Pimpri Chinchwad news - News Express Marathi

चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होली: अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेज, चऱ्होली येथे देशाचा ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला  लेफ्टनंट कर्नल अमोल धुमाळ, माजी महापौर नितीन काळजे, नगरसेवक सचिन तापकीर, माजी नगरसेविका विनया तापकीर, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक अतुल काळजे, माजी संचालक प्रवीण काळजे, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश काळजे, संतोष पठारे, गणेश तापकीर, सोमनाथ घारे, सतीश पठारे आणि भाऊसाहेब रासकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

‘वंदे मातरम्’च्या जयघोषाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. ध्वजारोहण व राष्ट्रगीत झाले. यावेळी विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध संचलन करत  ध्वजास मानवंदना दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, नृत्य आणि नाट्यप्रयोग सादर केले. विद्यार्थ्यांच्या कराटे प्रात्यक्षिकांनी, कॅलिस्थेनिक व्यायाम प्रकारांनी तसेच लाठी-काठीच्या सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास, शारीरिक कौशल्य आणि शिस्त यांचे दर्शन या सादरीकरणातून घडले. या प्रसंगी विद्यार्थ्यांना ट्रॅकसूटचे वितरणही करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे संस्थापक संतोष काळजे, दत्तात्रय वाळके, गणेश ठोकळ, राहुल टोणगे, मुख्याध्यापिका डॉ. मानसी गिल पंडित, उपमुख्याध्यापिका लीना तुगडे, विभागप्रमुख नीलम टोणगे आणि बालवाटिका विभागप्रमुख कोमल कदम उपस्थित होते.

लेफ्टनंट कर्नल अमोल धुमाळ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना देशप्रेम, शिस्त, कर्तव्यभावना आणि राष्ट्राच्या प्रगतीतील योगदानाचे महत्त्व स्पष्ट केले. मुख्याध्यापिका डॉ. मानसी गिल पंडित यांनी स्वातंत्र्याचे महत्त्व अधोरेखित करत शिक्षणासोबतच संस्कार, शिस्त आणि जबाबदार नागरिकत्वाचे मूल्य आत्मसात करण्याचे आवाहन केले. यानंतर शिक्षकांचे मनोगत व विश्वस्तांचे मार्गदर्शन झाले. मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यंदा महापालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार!
पिंपरी, 14 ऑगस्ट  (प्रतिनिधी) : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना यंदा वाढीव सानुग्रह अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांना दरवर्षी देण्यात येणारा ८.३३ टक्के प्रथा बोनस आणि २५ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान यामध्ये वाढ करून आता ३० हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याच्या प्रस्तावाला स्थायी समितीने उपसूचनेसह मंजुरी दिली आहे.

सन २०२५-२६ ते २०२९-३० या पाच वर्षांसाठी बोनस व सानुग्रह अनुदान देण्याचा करारनामा करण्यास तसेच त्यासाठी होणाऱ्या खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली आहे. उपसूचनेसह हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी सर्वसाधारण सभेकडे पाठविण्यात आला आहे.

महापालिका आस्थापनेवरील सर्व अधिकारी व कर्मचारी, शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचारी, वैद्यकीय विभागातील अधिकारी व कर्मचारी तसेच निवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही नियमानुसार प्रथा बोनस व सानुग्रह अनुदानाचा लाभ दिला जातो. त्यानुसार ८.३३ टक्के प्रथा बोनसासोबत पूर्वी २५ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याची तरतूद होती. मात्र, स्थायी समितीने उपसूचना मंजूर करून ही रक्कम २५ हजारांवरून ३० हजार रुपये करण्यास मान्यता दिली आहे.

या निर्णयामुळे महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार असून, त्यांच्या कुटुंबीयांचीही यंदाची दिवाळी अधिक आनंदात साजरी होणार आहे. अंतिम मंजुरीनंतर वाढीव सानुग्रह अनुदानाचा लाभ कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.

पिंपरी-चिंचवड चाकण हाऊसिंग सोसायटी संघटनेच्या पाठपुराव्याला यश
पिंपरी-चिंचवड | पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने मोठ्या गृहनिर्माण सोसायट्यांकडून ओला कचरा उचलण्यास नकार देणाऱ्या निर्णयाला अखेर मवाळ भूमिका घेत, ओला कचरा पूर्ववत उचलण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामागे पिंपरी-चिंचवड चाकण हाऊसिंग सोसायटी संघटनेने केलेला सातत्यपूर्ण पाठपुरावा, प्रशासनाशी झालेल्या बैठका, विविध अधिकाऱ्यांना दिलेली निवेदने आणि आंदोलनाचा दिलेला इशारा महत्त्वाचा ठरल्याची भावना संघटनेने व्यक्त केली आहे.

संघटनेने या विषयावर महापालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, आरोग्य विभाग तसेच संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन सोसायट्यांच्या अडचणी सविस्तर मांडल्या होत्या. शहरातील अनेक सोसायट्यांकडे कंपोस्टिंग प्रकल्पासाठी आवश्यक जागा नसल्याने हा निर्णय व्यवहार्य नसल्याचे संघटनेने ठामपणे मांडले होते. तसेच गरज पडल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचाही इशारा देण्यात आला होता.

या सर्व प्रयत्नांनंतर महापालिका प्रशासनाने निर्णयात बदल करून सोसायट्यांचा ओला कचरा पूर्ववत उचलण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे संघटनेने स्वागत केले असून, प्रशासनाने नागरिकांच्या भावना आणि अडचणींचा सकारात्मक विचार केल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

“हा केवळ आमच्यासंघटनेचा विजय नसून पिंपरी-चिंचवडमधील हजारो हाऊसिंग सोसायट्या आणि लाखो नागरिकांच्या एकजुटीचा विजय आहे. आम्ही सुरुवातीपासूनच पर्यावरण संवर्धनाला विरोध केला नाही; मात्र व्यवहार्य अंमलबजावणीची मागणी केली. प्रशासनाने आमचे म्हणणे ऐकून सकारात्मक निर्णय घेतल्याबद्दल आम्ही त्यांचे स्वागत करतो. भविष्यातही नागरिकांच्या हितासाठी संघटना अशाच पद्धतीने ठामपणे आवाज उठवत राहील.”
- सत्यब्रत त्रिपाठी, अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड चाकण हाऊसिंग सोसायटी

पिंपरी-चिंचवडमध्ये उन्नती सोशल फाऊंडेशन तर्फे १००० वृक्षांचे वाटप
पिंपरी :   चिंचवड विधानसभेचे कार्यसम्राट आमदार शंकर जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त उन्नती सोशल फाउंडेशनच्या वतीने पर्यावरणपूरक असा अभिनव व समाजाभिमुख उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत पिंपळे सौदागर परिसरात नागरिकांना १००० वृक्षांचे मोफत वाटप करण्यात आले.

वाढदिवसाचे औचित्य साधत समाजासाठी काहीतरी सकारात्मक व शाश्वत योगदान देण्याच्या उद्देशाने आयोजित या उपक्रमातून “एक व्यक्ती – एक वृक्ष” ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्यात आली. वाढत्या

PCMC

नागरीकरणामुळे कमी होत चाललेले हरित क्षेत्र लक्षात घेता पर्यावरण संवर्धनाची गरज अधोरेखित करण्यात आली. प्रत्येक नागरिकाने किमान एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करावे, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

या उपक्रमाबाबत प्रतिक्रिया देताना उन्नती सोशल फाउंडेशनचे संस्थापक संजय भिसे म्हणाले की, “आमदार शंकर भाऊ जगताप हे केवळ लोकप्रतिनिधी नसून जनतेच्या प्रत्येक प्रश्नासाठी सातत्याने झटणारे कार्यसम्राट आहेत. त्यांच्या कार्यपद्धतीत समाजहिताला नेहमीच प्राधान्य असते. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही वृक्ष वाटपासारखा उपक्रम राबवून त्यांच्या कार्याला साजेसा आणि समाजासाठी उपयुक्त संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. आज लावलेला प्रत्येक वृक्ष हा भविष्यातील पर्यावरणाचा मजबूत पाया ठरेल.”

तसेच उन्नती सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा तथा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नगरसेविका डॉ. कुंदा संजय भिसे यांनी आपल्या प्रतिक्रियेत सांगितले की, “आमदार शंकर जगताप यांची काम करण्याची धडाडी, जनसंपर्क आणि विकासाभिमुख दृष्टी ही खरोखर प्रेरणादायी आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली चिंचवड विधानसभा मतदारसंघात विविध विकासकामांना गती मिळाली आहे. त्यांच्याच प्रेरणेतून आम्ही हा पर्यावरणपूरक उपक्रम राबविला. शहराचा विकास करताना पर्यावरणाचे संतुलन राखणे ही काळाची गरज आहे, आणि अशा उपक्रमांमधून नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण होणे अत्यंत महत्त्वाचे आहे.”

या उपक्रमाद्वारे आमदार शंकर जगताप यांना ‘निसर्ग आरोग्यदायी शुभेच्छा’ देत पर्यावरण संवर्धनाचा संदेश व्यापक स्वरूपात समाजात पोहोचविण्यात आला. सदर उपक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, पर्यावरण रक्षणाच्या दिशेने उचललेले हे पाऊल समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे.

याप्रसंगी उन्नती सोशल फाऊंडेशनचे संस्थापक संजय भिसे, उन्नती फाउंडेशन सभासद, ऑल सिनियर सिटीझन असोसिएशन, लिनियर गार्डन जेष्ठ नागरिक संघ, आनंद हास्य क्लब, विठाई वाचनालय, यांच्यासह पिंपळे सौदागर , रहाटणी मधील विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, ज्येष्ठ नागरिक व मोठ्या संख्येने उपस्थित होते.