सकारात्मक विचार - News Express Marathi

वैफल्यग्रस्तांच्या मनाला धीर देणारा पदपथावरील आधार
मोशी: आयुष्याच्या वाटेवर संकटांनी घेरलेली, नैराश्य आणि प्रचंड मानसिक तणावाखाली वावरणारी अनेक माणसं आधाराच्या शोधात असतात. अशा हताश मनांना योग्य दिशा दाखवून टोकाचे पाऊल उचलण्यापासून रोखण्याचे अनोखे कार्य मूळचे कर्नाटक येथील ज्योतिष अभ्यासक नटराज आमले मागील बारा वर्षांपासून सातत्याने करत आहेत. सध्या पूर्णानगर परिसरातील पदपथावर बसून लोकांचे समुपदेशन करणाऱ्या आमले यांचे कुठेही कायमस्वरूपी वास्तव्य नसते; मात्र जिथे जातील तिथे तणावग्रस्त आणि गोरगरीब लोकांच्या पाठीशी ते खंबीरपणे उभे राहतात.

ज्योतिषशास्त्राचा आधार घेऊन आमले केवळ भविष्य वर्तवत नाहीत, तर खचलेल्या मनांना उभारी देण्याचे महत्त्वाचे काम करतात. केवळ शास्त्र पाहिल्याने कोणाचेही नशीब किंवा भाग्य एका रात्रीत बदलत नाही; परंतु योग्य मार्गदर्शन आणि सकारात्मक विचारांमुळे व्यक्तीला मानसिक समाधान मिळते आणि कठीण काळात स्वतःला सावरण्याची ताकद मिळते, असा त्यांचा ठाम विश्वास आहे. आयुष्यात आलेल्या अपयशाने खचून जाऊन कोणीही चुकीचा निर्णय किंवा टोकाचे पाऊल उचलू नये, यासाठी ते लोकांना विश्वासात घेऊन धीर देतात.

बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगावर भाष्य करताना त्यांनी सांगितले की, पूर्वी लग्नकार्य, वास्तूपूजा अथवा कोणताही शुभ विधी करताना पंचांग आणि अचूक मुहूर्ताचा सखोल अभ्यास केला जात असे. आजच्या मोबाईलच्या जमान्यात राहू काळ किंवा इतर गोष्टी केवळ स्क्रीनवर पाहून लोक निर्णय घेतात. मात्र, शास्त्र आणि कुंडलीचे विश्लेषण हे अत्यंत सूक्ष्म अभ्यासाचा विषय असून ते संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांकडूनच समजून घेणे गरजेचे आहे. भौतिक सुखाच्या मागे धावताना निर्माण होणाऱ्या मानसिक कोंडीवर मात करण्यासाठी नटराज आमले पदपथावर राहूनही अनेकांच्या आयुष्याला आशेचा किरण दाखवत आहेत.