Pimpri-Chinchwad - News Express Marathi

लक्षवेधी: ७ व्यक्तींना अवयवाच्या माध्यमातून ‘साथ’ देत खऱ्या अर्थाने तो ठरला ‘अ-क्षत’..!
पिंपरी : अक्षत लोहाडे या चौदा वर्षीय मुलाचा अपघात मागील शुक्रवारी (दि.२५) रोजी सायं. ६ वाजता शाहूनगर येथे झाला होता. अपघातानंतर त्याच्या सोबत असलेल्या वाहनचालकाचा जागेवरच मृत्यू झाला होता. त्या अपघातामध्ये अक्षत हा जबर जखमी झाल्याने त्याचा मेंदू निकामी झाला होता.

अक्षत सचिन लोहाडे (वय १४), असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. अक्षत याचे वडील सचिन हे खासगी कंपनीत नोकरीला आहेत, तर आई सुवर्णा ही विमा प्रतिनिधी आहे. मोठी बहीण विधी हिने वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला आहे. अक्षत हा इयत्ता नववीत शिकत होता.

अक्षत हा २५ ऑगस्ट रोजी सायंकाळी मित्रासोबत दुचाकीवरून जात असताना अपघात झाला. जखमी अक्षतला रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्याचा मेंदू निकामी झाला. मेंदू विकार तज्ञ (Neurologist) डॉ. अमित पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्याला संपूर्ण वैद्यकीय उपचार दिल्यानंतरही त्याचा उपयोग होत नव्हता. त्यानंतर वैद्यकीय तज्ञ डॉ.अमित पांडे यांच्या समुपदेशनामुळे अक्षतचे आई – वडील सौ. सुवर्णा व श्री. सचिन लोहाडे यांनी अक्षतचे अवयव दान करण्याचा धाडसी व योग्य असा निर्णय घेतला. अक्षतचे अवयव दान करण्याच्या निर्णयामुळे ७ जणांना त्यांचे आयुष्य मिळणार असून ते अपंगत्वावर मात करणार आहेत.

खरं तर अक्षतचा विरह हा प्रचंड वेदनादायी आहे. परंतू त्याचे अवयव दान करण्याच्या निर्णयामुळे तो खऱ्या अर्थाने ७ व्यक्तींना अवयवाच्या माध्यमातून “साथ” देत “अ-क्षत” ठरला आहे. अवयवदानाने ज्या सात जणांच्या तसेच त्यांच्या कुटुंबियांच्या आयुष्याला एक वेगळेपण येणार आहे त्याचे मनःस्वी समाधानही अक्षतच्या कुटूंबियांना मिळाले आहे.

अक्षतच्या पार्थिवावर काल दुपारी ३ वाजता धर्मसंस्कारासह अंत्यविधी हा निगडी येथील अमरधाम स्मशानभूमी येथे करण्यात आले. अक्षत पंचतत्वात विलीन होत असतांना लाभार्थ्यांवर यशस्वी पध्दतीने अवयवांचे प्रत्यारोपणही झाले आहे.

चाकण:टेपचा जोरात आवाज का केला म्हणून चौघांची रिक्षाचालकाला मारहाण
पिंपरी: ‘रिक्षात टेपचा जोरात आवाज का केला आहे, तु आम्हाला ओळखतो का’, अशी आरोपी चौघांनी फिर्यादीला विचारणा केली. फिर्यादी यांनी त्यांना काय झाले? असे विचारले. त्या कारणावरून चिडुन जात आरोपी चौघांनी फिर्यादी यांना हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली.

तेवढ्यात आरोपी क्र. १ याने तेथे पडलेला फरशीचा तुकडा फिर्यादीच्या डोक्यास, कपाळावर मारुन त्यांना जखमी केले. तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे. ही घटना (दि. २) रोजी रात्री ८.०० वाजता शिवाजी विद्यालय, मांजरे स्टिल दुकानाजवळ, चाकण येथे घडली.

फिर्यादी रिक्षाचालक जीवन विक्रम जाधव यांनी आरोपी १) अमोल विश्वनाथ लाटकर (वय २७ वर्षे रा एकतानगर चाकण), २) पराग बबन गायकवाड (वय २० वर्षे रा खंडोबामाळ, चाकण), ३) विवेक कु-हाडे, ४) विधीसंघर्षित बालक यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. चाकण पोलिसांनी ७०२/२०२३ भादवि कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६,३४ नुसार गुन्हा दाखल करीत आरोपी क्र १ व २ यांना अटक केली आहे. पोना चव्हाण तपास करीत आहेत.

पिंपळे सौदागर येथे लवकरच नवीन पोस्ट ॲाफीस कार्यालय सुरू होणार ; नाना काटे यांच्या पाठपुराव्यास यश
पिंपरी : रहाटणी पिंपळे सौदागर येथे लवकरच नविन पोस्ट ॲाफीस सुरू होणार असुन त्यासाठी भारतीय डाकघर विभाग व महापालिका यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद देत पत्रव्यवहाराद्वारे तसे कळविले आहे.

नाना काटे यांनी पोस्ट ॲाफीस व महापालिका विभागा यांना दिलेल्या पत्रात असे नमुद केले की, प्रभाग क्र २८ रहाटणी पिंपळे सौदागर या प्रभागत ८० हजार ते १ लाख व त्यापेक्षा जास्त लेकसंख्या आहे, या परिसरात खासगी, व सरकारी शाळा, महाविद्यालये, तसेच संरक्षण विभागाचे कार्यालय, निवास्थान, सरकारी व खासगी बॅकाचे व आयटी पार्कचे कार्यालय आहेत. परिसरातील नागरिकांना पोस्ट ॲाफीस बाबत कामे करण्यासाठी,औधं किंवा पिंपरी, चिचवड च्या पोस्ट ॲाफीस मध्ये जावे लागत असल्याने नागरिकांना याचा त्रास व मोठी गैरसोय होत असल्याचे पोस्ट ॲाफीस विभाग व मनपा विभाग यांच्या निदर्शनास आणुन दिले होते, त्यासाठी रहाटणी पिपंळे सौदागर येथे नविन पोस्ट सुरू व्हावे, यासाठी २०१२ पासून पत्रव्यवहार देखील नाना काटे व शितल काटे यांनी वेळोवेळी पोस्ट ॲाफीस विभाग व महापालिका यांच्याकडे केला होता व सातत्याने प्रयत्न देखील करीत होते.

त्यांना नवीन पोस्ट ऑफिससाठी लागणारी महापालिकेची पर्यायी जागा देखील सुचविली होती त्याची पाहणी देखील मनपा व पोस्ट विभागाच्या अधिकारी वर्सोगाबत केली होती. त्याचेच यशप्राप्त म्हणुन त्यास अनुसरून पोस्ट ॲाफीस विभाग व महापालिका यांनी रहाटणी पिपंळे सौदागर येथे नविन सुरू करण्याच्या प्रशासकीय कामास सुरूवात करण्यात आली आहे तसे पत्राद्वारे देखील त्यांनी कळविले आहे. त्यामुळे रहाटणी पिपंळे सौदागर परिसरात नवीन पोस्ट ऑफिस सुरु होणार असल्याने नागरिकाची पोस्ट ॲाफीसची वणवण आता संपणार आहे.

माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबिराचे आयोजन
पिंपरी : माजी नगरसेवक संदीप बाळकृष्ण वाघेरे यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. शिबिराचे आयोजन शनिवार दिनांक २६ व २७ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी ११ ते ५ यावेळेमध्ये करण्यात आलेले आहे. तसेच सोमवार दिनांक २८ ऑगस्ट रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर कार्यक्रमास पुणे जिल्हयातील अनेक धर्मादाय रुग्णालयांनी सहभाग घेतला असून अनेक गरीब गरजू रुग्णांना विविध योजनांचा लाभ घेणे शक्य होणार आहे. शिबिरामध्ये हृदयरोग शस्त्रक्रिया व प्रत्यारोपण, किडनी विकार प्रत्यारोपण,कॉकलर इंप्लांट, लिव्हर प्रत्यारोपण, गुडघे प्रत्यारोपण, हाडांचे व मणक्यांचे आजार,हिप प्रत्यारोपण, कॅन्सर शस्त्रक्रिया व केमोथेरेपी,प्लास्टिक सर्जरी, दंतरोग नेत्ररोग,नेत्ररोग,बालरोग व शस्त्रक्रिया, मेंदूची शस्त्रक्रिया,आयुर्वेदिक उपचार मूत्र मार्गाचे विकार,मूत्र मार्गाचे विकार,त्वचा विकार,फाटलेली टाळूव ओठांवरील शस्त्रक्रिया,बॉडी चेकअप,एपिलीप्सी. – फिट येणे, होमियोपथी,कान नाक घसा,अनियमित रक्तदाब,मधुमेह,किशोरवयीन मुलींचे समुपदेशन,गरोदर मातांची तपासणी /लहान मुलांच्या हृदयामधील छिद्राची शस्त्रक्रिया,मोफत एन्जिओग्राफी,आयुर्वेदिक या आजारांवरती मोफत तपासणी व उपचार होणार आहे. औषधोपचार किंवा शस्त्रकिया करण्यासाठी या महाआरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर शिबीर संदीप भाऊ बाळकृष्ण वाघेरे जनसंपर्क कार्यालय,शिवराज्य चौक पिंपरी गाव पुणे ४११०१७ येथे आयोजन केले आले असून,शिबिरामध्ये सहभाग घेण्यासाठी अमित कुदळे (९६७३४९४१४९), राजेंद्र वाघेरे(९९२२८६३८९३), रंजना जाधव(९७६६४८७२३६),हनुमंत वाघेरे (९६५७७४८५०५) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन संदीप वाघेरे यांनी केले आहे.

माझ्या कार्यकर्त्यांना वाली नाही असे समजू नका; एकतर्फी निर्णय घेऊ नका : उपमुख्यमंत्री अजित पवार
पिंपरी :  बोऱ्हाडेवाडी, मोशी येथे सर्व्हे २३० (१३४७) मध्ये महापालिकेच्या वतीने घनकचरा व्यवस्थापन कायद्यानुसार कचरा स्थानांतर केंद्र उभा करण्याचा प्रस्ताव आहे. अगोदरच मोशीमध्ये कचरा डेपो आहे. तसेच रिव्हर रेसिडेन्सी येथील रद्द करण्यात आलेला सांडपाणी प्रकल्प त्याच्याच खाली २०० मीटर वर सुरू असून त्याचे काम वेगाने सुरू आहे. त्यातच आता प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रत्येकी दोन कचरा स्थानांतर केंद्र करण्यात येणार आहेत. जुना प्रभाग क्रमांक २, ६, ८ व ९ यापैकी बोऱ्हाडेवाडी येथेच एक

कचरा स्थानांतर केंद्र उद्यानाची जागा आरक्षित असताना त्याच जागेवर हे केंद्र उभा करण्यात येत असल्याने नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष अतिश बारणे व महिला आघाडीच्या अध्यक्षा प्रा.कविता आल्हाट यांच्या नेतृत्वाखाली शिषटमंडळाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन आपल्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

नागरिकांच्या प्रतिक्रिया ऐकल्यानंतर अजित पवार यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंग यांना दूरध्वनी वरून संपर्क साधत माझ्या कार्यकर्त्यांना वाली नाही असे समजू नका असा सज्जड दम देत कोणते ही काम विचार विनिमायानी करा असे आदेश दिले आहेत.

मुंबई येथील देवगिरी बंगल्यावर शिष्टमंडळ भेटल्यानंतर सोसायटी धारकांच्या प्रतिनिधी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, उपाध्यक्ष अतिश बारणे, महिला आघाडीच्या शहराध्यक्ष कविता आल्हाट, नगरसेवक वसंत बोराटे, चिखली मोशी फेडरेशनचे अध्यक्ष विकास साने, विशाल आहिरे, अश्विनी सस्ते, जीवन सस्ते काशिनाथ धरी, उमेश उगीले, विनोद शिर्के यांनी आयुक्त शेखर सिंग यांची भेट घेतली.

तसेच २४ मीटर रस्त्यावरील मोकळे मैदान आरक्षण १/१३७ येथे हॉर्स रायडिंग साठी विकसित करण्यात येणार आहे. त्याला ही परिसरातील रिव्हर रेसिडेन्सी, स्वराज्य, क्रिस्टल, ऐश्नावर्यम हमारा, शुभयोग, प्रिस्तींन ग्रीन, सिल्व्हर ९ सोसायटीतील नागरिकांनी विरोध दर्शविला आहे. जुना प्रभाग क्रमांक दोन येथे मैदान नसल्याने परिसरातील खेळाडू या मैदानावर सराव करीत आहेत. तसेच या ठिकाणी ओपन जिम असल्याने परिसरातील नागरीक व महिला व्यायामासाठी वापर करत होते. परंतु महापालिका प्रशासनाने याठिकाणी हॉर्स रायडिंग साठी जागा आरक्षित केल्यामुळे परिसरातील मुलांनी खेळण्यासाठी खासगी व्यवसायिकाकडे पैसे मोजून खेळायचे का असा सवाल ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समोर उपस्थित केला. त्यासंदर्भात ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुलांनी सराव व खेळ कोठे खेळायचे असा सवाल आयुक सिंग यांना केला आहे.

आपण काही निर्णय एकतर्फी घेत आहात. यापुढे असे चालणार नाही. नागरिकांच्या दृष्टीने व त्यांचा विचार करूनच निर्णय घेणे अपेक्षित आहे. यापुढे कोणतेही निर्णय मला विचारल्याशिवाय घ्यायचे नाहीत, मी महापालिकेमध्ये मीटिंग घेणार आहे. त्यावेळी नागरिकांच्या, शहरवासीयांच्या हिताचे निर्णय घेतले गेले पाहिजेत. फक्त कोणी तरी सांगत आहे म्हणून जर आपण काही निर्णय घेत असाल तर ते थांबवा. माझ्या कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी प्रश्न मांडले तर त्यावर ही विचार करा, तुम्हाला माझी काम करण्याची पद्धत माहीत आहे, कोणते ही निर्णय यापुढे एकतर्फी झाले नाही पाहिजेत असा सज्जड दम अजित पवार यांनी आयुक्त शेखर सिंग यांना दिला.

अजित पवार गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांत  उत्साह...

महापालिकेत भाजपाची एकहाती सत्ता आहे. त्यामुळे बहुतांशी भाजपाच्या आमदार, नगरसेवक व पदाधिकाऱ्यांची चलती आहे. परंतु राज्यातील राजकारणात शिंदे, फडणवीस आणि अजित पवार हे गट एकत्रित आल्यामुळे महापालिकेतील ही राजकारण बदलले आहे. भाजपा बरोबरच अजित पवार गटातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी मांडलेल्या प्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्य द्या असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. यापुढे कोणतेही निर्णय नागरिकांच्या विरोधात कोण तरी सांगत आहे म्हणून घेऊ नका असे खुद्द आयुक्तांना आदेश दिले असल्याने अजित पवार यांच्या गटातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे.

हॉर्स रायडिंग ऐवजी क्रीडांगण करा

तसेच २४ मीटर रस्त्यावरील मोकळे मैदान आरक्षण १/१३७ येथे हॉर्स रायडिंग साठी विकसित करण्यात येणार आहे. त्याला ही परिसरातील रिव्हर रेसिडेन्सी, स्वराज्य, क्रिस्टल, ऐश्नावर्यम हमारा, शुभयोग, प्रिस्तींन ग्रीन, सिल्व्हर ९ सोसायटीतील नागरिकांनी विरोध दर्शविला आहे. जुना प्रभाग क्रमांक दोन येथे मैदान नसल्याने परिसरातील खेळाडू या मैदानावर सराव करीत आहेत. तसेच या ठिकाणी ओपन जिम असल्याने परिसरातील नागरीक व महिला व्यायामासाठी वापर करत होते. परंतु महापालिका प्रशासनाने याठिकाणी हॉर्स रायडिंग साठी जागा आरक्षित केल्यामुळे परिसरातील मुलांनी खेळण्यासाठी खासगी व्यवसायिकाकडे पैसे मोजून खेळायचे का असा सवाल ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समोर उपस्थित केला. त्यासंदर्भात ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुलांनी सराव व खेळ कोठे खेळायचे असा सवाल आयुक सिंग यांना केला आहे.

रस्त्यावर सुरक्षितता व समान हक्क मिळण्यासाठी इंडो ॲथलेटिक्स सोसायटीकडून आंदोलन
पिंपरी: हर्षद पिंगळे यांच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरलेल्या व्यक्तीस योग्य ते शासन मिळण्याबाबत व अशा चालकांकडून होणार्‍या त्रासास आळा बसण्याबाबत इंडो ॲथलेटिक्स सोसायटीकडून पौड पोलिसांना निवेदन सादर करण्यात आले. सुरक्षित व समान हक्क मिळण्यासाठी आयएएसतर्फे आंदोलन करण्यात आले.

यावेळी गणेश भुजबळ, अजीत पाटील, गिरिराज उमरीकर, अजित गोरे, अमित पवार, मदन शिंदे, विजय गायकवाड, संतोष नखाते, प्रदीप टाके, हरिप्रिया, दीपक बुरकुल, श्रीकांत चौधरी, अभय खटावकर, शैलेश पाटील, संदीप परदेशी, रमेश पवार, विवेक कडु, अंजली खटावकर, केशव, निलेश टकले, स्मिता गाबादे, संदीप गायकवाड व स्काय मानस लेक सोसायटी सभासद यांनी पुणे विद्यापीठ ते पौड पोलीस स्टेशन सायकल मार्च चे नेतृत्व केले. शहरातील ५०० सायकलिस्ट धावपटू असे सहभागी होते. यावेळी पिंगळे कुटुंबातील सदस्य देखील उपस्थित होते.

बुधवार दिनांक १६ ऑगस्ट २०२३ रोजी हर्षद पिंगळे हे नेहमी प्रमाणे स्वतः च्या शरीरस्वास्थासाठी पळण्याचा सराव करीत असताना त्यांना भूगाव दरम्यान अनोळखी वाहन धडक देवून निघून गेले. यात हर्षद पिंगळे गंभीर जखमी झाले व त्याच दिवशी त्यांचा मृत्यू झाला. या व अशा अनेक घटना सध्या सर्रास घडत आहेत. अशा प्रवृत्तींना आळा बसणे व संबधित वाहन चालकास योग्य ती शिक्षा होऊन त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा. भविष्यात अशा दुर्घटना घडू नयेत म्हणून पोलिसांकडून उत्तेजक द्रव्य तपासणी, नियमबाह्य़ चालक तपासणी अशा गोष्टी सुरू करण्यासाठी हा अर्ज आम्ही सादर केला असे आयएएसचे संस्थापक सदस्य अजित पाटील यांच्याकडून सांगण्यात आले.

महानगरांमध्ये आजकाल सर्रास असे प्रकार घडत आहेत. सकाळच्या वेळी मोठ्या प्रमाणात सायकल स्वार व रनरची संख्या वाढली आहे. परंतु त्यांच्या सुरक्षिततेबाबत कोणत्याही प्रकारची प्रशासनाकडून काळजी घेण्यात येत नाही. त्यांच्यासाठी सुरक्षित असे इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध नाही. एका बाजूला आपण प्रदूषण मुक्त शहरांचे स्वप्न पाहत आहोत. परंतु सायकल फ्रेंडली इन्फ्रास्ट्रक्चर बाबत कोणत्याही प्रकारची पावले उचलण्यात येत नाही असे आयएएसचे संस्थापक सदस्य गणेश भुजबळ यांच्यातर्फे सांगण्यात आले.

मागील वर्षामध्ये अशाप्रकारे रस्त्यावर पाच ते दहा व्यक्तींना आपला जीव गमवावा लागला आहे. हर्षद पिंगळे अतिशय सुस्वाभावी व मनमिळावू अभियंता होता. त्यांच्या डोक्याला इजा होऊन देखील त्यांच्या मृत्यूचे खरे कारण शोधण्यासाठी टाळाटाळ होत आहे. खरे कारण लवकरात लवकर पुढे यावे आणि दोषी व्यक्तीवर कडक कारवाई करण्यात यावी. सर्वांच्या न्याय हक्कासाठी आयएएस संघटनेतर्फे रस्त्यावर उतरण्यात येईल.

शहरामध्ये व हायवेवर मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कामे चालू आहेत. त्यावर आत्ताच ॲथलेट लोकांसाठी स्वतंत्र ट्रॅक उपलब्ध व्हावेत अशी मागणी महापालिकेकडे वेळोवेळी करण्यात आली आहे. परंतु या मागणीकडे कोणत्याही प्रकारचे दखल घेतली जात नाही. त्यामुळे यापुढे राज्य सरकारला व केंद्रीय समितीला देखील या संदर्भात निवेदन संस्थेतर्फे करण्यात येईल असे इंडो ॲथलेटिक्सच्या वतीने सांगण्यात आले.

श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे आमदार महेश लांडगे यांची ‘ फराळ सेवा’
पिंपरी: श्रावण सोमवार निमित्त श्रीक्षेत्र भिमाशंकर येथे भाविकांसाठी उपवास फराळ आणि महाप्रसाद सेवा सुरू आहे. यासाठी भाजपा आमदार महेश लांडगे यांनी पुढाकार घेतला आहे. त्याचा सुमारे १० हजार भाविकांनी लाभ घेतला.

देशभरात पवित्र १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे श्रावणातील पहिला सोमवार आणि नागपंचमीनिमित्त मोठी गर्दी आहे. प्रतिवर्षी आमदार लांडगे यांच्या पुढाकाराने श्रावणातील प्रत्येक सोमवारी प्रसाद वाटप आणि फराळ मोफत दिला जातो. राज्यातील कानाकोपऱ्यातून या ठिकाणी भाविक येत असतात.

भारतीय जनता पार्टी आमदार प्रवास योजना अंतर्गत आमदार महेश लांडगे सध्या मध्यप्रदेश दौऱ्यावर आहेत. त्यामुळे श्रावणातील पहिला सोमवार श्रीक्षेत्र भीमाशंकर या ठिकाणी उपस्थित राहिले नाही. मात्र, प्रतिवर्षीप्रमाणे मंदिर परिसरात लांडगे यांच्या पुढाकाराने मोफत फराळ वाटप सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. सोमवारी पहाटे ४ वाजलेपासूनच भाविकांना फराळ सेवा सुरू असून दिवसभरात हजारो भाविक याचा लाभ घेणार आहेत. मंदिर प्रशासनानेही या उपक्रमाबाबत समाधान व्यक्त केले आहे.

श्रीक्षेत्र भीमाशंकर या ठिकाणी मला कायम आत्मिक समाधान मिळते. त्यामुळे या पवित्र ठिकाणी मी कायम नतमस्तक होत असतो. पिंपरी-चिंचवडकरांसह तमाम मानवजातीला सुख-शांती लाभो, अशी प्रर्थना श्रावण सोमवारनिमित्त भगवान भीमाशंकर यांच्या चरणी करीत आहे. मोफत फराळ हा उपक्रम आम्ही प्रतिवर्षी राबवतो. राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक येतात. त्यांना चांगला आहार, प्रसाद मिळावा, अशी आमची भूमिका आहे.
- महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा.

गणेशोत्सव मंडपाच्या खड्ड्यांसाठी दर आकारणी रद्द करावी: अमित गोरखे
पिंपरी: सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून मंडप उभारणीसाठी खड्डे खोदताना दर आकारणी केली जाते. सार्वजनिक गणेश मंडळांकडून ही दर आकारणी करू नये. तसेच मनपा व पोलिस प्रशासनाने परवानगीची प्रक्रिया व नियमावली सुकर करावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे  पिंपरी निवडणूक प्रमुख अमित गोरखे यांनी निवेदनाव्दारे केली आहे.

अमित गोरखे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड शहरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना महापालिका आणि पोलिस प्रशासनाकडे विविध गोष्टींसाठी परवानगी घ्यावी लागते. यामध्ये मनपा प्रशासन खड्डे घेण्यासाठी परवानगीबरोबर दर आकारणी करते. हे दर आकारले जाऊ नयेत. उत्सवासाठी गणेश मंडळांना ही सवलत देण्यात द्यावी.

शहरातील गणेशोत्सव शांततेत, सुरक्षित, उत्साह आणि भक्तीमय वातावरणात साजरा व्हावा. या करिता पिंपरी चिंचवड मनपा आणि  पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयामार्फत एक खिडकी योजना राबविण्यात यावी. यासह नियमावली सुकर करून गणेश मंडळांना सहकार्य करावे.  या करिता मनपा प्रशासनाने वेळीच नियोजन करावे. गणेशोत्सव जवळ येत असल्यामुळे प्रशासनाने तातडीने यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, असे त्यांनी नमूद केले आहे.

खड्डेमुक्त मंडपासाठी गणेश मंडळांनी पुढाकार घ्यावा...

गणेश मंडळाकडून मंडप उभारणीसाठी रस्त्यात खड्डे केले जातात. त्या खड्ड्यांमुळे रस्त्यांची दुरावस्था होते. त्याकरिता पिंपरी चिंचवड मनपा प्रशासनाने शहरातील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना खड्डेमुक्त मंडप उभारणीसाठी आवाहन करावे. गणेश मंडळाच्या पदाधिका-यांनी देखील खड्डेमुक्त मंडप उभारणी करण्यास प्राधान्य द्यावे, असे आवाहन अमित गोरखे यांनी मंडळांना केले आहे.