पुणे नाशिक - News Express Marathi

‘नाशिक फाटा–खेड एलिव्हेटेड कॉरिडॉर’साठी भूसंपादन ‘मार्किंग’ सुरू!
भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला प्रशासनाचे बळ

पिंपरी- चिंचवड । प्रतिनिधी |

पिंपरी-चिंचवडसह चाकण आणि खेडच्या औद्योगिक पट्ट्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या नाशिक फाटा–खेड एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीला आता गती मिळाली आहे. या प्रकल्पासाठी नगरविकास विभागाकडून आज मार्गाचे मार्किंग सुरू झाले असून, भूसंपादन प्रक्रियेलाही वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर प्रकल्पासाठी सातत्याने पाठपुरावा भाजपाचे आमदार महेश लांडगे यांच्या प्रयत्नांना बळ मिळाले आहे.

नाशिक फाटा–खेड एलिव्हेटेड कॉरिडॉर हा केवळ वाहतूक कोंडी सोडविणारा प्रकल्प नसून पुणे–पिंपरी-चिंचवड–चाकण–खेड या संपूर्ण औद्योगिक पट्ट्याच्या विकासाला गती देणारी महत्त्वाची पायाभूत सुविधा आहे. या मार्गामुळे नाशिक फाटा, भोसरी, मोशी, चाकण आणि खेड परिसरातील वाढत्या वाहतुकीचा ताण कमी करण्यास मदत होणार आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला मंजुरी दिल्यानंतर त्याची अंमलबजावणी वेगाने व्हावी, यासाठी आमदार महेश लांडगे यांनी सातत्याने पाठपुरावा केला. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली प्रकल्पाचे भूसंपादन पूर्ण करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात व्हावी, यासाठी संबंधित यंत्रणांशी समन्वय साधत प्रकल्पाला गती देण्याची भूमिका त्यांनी घेतली. तसेच, विधानसभा अधिवेशनातही हा मुद्दा सातत्त्याने लावून धरला आहे.

आता नगरविकास विभागाकडून मार्गाचे मार्किंग सुरू झाल्याने आणि भूसंपादन प्रक्रियेला वेग मिळाल्याने लांडगे यांच्या पाठपुराव्याला प्रत्यक्ष प्रशासकीय गती मिळाल्याचे चित्र आहे. चाकण औद्योगिक पट्ट्यात ऑटोमोबाईल, इंजिनिअरिंग, उत्पादन आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रातील मोठ्या उद्योगांची संख्या आहे. मात्र, वाढती वाहतूक कोंडी आणि अपुरी रस्ते क्षमता यामुळे उद्योगांच्या वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम होत आहे.  एलिव्हेटेड कॉरिडॉरमुळे लांब पल्ल्याची वाहतूक अधिक वेगाने पुढे जाण्यास मदत होणार असून, उद्योगांसाठी वेळ, इंधन आणि लॉजिस्टिक्स खर्चात बचत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे चाकणच्या औद्योगिक विकासासाठी हा प्रकल्प ‘गेमचेंजर’ ठरणार असल्याचे लांडगे यांनी अधोरेखित केले आहे.

पुणे–नाशिक आर्थिक कॉरिडॉरला नवी ताकद

नाशिक फाटा–खेड मार्गामुळे केवळ पिंपरी-चिंचवडची वाहतूक कोंडी कमी होणार नाही, तर पुणे–नाशिक आर्थिक पट्ट्याची वाहतूक क्षमता वाढणार आहे. नवीन उद्योग, लॉजिस्टिक्स पार्क, वेअरहाऊसिंग आणि रोजगारनिर्मितीसाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा आहे. “हा केवळ फ्लायओव्हर नाही, तर पिंपरी-चिंचवडपासून चाकण-खेडपर्यंतच्या औद्योगिक विकासाचा वाहतूक-कणा आहे. मार्किंग सुरू होणे आणि भूसंपादनाला गती मिळणे हे प्रकल्पाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल आहे. पुढील टप्प्यात भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्ष बांधकामाला गती मिळावी, यासाठीही आपला पाठपुरावा सुरूच राहणार असल्याचे आमदार महेश लांडगे यांनी स्पष्ट केले.

“नाशिक फाटा–खेड एलिव्हेटेड कॉरिडॉर हा केवळ वाहतूक कोंडी सोडविणारा प्रकल्प नाही, तर पिंपरी-चिंचवड, चाकण आणि खेडच्या औद्योगिक विकासाला नवी गती देणारा महत्त्वाचा वाहतूक-कणा आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या प्रकल्पाला मंजुरी दिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली प्रकल्पाचे भूसंपादन आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात व्हावी, यासाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा करत आहोत. आज नगरविकास विभागाकडून मार्किंग सुरू झाले असून भूसंपादन प्रक्रियेलाही गती मिळाली आहे. हा प्रकल्प लवकरात लवकर प्रत्यक्षात यावा आणि पुणे महानगर प्रदेशाच्या विकासाला नवी दिशा मिळावी, यासाठी आमचा पाठपुरावा यापुढेही कायम राहील.”
- महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.