Shankar Jagtap - News Express Marathi

आमदार शंकर जगताप यांची जिल्हा खनिज प्रतिष्ठान पुणेच्या नियामक परिषदेवर नियुक्ती
पिंपरी, ५ सप्टेंबर: चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप यांची जिल्हा खनिज प्रतिष्ठान (DMF), पुणेच्या नियामक परिषदेवर पदसिद्ध सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे अधिकृत पत्र जिल्हाधिकारी कार्यालयाच्या खनिकर्म शाखेने जारी केले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाने ५ ऑगस्ट २०२६ रोजी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार तसेच ११ ऑक्टोबर २०२४च्या अधिसूचनेतील तरतुदींनुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नियामक परिषदेवर खाणकामामुळे बाधित भाग आणि तेथील नागरिकांच्या विकासासाठी धोरण ठरविण्याची महत्त्वाची जबाबदारी असते. प्रतिष्ठानचा वार्षिक कृती आराखडा व अर्थसंकल्प मंजूर करणे, विकासकामांना मान्यता देणे, निधीचा योग्य आणि पारदर्शक वापर होत असल्याची खात्री करणे, कामांचा वेळोवेळी आढावा घेणे तसेच वार्षिक अहवाल आणि लेखापरीक्षित खात्यांना मंजुरी देणे, ही परिषदेची प्रमुख कामे आहेत.

जिल्हा खनिज अधिकारी तथा सदस्य सचिव आनंद पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने हे नियुक्तिपत्र जारी केले आहे.

“जिल्हा खनिज प्रतिष्ठान पुणेच्या नियामक परिषदेवर पदसिद्ध सदस्य म्हणून मिळालेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणार आहे. खनिजबाधित भागातील नागरिकांच्या मूलभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण आणि पर्यावरण संवर्धनासाठी उपलब्ध निधीचा योग्य व पारदर्शक वापर व्हावा, यासाठी प्राधान्याने प्रयत्न करेन.”

शंकर जगताप
आमदार, चिंचवड विधानसभा मतदारसंघ