कृष्णानगर - News Express Marathi

कृष्णानगर स्पाईन रस्त्याच्या सेवा रस्त्यावरील बेकायदेशीर अवजड
मोशी : कृष्णानगर येथील स्पाईन रस्तालगत असलेल्या सेवा रस्त्यावर दिवसेंदिवस अनधिकृतपणे उभ्या राहणाऱ्या अवजड वाहनांमुळे स्थानिक रहिवासी आणि वाहनचालक  त्रस्त झाले आहेत. मुख्य रस्त्याला जोडणाऱ्या या सर्विस रस्त्यावर ट्रक, कंटेनर, ट्रॅव्हल्स यांसारखी अवजड वाहने दोन्ही बाजूंना तासनतास नव्हे तर कित्येक दिवस बेकायदेशीरपणे उभी करून ठेवली जातात. त्यामुळे या रस्त्यावरून चालणे आणि वाहने चालवणे अत्यंत कठीण झाले असून परिसरात अपघातांची शक्यता मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.

​या रस्त्यावर सतत उभ्या असणाऱ्या अवजड वाहनांमुळे संपूर्ण रस्ता अडवला जातो, ज्यामुळे स्थानिक नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी कामानिमित्त बाहेरून घरी परतणाऱ्या महिला, तरुणी आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. अवजड वाहनांच्या आडोशाने रात्रीच्या अंधारात मद्यपी व समाजकंटकांचा वावर वाढण्याची भीती व्यक्त होत असून महिलांना सुरक्षितपणे ये-जा करणे जिकिरीचे झाले आहे. या समस्येमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही समस्येवर कायमस्वरूपी तोडगा न निघाल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

​"कृष्णा नगर स्पाईन रोड सर्विस रस्त्यावरील अवजड वाहनांची बेकायदेशीर पार्किंग ही गंभीर समस्या बनली आहे. स्थानिक रहिवाशांना आणि विशेषतः महिलांना रात्रीच्या वेळी या मार्गावरून जाणे असुरक्षित झाले आहे. या मार्गावरील सर्व बेकायदा वाहनांवर तात्काळ दंडात्मक कारवाई करून रस्ता पूर्णपणे मोकळा करण्यासाठी आम्ही वाहतूक पोलिसांकडे पाठपुरावा करत आहोत."

नगरसेवक निलेशदादा नेवाळे

​"नागरिकांची सुरक्षितता आणि सुविधा ही आमची प्राथमिकता आहे. सर्विस रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या वाहनांमुळे परिसरातील महिलांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. ही समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी प्रशासनाशी चर्चा करून योग्य त्या उपाययोजना राबवल्या जातील आणि नागरिकांना सुरक्षित वातावरण मिळवून दिले जाईल."
— नगरसेविका रिटा सानप

​"संबंधित सेवा रस्त्यावरील अनधिकृत अवजड वाहनांवर आमची कारवाई सुरू आहे. या भागात लवकरच अधिकृतपणे 'नो पार्किंग'चे फलक लावण्यात येणार आहेत. यानंतरही जर नियमांचे उल्लंघन करून कोणी वाहने पार्क केली, तर त्यांच्यावर आणखी कठोर दंडात्मक व कायदेशीर कारवाई करण्यात येईल."

— रामचंद्र घाडगे
(वाहतूक पोलीस विभाग, तळवडे)