80 वा स्वातंत्र्यदिन - News Express Marathi

भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
भोसरी: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या  विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालय, भोसरी येथे देशाचा ८० वा स्वातंत्र्यदिन अत्यंत उत्साहात आणि सन्मानपूर्वक वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी आयोजित ध्वजारोहण समारंभास उपस्थित राहून राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. राष्ट्रगीत आणि राज्यगीताच्या जयघोषात ध्वजारोहण संपन्न झाल्यानंतर एमएसएफ (MSF) जवानांनी सादर केलेले शिस्तबद्ध संचलन उपस्थितांचे लक्ष वेधून घेणारे ठरले.

याप्रसंगी क क्षेत्रीय अध्यक्ष निखिल बोऱ्हाडे यांनी उपस्थित अधिकारी, कर्मचारी व नागरिकांशी संवाद साधताना देशाच्या प्रगतीसाठी स्वातंत्र्य मूल्यांची जपणूक आणि मूलभूत कर्तव्यांच्या पालनावर विशेष भर देण्यात आला. देशाला स्वातंत्र्य मिळून ८० वर्षे पूर्ण झाली असली, तरी दैनंदिन जीवनातील मूलभूत नागरी कर्तव्ये पार पाडणे हीच खरी देशसेवा असल्याचे या वेळी नमूद करण्यात आले. वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन करणे, रस्त्यावर कुठेही कचरा न टाकता त्याचे योग्य वर्गीकरण करून तो कचरा गाडीतच देणे, अशा छोट्या-छोट्या नियमांचे नागरिकांनी पालन केले पाहिजे, असे  आवाहन यावेळी त्यांनी आले.

तसेच, प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता आणि सुलभता आणण्यासाठी अधिकारी व नागरिकांमधील संवाद महत्त्वाचा असून, सर्व अधिकाऱ्यांनी नागरिकांचे प्रश्न समजून घेऊन त्यांची कामे मोकळ्या मनाने व योग्य रीतीने वेळेत पूर्ण करावीत, असेही त्यांनी सांगितले. राष्ट्राच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सर्वांनी एकजुटीने योगदान देण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. या कार्यक्रमाला परिसरातील नागरिक, पालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चिखली- ​गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन अत्यंत उत्साह, अभिमान आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. या प्रसंगी विद्यार्थी, शिक्षक, पालक तसेच मान्यवर अतिथींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचे आणि बलिदानाचे भावपूर्ण स्मरण केले. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करून झाली. त्यानंतर ‘वंदे मातरम्’, राष्ट्रगीत, ध्वजगीत आणि राज्यगीताच्या सुमधुर सादरीकरणाने संपूर्ण परिसर देशभक्तीच्या भावनेने भारावून गेला. या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून सुभेदार दत्तात्रय गायकवाड, पोलीस हवालदार आनंद झुंगारे आणि अग्निशमन दलाचे अधिकारी किरण वाघमारे (COD) यांची विशेष उपस्थिती लाभली. तसेच शाळेचे संचालक भूषण मावळे सहसंस्थापक व सचिव अनिल बेलकेरी , कोषाध्यक्ष प्रसाद शेट्टी, मुख्याध्यापिका  ज्योत्स्ना मावळे, ज्योती बेलकेरी, शुभा शेट्टी यांच्यासह सर्व विश्वस्त आवर्जून उपस्थित होते.

​ध्वजारोहणानंतर शाळेच्या प्रांगणात विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. स्वातंत्र्यसैनिकांचा संघर्ष, शौर्य आणि त्याग प्रभावीपणे मांडणाऱ्या देशभक्तीपर नाट्यछटा, सुमधुर राष्ट्रभक्तीपर गीते आणि अंगावर शहारे आणणाऱ्या जोशपूर्ण मर्दानी खेळांच्या प्रात्यक्षिकांनी उपस्थितांची मने जिंकून घेतली. यानंतर विद्यार्थी आणि शिक्षकांनी स्वातंत्र्य, लोकशाहीची मूल्ये व नागरिकांची कर्तव्ये यावर आपली मनोगते व्यक्त केली. यावेळी विद्यार्थ्यांनी एकता, शिस्त, प्रामाणिकपणा, समानता आणि सक्षम राष्ट्र घडविण्याची प्रतिज्ञा घेत विशेष शपथविधी पूर्ण केला. उपस्थित पाहुण्यांनी विद्यार्थ्यांच्या शिस्त, आत्मविश्वास आणि सादरीकरणाचे भरभरून कौतुक करत त्यांना देशसेवेसाठी प्रेरित केले.

​हा सोहळा यशस्वी करण्यासाठी शाळेचे संचालक श्री. भूषण मावळे आणि मुख्याध्यापिका श्रीमती ज्योत्स्ना मावळे यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभले. तसेच समन्वयक  प्रतिभा पाटील,  मोहना पंगनूरवार यांच्यासह नृत्य शिक्षिका  प्रीती, संगीत शिक्षिका  वर्षा आहेरकर, कला शिक्षिका सारिका चव्हाण, कांचन शिंदे आणि क्रीडा शिक्षिक मनीषा खेडकर, प्रफुल्ल प्रधान, सागर चव्हाण यांनी विद्यार्थ्यांच्या पूर्वतयारीसाठी विशेष परिश्रम घेतले.

पालक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सक्रिय सहभागाने आणि समर्पित प्रयत्नांमुळे हा ८० वा स्वातंत्र्यदिन सोहळा अत्यंत देखणा, प्रेरणादायी आणि संस्मरणीय ठरला.

एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;
​भोसरी-  विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण  विकासासाठी कायमच नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणाऱ्या नामांकित एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये  भारताचा ८० वा स्वातंत्र्य दिन अत्यंत दिमाखदार, शिस्तबद्ध आणि देशभक्तीमय वातावरणात  उत्साहात साजरा करण्यात आला. या  कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक मा. श्री. सागर बाळासाहेब गवळी उपस्थित होते, तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. श्री. पांडुरंग नाना गवळी व मा. सौ. सुनीतामाई पांडुरंग नाना गवळी यांनी भूषविले. मा. स्वप्नील पांडुरंग गवळी, मा. सौ. कोमल स्वप्नील गवळी आणि मा. संकल्प पांडुरंग गवळी यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली या संपूर्ण सोहळ्याचे नेटके नियोजन करण्यात आले होते.

​कार्यक्रमाच्या सुरुवातीला ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. यामध्ये इयत्ता ५ वी आणि ७ वीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेली देशभक्तीपर नृत्ये आणि श्री. विकी सर व श्री. सोहम सर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी सादर केलेली शिस्तबद्ध परेड यांनी उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांना नृत्यासाठी सौ. रुपाली ससाणे, श्री. विकी सर, प्रेमलता मॅडम आणि भावना मॅडम यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. याप्रसंगी कॉलेजच्या प्राचार्या सौ. वैशाली यादव यांनी विद्यार्थ्यांना देशसेवेची प्रेरणा देणारे विचार मांडले.

​या सोहळ्याचे औचित्य साधून शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये इयत्ता १० वी आणि १२ वीच्या परीक्षेत ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह देऊन विशेष सन्मान करण्यात आला. त्याचप्रमाणे १० वीच्या उत्कृष्ट निकालासाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या शिक्षकांनाही सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. एकता जाधव मॅडम आणि निशा वाघमारे मॅडम यांनी केलेल्या आकर्षक सजावटीने संपूर्ण परिसर देशभक्तीच्या रंगात न्हाऊन निघाला होता.

​कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी स्कूलचे प्राचार्य डॉ. प्रवीण गायकवाड, सौ. सुप्रिया मुळे, सौ. तैसीन मुलाणी, रेहान सर, डॉ. जयश्री सुरवसे यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. संपूर्ण कार्यक्रमाचे प्रभावी व ओघवत्या शैलीतील सूत्रसंचालन सौ. मनीषा चव्हाण आणि सौ. अश्विनी मांजरेकर यांनी केले. शिस्त, संस्कृती आणि उत्साहाचा अनोखा संगम असलेला हा स्वातंत्र्य दिन सोहळा उपस्थितांसाठी अविस्मरणीय ठरला.