकारण बदलले आहे. भाजपा बरोबरच अजित पवार गटातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी मांडलेल्या प्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्य द्या असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. यापुढे कोणतेही निर्णय नागरिकांच्या विरोधात कोण तरी सांगत आहे म्हणून घेऊ नका असे खुद्द आयुक्तांना आदेश दिले असल्याने अजित पवार यांच्या गटातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे.

हॉर्स रायडिंग ऐवजी क्रीडांगण करा

तसेच २४ मीटर रस्त्यावरील मोकळे मैदान आरक्षण १/१३७ येथे हॉर्स रायडिंग साठी विकसित करण्यात येणार आहे. त्याला ही परिसरातील रिव्हर रेसिडेन्सी, स्वराज्य, क्रिस्टल, ऐश्नावर्यम हमारा, शुभयोग, प्रिस्तींन ग्रीन, सिल्व्हर ९ सोसायटीतील नागरिकांनी विरोध दर्शविला आहे. जुना प्रभाग क्रमांक दोन येथे मैदान नसल्याने परिसरातील खेळाडू या मैदानावर सराव करीत आहेत. तसेच या ठिकाणी ओपन जिम असल्याने परिसरातील नागरीक व महिला व्यायामासाठी वापर करत होते. परंतु महापालिका प्रशासनाने याठिकाणी हॉर्स रायडिंग साठी जागा आरक्षित केल्यामुळे परिसरातील मुलांनी खेळण्यासाठी खासगी व्यवसायिकाकडे पैसे मोजून खेळायचे का असा सवाल ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समोर उपस्थित केला. त्यासंदर्भात ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुलांनी सराव व खेळ कोठे खेळायचे असा सवाल आयुक सिंग यांना केला आहे.

हिंजवडी, माण, मारूजींसह सात गावे लवकरच पिंपरी-चिंचवड महापालिकेत: खासदार श्रीरंग बारणे
पिंपरी: पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दी लगत आणि विकासापासून वंचित असलेल्या हिंजवडी, माण, मारूजी, जांबे, नेरे, सांगवडे, गहुंजे या सात गावांचा पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात समावेश करण्याची मागणी मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी तत्काळ प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. त्यामुळे ही गावे लवकरच पालिकेत येतील असा विश्वास खासदार बारणे यांनी व्यक्त केला.

खासदार बारणे यांनी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. याबाबतचे निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की, महापालिका हद्दीलगत हिंजवडी, माण,मारूंजी, नेरे, जांभे, सागंवडे, गहुंजे ही गावे आहेत. या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले आहे. त्याठिकाणी मुलभूत सुविधांचा अभाव आहे. आयटीनगरी असलेल्या हिंजवडीचा, माणचा विकास होणे गरजेचे आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे ग्रामपंचायतीला नागरिकांना सुविधा देणे शक्य होत नाही. सुविधांसाठी नागरिकांनी गावांचा महापालिकेत समावेश करण्याची मागणी केली आहे. मावळ, मुळशी तालुक्यात असलेली ही गावे महापालिकेच्या अगदी जवळ आहेत.

हिंजवडी, माण या क्षेत्रात मोठ्या भागत आयटी पार्क आहे. देशभरातील नागरीक या ठिकाणी वास्तव्यास आहेत. वाढते नागरीकरण, सुविधांचा अभाव, वाहतुकीची समस्या या गोष्टींचा विचार करून ही गावे महापालिकेत येण्याची आवश्यकता आहे. गहुंजे या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम आहे. या गावात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प पुरेसे नसल्याने अशुद्ध पाणी थेट नदीपात्रात सोडले जाते. त्यामुळे पवना नदीचे प्रदुषण वाढले आहे.

गावांचा विकास, नागरीकांना सर्व सोयी-सुविधा मिळाव्यात आणि अनाधिकृत बांधकाम रोखण्याच्या दृष्टीकोणातून हिंजवडी, माण, मारूंजी, नेरे, जांबे, सांगवडे आणि गहुंजे यां गावांचा महापालिका क्षेत्रात समावेश करावा अशी विनंती खासदार बारणे यांनी केली.  त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक विचार करून लवकरच निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिले.