गुरुवर्य अकॅडमी स्कूल - News Express Marathi

गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चिखली- ​गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन अत्यंत उत्साह, अभिमान आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. या प्रसंगी विद्यार्थी, शिक्षक, पालक तसेच मान्यवर अतिथींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचे आणि बलिदानाचे भावपूर्ण स्मरण केले. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करून झाली. त्यानंतर ‘वंदे मातरम्’, राष्ट्रगीत, ध्वजगीत आणि राज्यगीताच्या सुमधुर सादरीकरणाने संपूर्ण परिसर देशभक्तीच्या भावनेने भारावून गेला. या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून सुभेदार दत्तात्रय गायकवाड, पोलीस हवालदार आनंद झुंगारे आणि अग्निशमन दलाचे अधिकारी किरण वाघमारे (COD) यांची विशेष उपस्थिती लाभली. तसेच शाळेचे संचालक भूषण मावळे सहसंस्थापक व सचिव अनिल बेलकेरी , कोषाध्यक्ष प्रसाद शेट्टी, मुख्याध्यापिका  ज्योत्स्ना मावळे, ज्योती बेलकेरी, शुभा शेट्टी यांच्यासह सर्व विश्वस्त आवर्जून उपस्थित होते.

​ध्वजारोहणानंतर शाळेच्या प्रांगणात विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. स्वातंत्र्यसैनिकांचा संघर्ष, शौर्य आणि त्याग प्रभावीपणे मांडणाऱ्या देशभक्तीपर नाट्यछटा, सुमधुर राष्ट्रभक्तीपर गीते आणि अंगावर शहारे आणणाऱ्या जोशपूर्ण मर्दानी खेळांच्या प्रात्यक्षिकांनी उपस्थितांची मने जिंकून घेतली. यानंतर विद्यार्थी आणि शिक्षकांनी स्वातंत्र्य, लोकशाहीची मूल्ये व नागरिकांची कर्तव्ये यावर आपली मनोगते व्यक्त केली. यावेळी विद्यार्थ्यांनी एकता, शिस्त, प्रामाणिकपणा, समानता आणि सक्षम राष्ट्र घडविण्याची प्रतिज्ञा घेत विशेष शपथविधी पूर्ण केला. उपस्थित पाहुण्यांनी विद्यार्थ्यांच्या शिस्त, आत्मविश्वास आणि सादरीकरणाचे भरभरून कौतुक करत त्यांना देशसेवेसाठी प्रेरित केले.

​हा सोहळा यशस्वी करण्यासाठी शाळेचे संचालक श्री. भूषण मावळे आणि मुख्याध्यापिका श्रीमती ज्योत्स्ना मावळे यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभले. तसेच समन्वयक  प्रतिभा पाटील,  मोहना पंगनूरवार यांच्यासह नृत्य शिक्षिका  प्रीती, संगीत शिक्षिका  वर्षा आहेरकर, कला शिक्षिका सारिका चव्हाण, कांचन शिंदे आणि क्रीडा शिक्षिक मनीषा खेडकर, प्रफुल्ल प्रधान, सागर चव्हाण यांनी विद्यार्थ्यांच्या पूर्वतयारीसाठी विशेष परिश्रम घेतले.

पालक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सक्रिय सहभागाने आणि समर्पित प्रयत्नांमुळे हा ८० वा स्वातंत्र्यदिन सोहळा अत्यंत देखणा, प्रेरणादायी आणि संस्मरणीय ठरला.