Devendra Fadnavis - News Express Marathi

‘रेड झोनमुक्त पिंपरी-चिंचवड’साठी पाठपुरावा करणार!
आमदार महेश लांडगे यांच्या आग्रही मागणीला प्रतिसाद

पिंपरी । पिंपरी-चिंचवडमधील ‘रेड झोन’चा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. अनेकदा बैठक झाली. तत्कालीन संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनीही सकारात्मक भूमिका घेतली होती. पण, हा प्रश्न सोडवण्यासाठी पुन्हा प्रयत्न करणे गरजेचे आहे. देशात नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील आणि शिरुरमधून शिवाजीराव आढळराव पाटील हे खासदार होतील. त्यामुळे  ‘रेड झोनमुक्त पिंपरी-चिंचवड’ करण्यासाठी आम्ही पुन्हा संरक्षण विभाग आणि प्रधानमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार आहोत आणि हा प्रश्न सोडवणार आहोत, असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

शिरुर लोकसभा मतदार संघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारानिमित्त भोसरी येथील गावजत्रा मैदानावर जाहीर सभा आयोजित करण्यात आली. यावेळी फडणवीस बोलत होते.

आमदार महेश लांडगे यांनी आपल्या भाषणात ‘रेड झोन’ बाबत उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे लक्ष वेधले. फडणवीस यांच्या सहकार्यामुळे शहरातील शास्तीकर, उपयोगकर्ता शुक्ल, कचरा प्रक्रिया प्रकल्प, स्वतंत्र पोलीस आयुक्तालय, समाविष्ट गावांचा विकास, आंद्रा, भामा आसखेड पाणी प्रकल्प आदी ‘भोसरी व्हीजन-२०२०’मधील सर्व महत्वपूर्ण विषय मार्गी लागले. मोदी सरकार धाडसी निर्णय घेण्यासाठी ओळखले जाते. हा प्रश्न तुम्हीच सोडवू शकता त्यामुळे पिंपरी-चिंचवडकरांची ‘रेड झोन’ची मुक्तता करावी, असे आवाहन आमदार लांडगे यांनी केले.

दरम्यान, २०१४ मध्ये राज्यात भाजपा प्रणित सरकार स्थापन झाल्यापासून भोसरीतील ऐतिहासिक गावजत्रा मैदानावर देवेंद्र फडणवीस यांनी ज्या-ज्या वेळी जाहीर सभा केल्या. आमदार लांडगे यांनी पिंपरी-चिंचवडकरांचे प्रश्न आणि मागण्या त्यांच्यासमोर ठेवल्या. त्या  सभांमध्ये दिलेल्या सर्व आश्वासनांची त्यांनी पूर्तता केलेली आहे. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा याच मैदानावर फडणवीस यांनी ‘रेडझोन’बाबत पिंपरी-चिंचवडकरांना आश्वासित केले आहे. त्यामुळे रेडझोनमधील मिळकतधारक, उद्योजक आणि सर्वसामान्य नागरिक अशा २ लाख पिंपरी-चिंचवडकरांच्या आशा आता पल्लवीत झाल्या आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरातील सुमारे २ लाख मिळकतधारक, लघु व मध्यम उद्योजक यांना दिलासा देण्यासाठी ‘रेड झोन’ हद्द कमी करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आमदार महेश लांडगे यांनी ‘रेड झोन मुक्त पिंपरी-चिंचवड’ची मागणी केली. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेण्याचे आश्वासन दिले आहे.  ‘रेड झोन’चा तिढा सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. त्यासाठी संरक्षण विभाग आणि मोदी सरकार निश्चितपणे सकारात्मक भूमिका घेणार आहे.

- शिवाजीराव आढळव पाटील.

भोसरीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘विजयी संकल्प’ सभा
पिंपरी । शिरुर लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारासाठी भोसरीत उद्या (दि.१० मे) भोसरी येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची  ‘विजयी संकल्प’ सभा होणार आहे. त्यानिमित्ताने महायुतीकडून शक्तीप्रदर्शन करण्याची तयारी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही तोफ धडाडणार आहे.

भोसरी विधानसभेतील भाजपाचे आमदार आणि शिरुर लोकसभा मतदार संघाचे भाजपा निवडणूक प्रमुख आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने शिरुर लोकसभा मतदार संघात भारतीय जनता पार्टी- शिवसेना- राष्ट्रवादी- आरपीआय- रासप व मित्र पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारसाठी जाहीर सभा आयोजित केली आहे.

भोसरी येथील गावजत्रा मैदानावर शुक्रवारी, दि. १० मे रोजी सायंकाळी ६ वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत विजयी संकल्प सभा होणार आहे. या सभेला महायुतीचे सर्व घटकपक्ष, स्थानिक नेते, पदाधिकारी आणि माजी नगरसेवक उपस्थित राहणार आहेत. ही सभा रेकॉर्ड ब्रेक करण्यासाठी महायुतीकडून कंबर कसली आहे.

आमदार लांडगे म्हणाले की, २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भोसरी विधानसभा मतदार संघातून शिवाजीराव आढळराव पाटील यांना ३७ हजाराहून अधिक मताधिक्य मिळाले होते. यावेळी आम्ही महायुतीची वज्रमूठ तयार केली असून, भोसरीतून १ लाख मतांचे लीड देण्याचा संकल्प केला आहे. शिरुरमधील विजयाची सुरूवात भोसरीतून होईल, असा विश्वास आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी शिरुर लोकसभा मतदार संघातून महायुतीचा खासदार निवडून देण्याचा संकल्प आहे. भोसरी मतदार संघ हा या निवडणुकीत निर्णायक राहणार असून, मतांची आघाडी घेण्याकरिता जनसंवाद बैठकांच्या माध्यमातून आम्ही तळागाळातील सर्व घटकांसोबत संवाद केला आहे. मोदी सरकारचे विकासाचे व्हीजन आणि कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी याबाबत जनजागृती केली आहे. कार्यकर्त्यांचा उत्साह आणि मतदार संघातील सकारात्मक वातावरण पाहता महायुतीची ‘विजयी संकल्प’सभा यशस्वी होईल, यात शंका नाही.

- महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, निवडणूक प्रमुख, शिरुर लोकसभा, भाजपा.

“तुमचे ड्रिम प्रोजेक्ट पुर्ण करायचे असतील तर..,’आढळरावांचं मतदारांना आवाहन
शिरूर : शिरूर मतदारसंघातील पुणे-नाशिक रेल्वेचा प्रश्न तसेच वाहतुकीचा आणि पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी हजारो कोटींचा निधी लागणार आहे यासाठी केंद्रातल्या सत्तेत बसणारा खासदार म्हणून तुम्ही मला निवडून दिले तर हे प्रश्न सुटतील, विकासकामे मार्गी लागतील, समोरच्या उमेदवाराचा पराभव दिसू लागल्याने माझ्यावर खालच्या स्तरावर टीका करुन माझी बदनामी केली जात आहे. मात्र याला जनता मतदानाच्या माध्यमातून उत्तर देईल असा पलटवार महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव यांनी केला.

पाच कंदील चौक येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विराट सभा झाली यावेळी आढळराव पाटील बोलत होते. यावेळी महायुतीचे नेते, पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना आढळराव पाटील म्हणाले,”ही निवडणूक देशाच्या प्रतिष्ठेची आहे. या निवडणूकीत आपण आपल्या देशाचे पंतप्रधान ठरवणार आहोत. येथे खरी लढत   विकासपुरुष नरेंद्र मोदी  आणि राहुल गांधी यांच्यात आहेत.परंतू कुठल्याही व्यक्तीला विचारले तर पंतप्रधान पदासाठी मोदीजीच हवेत असे नागरिक सांगतात. राम मंदिरासारखा आपल्या अस्मितेचा प्रश्न फक्त मोदीजीच सोडवू शकले. 370 सारखे कलम फक्त मोदीजी यांनीच काश्मीरमधून हटविले. मागील 10 वर्षांत अनेक विकासकामे देशात झाली आहेत.

गेल्या निवडणूकीत मी पराभूत होऊनही मी पायाला भिंगरी लावून फिरलो, मोठा निधी मतदार संघात आणला आहे. मी 20 वर्षांत अनेक प्रकल्प मतदार संघात आणून मतदारसंघाचा कायापालट केला आहे.   2014-15 च्या दरम्यान आम्ही धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक वढू आणि तुळापूर येथे करण्याचा 140 कोटींचा विकास आराखडा सादर केला. 400 कोटींचा विकास आराखडा मंजूर करुन घेतला. आता त्याचे कामही सुरु झाले आहे. माझे व तुमचे ड्रिम प्रोजेक्ट पुर्ण करायचे असतील तर आपल्याला सत्तेमधील खासदार निवडून द्यावा लागेल. समोरचा विद्यमान खासदार याने पाच वर्षांत कुठलेही काम केले नाही. हक्काचा निधी या निष्क्रिय खासदारामुळे परत गेला आहे. सध्या माझ्यावर खोटारडे आरोप केले जात आहेत. हे षडयंत्र एखादा बहुरुपीच करु शकतो. पण यावेळी जनता यांना भुलणार नाही. लोकं मला आत्मियतेने सांगतात गेल्या वेळी आमची चूक झाली आता ती आम्ही दुरुस्त करु. असेही आढळराव पाटील यांनी सांगितले

या निवडणुकीनंतर शिरूरच्या चार गावांचा पाणीप्रश्न, जुन्नरच्या आणे पठाराचा पाणीप्रश्न आणि आंबेगावच्या सातगाव पठारचा पाणीप्रश्न मार्गी लावण्यास प्राधान्यक्रम  असल्याचेही आढळराव पाटील यांनी सांगितले. येणाऱ्या 13 तारखेला आपण जागृत राहून मला घड्याळाला जास्तीत-जास्त मतदान करावे अशी विनंती पाटील यांनी केली.

Shirur Lok Sabha Election : शिरुर लोकसभा मतदार संघात भाजपाचा ‘‘मास्टर ट्रोक’’
ओझर देवस्थानचे अध्यक्ष गणेश कवडे यांचा भाजपा प्रवेश

पुणे । शिरुर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने ‘‘मास्टर स्ट्रोक’’ मारला असून, मतदार संघातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र ओझर गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते गणेश कवडे यांनी अधिकृतपणे भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे.

भाजपाचे आमदार महेश लांडगे यांच्या समन्वयाने आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये गणेश कवडे यांनी हातात ‘कमळ’ घेतले. भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादी-आरपीआय व मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारासाठी फडणवीस यांची शिरुरमध्ये जाहीर सभा झाली. या सभेत कवडे यांनी भाजपाची पताका खांद्यावर घेतली.

याबाबत आमदार महेश लांडगे यांनी सांगितले की, महाराष्ट्राचे श्रद्धास्थान श्रीक्षेत्र ओझर विघ्नेश्वर गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गणेश कवडे यांनी आज राज्याचे नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत अधिकृत प्रवेश केला आहे. देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वावर विश्वास आणि केंद्र व राज्यातील महायुतीची विकासात्मक धोरणाला जनसामान्यांतून प्रतिसाद मिळत आहे.

शिरुर लोकसभा मतदार संघातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेला हा ‘‘श्रीगणेशा’’ निश्चितपणे महायुतीचे उमेदवारशिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासाठी शुभसंकेत ठरेल, असा विश्वास वाटतो.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी शिरुरमध्ये महायुतीचा उमेदवार विजयी करण्याचा निर्धार भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादी-आरपीआय आणि मित्र पक्ष महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे, असेही आमदार महेश लांडगे यांनी म्हटले आहे.

आढळरावांच्या विजयासाठी भाजपा मैदानात…

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात गणेश कवडे काम करीत होते. जुन्नर तालुक्यातील युवा चेहरा आणि ठाकरे कुटुंबीयांचे निकटवर्ती अशी त्यांची ओळख आहे. तसेच, भाजपाचे आमदार महेश लांडगे यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत. महायुतीच्या माध्यमातून शिवाजीराव आढळराव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ‘घड्याळ’ या चिन्हावर लढत आहेत. मात्र, ‘‘घड्याळाला मत म्हणजे मोदींना मत…’’ असा नारा देत भाजपा आढळरावांच्या विजयासाठी मैदानात उतरली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ‘कट्टर समर्थक’ असलेल्या आमदार महेश लांडगे यांच्या माध्यमातून गणेश कवडे यांचा पक्षप्रवेश निश्चित करण्यात आला. त्याद्वारे भाजपाने महाविकास आघाडीला धक्का दिला आहे. अष्टविनायक गणपतीपैकी  ओझरचा विघ्नेश्वर, थेऊरचा चिंतामणी, लेण्याद्रीचा गिरिजात्मज आणि रांजनगावचा महागणपती ही तीर्थक्षेत्र शिरुर लोकसभा मतदार संघाअंतर्गत आहेत. पुणे जिल्ह्यातील शहरी-ग्रामीण भागासह संपूर्ण महाराष्ट्रात गणेशभक्त आहेत. भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या अष्टविनायक गणपतीपैकी विघ्नेश्वर गणपती देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून गणेश कवडे यांचा जनसंपर्क दांडगा आहे. त्याचा फायदा महायुतीला होईल, असा दावा राजकीय जाणकारांनी केला आहे.

“५ वर्ष किती फेसबुक पोस्ट टाकल्या ? कुठे जाणार होते ? जर सत्य बाहेर आले तर”, फडणवीसांनी कोल्हेंना दिला इशारा
पुणे : देशाच्या लोकसभेमध्ये आढळराव पाटलांनी गेले पंधरा वर्ष अतिशय उत्तम काम केलं आहे. आपल्या मतदारसंघातील अनेक प्रश्न, मुद्दे आढळराव पाटलांनी उपस्थित केले आहेत. त्यांनी सातत्याने आपल्या भागाचा विकास व्हावा, यासाठी एक संघर्ष उभा केला आहे. त्यामुळे आता आढळरावांसारखा नेता मोदींसोबत केंद्रात जाईल, तेव्हा या भागाचा मोठ्या प्रमाणात विकास होईल, असा विश्वास आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. शिरूर लोकसभा महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासाठी पाच कंदील चौक, शिरूर येथे सभा पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.

पुढे बोलतांना देवेंद्र फडणवीस यांनी आढळराव पाटलांचं कौतूकही केलं. ते म्हणाले की, महेश दादा असो किंवा आढळराव पाटील असो. त्यांनी बैलगाडी शर्यतीसाठी खुप प्रयत्न केलेत. अडीच वर्ष महाविकास आघाडीचं सरकार होतं. त्यावेळी काहीचं झालं नाही. त्यानंतर मी मुख्यमंत्री असतांना तो प्रश्न मार्गी लावला. सरकार आलं आणि बैलगाडी शर्यंत सुरू केली. असं म्हणत शेतकऱ्यांना काय हवंय, सामान्य माणसाला काय हवंय हे जाणणारे आढळराव पाटील आहे. असेही फडणवीस म्हणाले.

जागावाटपात शिरूरची जागा राष्ट्रवादीच्या कोट्यात गेली. दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदेंच्या शिवसेने देखील आग्रह धरला. शेवटी मधला मार्ग मी काढला. जागा जरी राष्ट्रवादीला गेली तर उमेदवार म्हणून आपण आढळराव पाटलांना देऊ असं दोघांना सांगितलं. तिथे पक्ष बदलला नाही. आम्ही एका विचाराने सोबत आलो आहोत.  याआधी पालघरमध्ये आम्ही ठाकरेंना उमेदवारही दिला आणि जागी ही दिला. त्यानंतर तो उमेदवार देखील आम्ही निवडून आणला. एका विचारात काम करत असतांना आम्ही पक्ष बदलला नाही. त्याठिकाणी आम्ही ठरवून केलं आहे. असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

पुढे देवेंद्र फडणवीस यांनी अमोल कोल्हे यांच्या चांगलाच समाचार घेतला. शिवाजीराव आढळराव पाटलांवर पक्ष बदलण्याचा आरोप केला जात आहे. परंतु  विरोधकांकडून टिका होत असेल तर समोरच्या उमेदवारांनी किती पक्ष बदलला. किती निष्ठा जपली. गेल्या पाच वर्षात किती फेसबुक पोस्ट टाकल्या. अन् कुठे कुठे जाणार होते ? आता कसे थांबले. ? याचं सत्य जर आम्ही सांगायला लागलो तर  त्यांचा खरा चेहरा आता उघड होईल. असा इशाराही त्यांनी दिला.

आढळरावांपेक्षा अमोल कोल्हे  एका गोष्टीत ते सरस आहेत. आढळराव पाटील नाटककार नाहीत. त्यांना नाटक जमत नाहीत. त्यांना नाटक जमतं, रडता येतं. हसता येतं. बोलता येतं चुगलेबाजी करता येतं. असं म्हणत  लोक नाटकाचं तिकीट घेऊन एकदा बघायला जातात. परंतु नाटक जर प्लॉप झालं तर लोक परत जात नाहीत. असा टोलाही देवेंद्र फडणवीस यांनी अमोल कोल्हे यांना लगावला.

दरम्यान,  पाच वर्ष हा व्यक्ती मतदारसंघात फिरकला नाहीत. आता ते गावात जातात. त्यावेळी लोकं शिव्या वगैरे देत नाहीत. त्यांना बोलवतात. सत्कार करतात. हार घालतात. मग विचारतात पाच वर्षे कुठे होते ? ही निवडणूक देशाची असून आढळराव सारखा एक व्यक्ती मोदींसोबत ज्यावेळी जाईल. त्यावेळी आपल्या भागातील अनेक प्रश्न मार्गी लागतील.असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.